Pages

Tuesday, 13 May 2014

लाजरू शेकरू

दुपारची वेळ.  सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात असल्यामुळे दाट सावली सुखावत होती, अन रानाचा खास असा मंद सुवास दरवळत होता...

… अवचितच एका झाडावर हालचाल जाणवली. खोडामागून एक लाल चुटूक तोंड डोकावलं, तर दुसरीकडे झुपकेदार शेपटी…


लाजरा-बुजरा असा हा चक्क होता महाराष्ट्राचा राज्यप्राणी मानलेला 'शेकरू' (Indian giant squirrel). 
  
जमिनीलगतचा कोवळा पाला खुणावत होता, म्हणून शेकरू खोडावरून झपझप उतरत निघाले.  

जमिनीवर अजिबात न उतरता शीर्षासन करत स्वारी कोवळा कोंब मोठ्ठ्या रसिकतेनं चाखत होती.

जरा कुठेतरी खट्याळ वानराची उडी चुकल्याने काटकी तुटण्याचं निमित्त ते काय झालं, तर हे लाजरू शेकरू लगबगीनं उंच झाडाच्या शेंड्याकडे सुसाटलं. 

नादिष्टपणे परत एकदा शीर्षासन करून कोवळा पाला चघळणे सुरू…

खरंतर, "असुरक्षित प्रजाती" म्हणून घोषित असलेले शेकरू, म्हणजे सह्याद्रीच्या जैववैविध्याचं प्रतिकंच!


शेकरू हा 'खार' प्राणिगटात येतो. गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते.

भीमाशंकर - महाबळेश्वर आणि सह्याद्री पश्चिम घाटात शेकरू आढळतात.

शेकरूच्या निवांत दर्शनाने मन एकदम एकदम प्रसन्न झालं. जणू आमचा सह्याद्रीचं पावला :)

पहा दृकश्राव्य::


- © साईप्रकाश बेलसरे, २०१४

13 comments:

  1. Hey Saiprakash, Great capture. .Wonderful set of photographs... I am total love with this cute and endemic animal... Thanks a lot for sharing the images... There breeding season is near, must be busy building and renovating nests... Did you manage to see any nests? Did you get to hear their calls?

    ReplyDelete
    Replies
    1. साईली,
      फोटो आवडले, हे वाचून छान वाटलं…
      खूप खूप धन्यवाद :)
      शेकरू गप्पगुमान खादाडी करत बसलं, घरट्याचा पत्ता लागू दिला नाही :)

      Delete
  2. Ratufa indica is the name... :)

    ReplyDelete
    Replies
    1. मला वाटतं, की दिसलेलं शेकरू 'Ratufa indicus typicus' होतं.

      Delete
  3. आईच्या गावात… दुर्मिळ शेकरू चं एवढ्या जवळून दर्शन मिळाल्याचं भाग्य तुम्हाला लाभलं… नशीबवान आहात…
    सुंदर फोटो आणि जबरी डॉक्यूमेंटेशन … वाह…

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू::
      शेकरूनं आपणहून इतका भाव देणं, हा आश्चर्याचा धक्का होता.
      तुम्हाला इतकं कवतिक वाटतंय… खूप धनुर्वाद :)

      Delete
  4. Suggest you to add "UNESCO Bio Diversity Hotspot. No loitering, No Plastic ~ Discover Sahyadri" as tagline. Let the laymen also know that what they have in their backyard is indeed a world recognised storage of bio-diversity. most importantly, it needs to be saved.
    Thanks,
    Yatin.

    ReplyDelete
    Replies
    1. यतिन::
      बरोब्बर… मान्य!!!
      पुढच्या ब्लॉगपासून नक्की बदल करीन :)

      Delete
  5. Chayachitran nehemipramane Utkrusht'ch ahe.. :))

    ReplyDelete
    Replies
    1. सर,
      जुजबी फोटोज काढलेत… प्रो-दर्जा नाहीये… असो!
      खूप खूप धन्यवाद :)

      Delete
  6. pls me he share karat aehe na rahaoon, khoopch goad ahe he..atyant sunder..

    ReplyDelete
    Replies
    1. रमा,
      ब्लॉगवर तुमचे स्वागत!
      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :) :)

      आता थोडं रटाळ उत्तर पण इलाज नाही::
      Creative Commons (CC) license पद्धतीने फोटोज मधील watermark तसाच ठेवून आणि ब्लॉगलिंक (http://www.discoversahyadri.in/2014/05/ShyShekaru-IndianGiantsquirrel.html) संदर्भ म्हणून दिला, तर शेअर करायला काहीच हरकत नाही. ब्लॉग कुठे शेअर केला याची लिंक मला दिलीत, तर आवडेल.

      Delete