पवन मावळातल्या दुर्गम 'मोरगिरी' किल्ल्याची थरारक चढाई

… सळसळणाऱ्या गवताळ माळापल्याड उठावलेल्या कातळमाथ्यावर आहे एक अनवट दुर्ग…
… 'कारवी-क्लायंबिंग' करत म्हणजे उभ्या घसाऱ्यातून कारवीच्या काटक्यांच्या आधारे धस्सक-फ़स्सक करत कसंबसं चढतोय - या दुर्गमदुर्गावर!
... कातळात हात-पाय रोवून वरच्या पायऱ्या गाठण्याच्या आहेत, पण शेजारची को-स-ळ-ले-ली दरी बघून वरच्या होल्डवर सरकायला धजावत नाहीये - या थरारदुर्गावर!
… थबकून सभोवती बघितलं, तर आसपासचा परिसर, इथले दुर्ग, लेणी, जलाशय सारंच सुपरिचित; पण बहुतेक ट्रेकर्सची भटकंती राहून गेलेली असते - या अनवट दुर्गावर!
आम्ही करत होतो पवन मावळातल्या दुर्गम 'मोरगिरी' किल्ल्याची थरारक चढाई!!!
… ट्रेकला दरवेळी कुठल्या नवीन ठिकाणी जायचं, हा प्रश्न पडत नाही हे किती सुदैव! सोबतीला होता निनादसारखा खंदा ट्रेकर. आवड - सवड - निवड जुळून आणली. आणि, बेत ठरवला पवन मावळातला एक अनवट दुर्ग, एक दुर्लक्षित लेणं आणि देवराई धुंडाळण्याचा...
… ट्रेकचा श्रीगणेशा करण्याआधी लोणावळ्याच्या 'रामकृष्ण'मधली फिल्टर कॉफी रिचवली. लोणावळे - अॅम्बी व्हॅली रस्त्यावर लायन्स पॉइंटपासच्या गर्दी टाळून, घुसळखांबवरून तुंग किल्ल्याकडे डावीकडे वळलो. मोरगिरीच्या पायथ्याचे मोरवे गाव आणि किल्ल्याची वाट विचारल्यावर एका मावशीने सांगितलं, "मोरव्यातून नको. इथूनच जा गडावर. खूप 'कष्टंबर'ना माझा पोरगा मोरगिरीला नेतो". त्या माहितीवर फारसा विश्वास बसेना. अर्थातच, आम्ही त्यांचे 'कष्टंबर' न झाल्याने बरंच कष्ट वाचले, कारण गडाची वाट सुरू होणार होती - बाजूच्या डोंगररांगेला उजवीकडे ठेवत गाडीरस्त्याने वळसा घालत गेल्यावर पलिकडून मोरवे गावाजवळून! 'एस्सार अॅग्रोटेक'पाशी समोरचा तुंग किल्ल्याचा गाडीरस्ता सोडला. उजवीकडे 'जवण'कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलो. 'कात्यायनी उपवन' आणि 'सूर्यवंशी पाटील एस्टेट' पाटीपासून उजवीकडे वळल्यावर, समोर दिसला उन्हांत न्हावून निघणारा कातळ माथा. हाच होता 'मोरगिरी'.
गडाकडे पाहिल्यावर जाणवलं, की चढाई दोन टप्प्यांमध्ये असणार होती. माथा ५०० मीटर उंचावला होता. चढाई मार्ग कसा असेल, याची उत्सुकता दाटली होती.
पायथ्यापासून किल्ल्याच्या पदरापर्यंत एखाद्या हॉटेलसाठी गाडीरस्ता बांधायचे प्रयत्न - बहुदा वनखात्याच्या परवानगीवाचून फसलेले दिसत होते. इथला सह्याद्री बचावल्याचा आनंदच झाला. पायथ्याच्या घरापाशी गाडी लावल्यावर याच कच्च्या गाडीरस्त्याने ट्रेकला सुरुवात केली.
आम्हांला चढाईपूर्वी गडाची संपूर्ण वाट समजली नव्हती, त्यामुळे शोधत जावं लागणार होतं. आख्खा दिवस हाती असल्याने गाईड घ्यायची गरज वाटली नाही.
(टीप: वाट अशी आहे -उत्तरेकडे उतरणाऱ्या घळीतून चढायचं; मोरगिरीच्या पदरात पोहोचायचं आणि मग गडाच्या माथ्यासाठी वेगळी चढाई)
…. कच्च्या गाडीरस्त्यावरून चालायला सुरुवात केल्यावर रस्ता हळूहळू अरुंद होत गेला. रस्त्यावर दगडं-काटेरी झुडुपे माजत गेली. पुढे तर मोरगिरीच्या घळीच्या दिशेने आडवी जाणारी वाट इतकी अस्पष्ट झाली, की शोधावीच लागली. समोर निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीचे रंग फार खुलून दिसत होते.
गाडी पार्क केल्यापासून १५ मिनिटात आम्ही घळीतून उतरणाऱ्या ओहोळाजवळ पोहोचलो. तिथल्या खडकांपासून वाट अशी कुठेच दिसत नव्हती.
घुसाघुशीला पर्याय नव्हता. त्यामुळे, इथून थेट घळीच्या दिशेने अंग ओरबाडणाऱ्या काटेरी झुडुपांमधून घुसत निघालो. कोसळलेल्या गडगडणाऱ्या दगडांच्या राशीमधून न डगमगता चढाई चालू ठेवली.
आता घळीचा माथा दिसू लागला, आणि मग मात्र पायाखाली आली थोडकी मळलेली पावठी. साथीला मंद वारं वाहू लागलेलं…
भसाभस ढासळत असलेल्या ओहोळातून मोरगिरीच्या पदरात पोहोचल्यावर, कधीतरी गाडीरस्ता खोद्ल्याच्या खुणा परत एकदा जाणवत होत्या.
तर दुसरीकडे दाट झाडीमागून डोकावत होता, मोरगिरीचा अतिशय तीव्र उताराचा १५० मीटर डोंगरमाथा. पण, माथ्याकडे जाणारी वाट कशी असेल, याचा मात्र थांगपत्ता लागेना. या इथे आम्ही उग्गाचच अवघडात शिरलो आणि जीवाला उगा तरास करून घेतला…
(टीप: मळलेल्या वाटेसाठी गडमाथा उजवीकडे ठेवत आडवं जावून, मग दक्षिण धारेवरून - डाव्या टोकाकडे -चढत जावे लागते.)
आम्ही वाट काढत निघालो थेट कातळमाथ्याची दिशा घेऊन. त्यामुळे आता होता असह्य अशक्य उभा घसरडा डोंगरउतार. 'कारवी-क्लायंबिंग' करत म्हणजे उभ्या घसाऱ्यातून कारवीच्या काटक्यांच्या आधारे धस्सक-फ़स्सक करत कसंबसं चढत गेलो…
अरुंद निसटत्या आडव्या वाटेवरून आधी उजवीकडे आणि मग डावीकडे माथ्याकडे इंच-इंच सरकत राहिलो. वाटलं, कसला हा दुर्गम-दुर्ग!!!
गडाला चोहो बाजूंनी असलेला २० मीटर उंचीचा कातळमाथा डोक्यावर आला, आणि गडाच्या जाखमाता/जाखाईदेवीच्या ठाण्याजवळचा सोलारदिवा दिसू लागला. उत्साहात पुढे निघालो.
देवीच्या गुहेच्या पातळीवर पोहोचल्यावर माथ्यापासून उतरलेली ५० फूट उंचीची चिंचोळी घळ दिसली. मात्र इथून माथ्यावर चढणं शक्य नाही.
घळीतून मोरगिरीचा पदर आणि तुंग किल्ल्याचं सुरेख दर्शन झालं.
कातळमाथ्याच्या पोटातून देवीच्या ठाण्याकडे चालत जाताना, कातळात खोदलेली पाण्याची २ टाकी लागली.
ती पहिली दोन टाकी उथळ होती. जाखाईमातेच्या गुहेत उजवीकडे पाण्याचं तिसरं टाकं होतं. दुर्गम दुर्गावरच्या शेंदूरचर्चित देवीला मनोमन वंदन केलं. पाण्यावरचं तेल-धूळ बाजूला सारल्यावर पाणी पिण्यायोग्य होतं. योग्य वाट सापडली असती, तर इथवर येणं सहज शक्य आहे.
मोरगिरीचा थरार!!!
मोरगिरीचा खरा थरार सुरू झाला, जाखाईदेवीच्या ठाण्यापासून माथ्याकडे जाताना. गडाच्या कातळकड्यामुळे माथ्यावर जायला आहे फक्त एकंच एक. आणि, ती वाट 'धोपट-वाट' अजिब्बात नाही. सोलरदिव्याच्या बाजूला असलेल्या १० फुटी खडकावर चढून माथ्याकडे जाण्यासाठी खोदलेल्या पायऱ्या गाठायच्या होत्या. कातळारोहण अगदीच दरीच्या काठावर असल्याने दृष्टीभय नक्कीच आहे.
कातळात हात-पाय रोवून वरच्या कोरीव पायऱ्या गाठायच्या होत्या. उजवीकडून दरीच्या बाजूने जाणारी पावठी फारंच एक्सपोज्ड होती. त्यामुळे, समोरच्या शेंदूर लावलेल्या दगडांच्या बाजूने चढाई केलेली जरा बरी वाटली. पण, होल्ड्स फार सोपे नाहीयेत. त्यातंच, शेजारची को-स-ळ-ले-ली दरी बघून, हातात असलेला होल्ड सोडून, त्या पल्याडच्या वरच्या होल्डवर सरकायला मी काही धजावेना. हृदयाचे ठोके वाढलेले, घामटं आलेलं. आता मात्र माथ्यावर पोहोचायचा प्रयत्न सोडून द्यावा, असं वाटायला लागलं. गडमाथा आत्ता नाही गाठला, तर डोक्यात रीग्रेट राहणार आणि परत इथे यावं लागेल, हे सुद्धा होल्डवर लटकताना डोक्यात चमकून गेलं...
जेमतेम दोन मिनिटांचा खेळ;
पण ट्रेकिंगच्या खुमखुमीला झिणझिण्या (adrenaline rush) आल्या.
जबरी मजा आली…
निनाद्रावांनी प्रोत्साहन देलं, आधार दिला आणि पोहोचलो थरारक कातळाच्या माथ्यावर!!!
खरंच… ट्रेकची चढाई-उतराई आपली आपण करायची असली, तरी कुठलाच ट्रेक जिवलग दोस्तांशिवाय शक्य नाही!!!
(टीप: मोरगिरीचं कातळारोहण किंचित अवघड श्रेणीचं आहे. आम्ही दोर वापरला नाही. परंतु, दरीच्या काठावरची 'एक-टप्पा आऊट' चढाई असल्याने सुरक्षिततेसाठी दोर वापरणे नक्की योग्य ठरेल.)
माथ्याकडे जाण्यासाठी आता अरुंद, पण तुलनेत सोप्पी वाटहोती. कातळकोरीव पायऱ्या चढत, उजवीकडून वळसा घातला.
… पवन मावळात घुमत येणारं भर्राट वारं मोरगिरीच्या माथ्यावर धडकत होतं. निळं आभाळ, पवनेचा विस्तृत जलाशय आणि दाट झाडीने भरलेली मोरगिरीची सोंड पाहून दिलखुष हो गया…
मोरगिरी सह्यधारेच्या जवळ असल्याने पश्चिमेच्या कुरवंडे - आंबेनळी - पायमोडी - सव अश्या जुन्या घाटांमधून होणाऱ्या दळणवळणावर लक्ष ठेवण्यासाठी जागा मोक्याची! माथ्यावरून लोहगड-विसापूर-तुंग-तिकोना-कोरीगड तर 'मशाली'च्या अंतरावर! त्यामुळे, एक टेहेळणीची चौकी असं मोरगिरीचं प्रयोजन असणार…
चिंचोळ्या माथ्याची चक्कर मारायला ५ मिनिटे पुरे. चोहोबाजूचे दृश्य सुरेख!
(प्रकाशचित्र साभार: निनाद बारटक्के)
दुर्गवास्तू (आनंद पाळंदे) पुस्तकानुसार - गडावर कौलाची खापरे, शिशाच्या चपट्या विटा इथे होत्या, अशी नोंद आहे आणि मोरव्यातून मोराची पिसे पुण्यात पाठवली ,जात अशी नोंद पेशवे दफ्तरात आहे.
पुस्तकात नोंदवलेलं 'जोतं' माथ्यावर दिसलं नाही, पण फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याजवळ दिसला एक पाण्याचा हौद!
गडफेरी करून परत जाखमाता गुहेपाशी यायला निघालो. भुसभुशीत रेतीवरून, निसटत्या गवतावरून आणि मग त्या आधीच्या कातळावरून डोंबारकसरत करत सावकाश उतरलो.
जाखमातेच्या गुहेतल्या पाण्याच्या थंडगार पाण्याचं सरबत रिचवत नि-वां-त गप्पाष्टक रंगलं…
चढतानाची अडचणीची गचपण उतरायची काहीच गरज नव्हती. दक्षिण धारेवरची उतरणारी अतिशय उभ्या उताराची - पण मस्त मळलेली सुसाट वाट कारवीमधून उतरत पदरात घेऊन गेली.
गड डावीकडे ठेवत परतीची वाट पकडली. गडाकडे बघितल्यावर आम्ही वाट कशी चुकलो ते चांगलंच उमगलं - डावीकडच्या धारेवरून चढणारी वाट न घेता, माथ्याच्या मध्यावरून थेट घुसाघुशी केल्याने आम्ही जीवाला लय त्रास दिला होता. अर्थात, वाटा सहजी सापडल्यावर 'कोडं सुटल्या'ची मजा कशी येणार!!!
…पुण्याजवळ असूनही राहून गेलेला अनवट दुर्ग मोरगिरी बघण्याचा योग आलेला. आणि परतीचा गाडी प्रवासही रंगत गेला.
झऱ्याकाठची 'भयंकर' टेस्टी भेळ, अनवट कातळलेण्यांना (याबद्दल परत कधीतरी) आणि देवराईला भेट…
आणि सर्वात मुख्य म्हणजे सह्यमित्राशी मनसोक्त गप्पा…
बस्स, अजून काय पाहिजे ट्रेकरला!!!
महत्त्वाच्या नोंदी:
१. कृतज्ञता: दुर्गवास्तू (आनंद पाळंदे), विवेक मराठे यांचा ब्लॉग
२. भौगोलिक स्थान: http://wikimapia.org/10507733/Morgiri-Killa
३. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
४. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१५. सर्व हक्क सुरक्षित.

गडाच्या पदरावरच्या सोनसळी गवताच्या मागे तुंग किल्ला आणि अलिकडचा जोडीदार देवगड (?) डोंगर खुणावत होता.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
महत्त्वाच्या नोंदी:
१. कृतज्ञता: दुर्गवास्तू (आनंद पाळंदे), विवेक मराठे यांचा ब्लॉग
२. भौगोलिक स्थान: http://wikimapia.org/10507733/Morgiri-Killa
३. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
४. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१५. सर्व हक्क सुरक्षित.
तुमी बी वस्पटी सोडत नाय आणि आमालाबी सोडू देनार नाय साई! लय खास!
ReplyDeleteतुषार, हा हा .. खरंय, घाटवाटांच्या वस्पटीचा नाद लागलाय आपल्याला..
Deleteधन्यवाद! :)
Jabri lihile ahe!!! Trek tar khatarnak vatene kela!!! Awesome!!! Keep it up!!!
ReplyDeleteयश, धन्यवाद मित्रा!
Deleteहो, थरारक अनुभव होता. आता मात्र कातळावर लोखंडी शिडी आहे...
धन्यवाद!
अप्रतिम !!
ReplyDeleteधन्यवाद विवेक सर! _/\_
Deleteभन्नाट ट्रेक ! मस्त लिखाण
ReplyDeleteराजेश सर, धन्यवाद... :)
Deleteतुम्ही मोरगिरीला जाऊनपण आलात, याचा आनंद आहे...
वाह वाह… "कुठलाही ट्रेक जिवलग दोस्तांशिवाय शक्य नाही"… जबरदस्त वाक्य… आवडलं…
ReplyDeleteनिनाद्रावांनी ऑक्टोबरच्या डेरमाळ-पिसोळ नंतर बहुदा हाच एक ट्रेक केलेला दिसतोय… चांगलाचं मोठा ब्रेक मिळालेलाय बंड्याला…
"आणि सर्वात मुख्य म्हणजे सह्यमित्राशी मनसोक्त गप्पा"… क्या बात है… जवळचा खास सह्यमित्र असेल तर कुठलाही ट्रेक हा यशस्वी होतोचं होतो…
अनवट कातळलेण्यांना आणि देवराईला भेट देऊन येऊया एखाद्या विकेंड ला…
नेहमीप्रमाणेचं जबरदस्त लिखाण…
बढीया…
धन्यवाद!!!
Deleteहो रे, खमक्या ट्रेकर दोस्त सोबत असला, की अवघडात शिरायला टेन्शन नाही.
चला, पुढचं अनवट कातळलेणी आणि देवराई भेट द्यायची वाट बघताहेत...
ख-त-र-ना-क !!!! क्या बात है !!! "भयंकर" दिवसांनी खास साई ष्टाईल ब्लॉगची मेजवानी अनुभवायला मिळाली !! मोरगिरी भन्नाटच आहे…नशिबाने सोलर दिवे वगैरे लावूनसुद्धा पायवाटेचा "राजमार्ग" झालेला नाही. सोनेरी पठाराच्या पार्श्वभूमीवरचा तुंग आणि देवघर डोंगराचा फोटो कम्म्म्म्माल !!! आणि त्यात बरोबर निनाद्राव म्हणजे सोने पे सुहागा !! जियो !!
ReplyDeleteओंकार: धन्यवाद दोस्ता!!!
Deleteहो रे, "भयंकर" ऑफिसकामाला वाहून घेतल्याने ट्रेक्स आणि त्याहूनही ब्लॉग्ज मंदावलेत जरा...
ब्लॉगमधून मोरगिरीची वाट, रॉक patch आणि वरची निसरडी वाट कशी आहे, ते लिहायचा प्रयत्न केलाय. hopefully, कोणी ट्रेकर्सनी casually घेऊ नये यासाठी!
व्ह्यूज मस्तच आहेत! एकंदर जमला बेत...
धन्यवाद!!!
अभिनंदन!
ReplyDeleteमस्त रे साई.. छान वर्णन व सुंदर फोटो.. तुंगला जाताना या मोरागीरीने लक्ष वेधून घेतले होते.. आज सविस्तर माहिती मिळाली..
ReplyDeleteयो:
Deleteधन्यवाद दोस्ता!
हो रे, इतक्या वेळा या areaमध्ये जातो. पण काही ठिकाणं राहून जातात...
तिथला थरार अनुभवल्यावर वाटलं, की इतक्या दिवसात कसं काय नाही आलो...
ट्रेकर्सना सापडायला सोप्पं जावं आणि difficulty level कळावी, अश्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न केलाय.
साई,
ReplyDeleteतुझ्या ब्लॉग पाहून, आजच मोरगिरी पाहून आलो.
मोरगिरी जबरदस्त आहे, मस्त अनुभव
Thanks for your informative blog..
सुनील,
Deleteट्रेकर्सना ब्लॉग वाचून अनवट जागा बघाव्याश्या वाटणे आणि ब्लॉगच्या माहितीची थोडकी मदत होणे, यासारखा आनंद कोणता!!!
धन्यवाद अनुभव कळवल्याबद्दल...
जबराSSSSSS ! मस्त… थरारक ! नविन दुर्गाची माहिती दिलीत साईराव… त्याबद्दल धन्यवाद ! बाकी 'फोटू-गरापी' आणि शब्दांकन नेहमीप्रमाणेच अप्रतिम !!!
ReplyDeleteभटक्या योगी, धन्यवाद दोस्ता..
Deleteअश्या प्रतिक्रियांमुळे Discoverसह्याद्री थीममध्ये बसतील असे ट्रेक्स आणि ब्लॉग लिहिण्याचे प्रयत्न चालू ठेवावेसे वाटतात.. धन्यवाद!
Hi
ReplyDeleteI am pratik puri. I read your blog and liked it. I am also a writer and happen to work in Dailyhunt news and e-book mobile application. Dailyhunt releases news and e-books in 12 Indian languages. I would like to contact you regarding publishing your blog matter on our app. I look after the Marathi language. I would like to publish your blog content on our app for free or paid. In Marathi we have a readership of over 50 lakh people. We would be pleased to have you work with us. Please contact me for further details at pratik.puri@verse.in so that I can give you details of the proposal. Thank you!
Sai.. sunder likhan...Gad matha (Ballkilla) var kay aahe te gelya pavsalyat kelelya bhatkanti darmyan rahila. (Toofan paus aani bhijlela daga). tujya blog mule gad mathyavar kay aahe he koda sutala... dhanyawad...
ReplyDeletelikhanacha ek chota prayant kela hota pan to nischitach tujya evada sunder aani surekh navhta...hoti far far tar ek nond
मध्यलोक,
Deleteब्लॉगवर तुझे स्वागत!
ब्लॉग लिहिण्याच्या प्रयत्नांमागचा साधासोप्पा हेतू हा, की सह्याद्रीतल्या भटकंतीचे आनंदाचे अनुभव आणि ट्रेकर्सना त्या रूट्सवर मदत होईल असं लिखाण करणे. माहिती तंत्रज्ञानामुळे समव्यसनी-समविचारी ट्रेकर्सपर्यंत ते पोहोचताना दिसतंय. त्यामुळे मस्त वाटलं प्रतिक्रिया वाचून.
नक्की भेटूयात एखाद्या दुर्ग-घाटवाटेवर....
मन:पूर्वक शुभेच्छा!!!
Mast ..!!
ReplyDeleteसाईप्रकाश, तुझे लेखन मी आवर्जून वाचतो. छान लिहितोस. मोरगिरी किल्ल्याबद्दल नेटवर फारसे काही नव्हते.ह्या लेखनामुळे खुप छान माहिती पुढे आणली आहेस.
ReplyDeleteपुढील ट्रेक आणि लेखनास शुभेच्छा !
धन्यवाद.
भुषण: मस्त वाटलं प्रतिक्रिया वाचून..
DeleteDiscoverसह्याद्री थीमला अनुसरून, डॉक्युमेंटेड नसलेल्या आडवाटेच्या ठिकाणांची माहिती ट्रेकरदोस्तांना कळावी म्हणून केलेलं लिखाण आहे.. तुम्हाला आवडतंय, हे वाचून छान वाटलं.. धन्यवाद
👍👌☺
दादा तुमचा मो no पाठवा
ReplyDelete9822696968 या no वर
खुपच छान आमच्या सारख्या नवख्या ट्रेकर्सन लाख मोलाची माहिती मिळतेय.
धन्यवाद दादा.
धन्यवाद मित्रा.. :)
Deleteप्लीज सेलफोन नंबर इमेलवर (saiprakash.belsare@gmail.com) पाठव ना; मग मोबाईल नंबर इमेल करतो.
खूप सुंदर ... छान माहिती..!
ReplyDelete