भामा खोऱ्यातल्या अल्पपरिचित - गडदच्या दुर्गेश्वर लेण्यांचा शोध घेतानाचा थरार...
...एकापाठोपाठ एक अश्या कातळकोरीव पायऱ्या काही केल्या संपेनात...
...सरत्या पावसाचं खट्याळ पाणी अजूनही कातळकड्यावर रेंगाळलेलं, शेवाळलेलं, झिरपत राहिलेलं...
....हाताच्या आधारासाठी चाचपणी केल्यावर कुठंतरी दूरवर एक पुसटशी खोबण सापडते खरी, पण आता पाय टेकवण्यासाठी शेवाळलेल्या निसरड्या पावठीवर मात्र विश्वास ठेवणं अवघड आहे...
...गवताचे झुंबाडे - शेवाळलेल्या खोबणी - कोरीव पायऱ्या, आधारासाठी कशावर विश्वास ठेवावा...
...चुकून नजर निसटली, की गरगरत जाते दाट झाडीभरल्या दरीच्या तळाशी...
...ऊर धपापलेलं, घश्याला कोरड पडलेली, माथ्यावर घामटं जमा झालेलं...
अल्पपरिचित लेणी शोधण्याच्या मोहिमेतली अनपेक्षित थरार-धम्माल अशी पुरेपूर अनुभवत होतो.
'गडद’ म्हणजे खडकात खोदलेली गुहा. सह्याद्रीत 'गडद' म्हणलं, की ट्रेकर्स-अभ्यासकांना हमखास आठवतो - ‘गडदचा बहिरी’ (म्हणजे ढाकच्या उभ्या कड्यातल्या बहिरीचं अनघड ठाणं), किंवा काहींना आठवतील पळू-सोनावळ्याची देखणी लेणी - 'गणपती गडद'. पण, आत्ताची आमची 'गडद'ची भटकंती होती - एका अल्पपरिचित गिरीस्थळाची. हे 'गडद' होतं, राजगुरूनगरच्या पश्चिमेला 'भामा' नदीच्या खोऱ्यात.
भीमा नदीची उपनदी असलेल्या या भामा खोऱ्यात दडलेली भन्नाट शिखरं, घाटवाटा आणि डोंगररांगांना परत-परत भेट देणं, हा उपक्रम गेले काही महिने पायदळी घेतला होता. (या सगळ्याबद्दल स्वतंत्रपणे सविस्तर लिहीनंच.)
तळेगावच्या आमच्या ट्रेकरमित्र 'अमेय जोशी'नं गडदच्या गुहांबद्दल कुठेसे थोडं त्रोटक वाचलं होतं. अश्या या - ट्रेकर्सना आणि कदाचित अभ्यासकांनाही माहिती नसलेल्या - अल्पपरिचित अश्या 'दुर्गेश्वर लेणी' धुंडाळण्यासाठी आम्ही निघालो.
गडदचं दुर्गेश्वर म्हणजे एखादं साधं स्थानिक देवस्थान असेल, एखाद्या रविवार सकाळी सहज बघून येवूयात, असं वाटलेलं. अर्थात, हा सपशेल गैरसमज निघणार होता.…
गडद गावापाशी पोहोचलो, तेंव्हा हवेत सुखद गारवा होता. गावामागच्या डोंगररांगेची तुळतुळीत कातळभिंत, माथ्यावरची गच्च झाडी आणि आळसावलेल्या पवनचक्क्या कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघत होत्या. दूरवरून बघताना 'दुर्गेश्वरचं गडद' नक्की कुठे असावं, याचा फारसा पत्ता लागेना.
ठिकठिकाणी ताडाच्या खोडाला छेद देवून, झिरपणारा रस (नीरा/ ताडी) उपसण्याचा खटाटोप जोरात चालू होता.
दीड-दोनशे मीटर उंचीची अर्धवर्तुळाकार दिसणारी कातळभिंत होती 'तासूबाई' डोंगराची. पायथ्याशी 'गडद' गावची टुमदार घरं आणि तजेलदार शेतं-शिवारं असं मोठ्ठ प्रसन्न दृश्य सामोरं होतं...
कातळात 'दुर्गेश्वर लेणी' नक्की कोठे, हे मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यावरंच समजलं...
'दुर्गेश्वर लेण्यां'ची खरी गंमत आहे, त्याच्या कातळमार्गावर... उभ्या कातळावरच्या शे-दोनशे निसटत्या शेवाळलेल्या पायऱ्या हा थरार अर्थातंच अजून उलगडायचा होता...
ग्रामदैवत भैरवनाथाचं राउळ मोठ्ठ प्रसन्न. आसपास विखुरलेले जुने दगड बघता, इथे एखादं पुरातन कोरीव मंदिर नक्की असणार. मंदिराच्या पायऱ्या न चढून जाण्याची प्रथा गावातल्या स्त्रिया आजंही पाळतात.
भैरवनाथाच्या राऊळापासून पाच मिनिटात आम्ही पोहोचलो गडदच्या 'देवराई'मध्ये. काहीशे वर्षांपूर्वीचे जुने-जाणते वृक्ष आभाळाला भिडलेले. देवाचा बांधून काढलेला पार. इथे चैत्री अमावस्येला दुर्गेश्वराचा भंडारा (यात्रा) भरतो. भामा खो-यातलं श्रद्धास्थान असलेल्या दुर्गेश्वराचा प्रसाद घ्यायला शेकडो भाविक या देवराईत जमतात.
आता आमची उत्कंठा दाटली होती, दुर्गेश्वराचं स्थान बघायची... झुडुपातून वळसे घेत जाणारी पाऊलवाट १० मिनिटात दुर्गेश्वर ठाण्यापाशी घेवून जाते.
बांधलेलं मंदिर नाही. कातळकड्याच्या छोट्याश्या खळग्यात स्थापन केलेलं शिवलिंग आणि दोन-चार किरकोळ पाय-या कोरलेल्या आहेत.
गडदगावचे 'लाऊडस्पीकरवाले' - श्री विश्वनाथ निकम - आम्ही विनंती न करताच, वाट दाखवायला सांगाती आलेले.
अग्गदी बारकाईने फोटो बघितला, तर जाणवेल की खळग्याची दिशा अचूक निवडल्याने माथ्यावरच्या खडकामधून अलगद एक-एक थेंब पाणी निसटतोय, आणि शंकराच्या पिंडीवर अव्याहत जलाभिषेक होतोय. पावसाळ्यात मात्र शिवलिंग पावसाने भिजत नाही. गावातले पुजारी 'शांताराम कवदरे' भेटले. पावसा-उन्हांत दररोज दुर्गेश्वराच्या पूजेत खंड नाही. रोजच्या पूजेमुळे परिसर प्रसन्न राहिलाय.
दुर्गेश्वर लेण्याच्या कातळमार्गाचा थ-रा-र
दुर्गेश्वर शिवलिंगाचं दर्शन तसं सहजीच झालेलं...
पण दुर्गेश्वर लेण्याची वाट मात्र 'लय अवघड हाये' या धृवपदावर
लाऊडस्पीकरवाले - निकमदादा अडून बसलेले. अर्थातंच, अवघड म्हणलं, की 'बेधडक' भेट द्यायलाच पाहिजे नाही का!!!
आणि मग सुरू झाली उभ्या कड्यातल्या एकदम खड्या उंचीच्या, पण आखूड पायऱ्यांची साखळी…
दुर्गेश्वर लेण्यांचा थरार सुरू झालेला. ऑक्टोबर हिट सुरू झालेली असली, तरी सरत्या पावसाचं पाणी अजूनही कड्यावर रेंगाळलेलं. अध्येमध्ये शूज कातळावरून किंचित सरकले, की 'जपून रे' असं एकमेकांना बजावायचं....
खाली खोSSSलवर देवराईचा झाडोरा.
तर, पायाखाली ओल्या कातळावरच्या, दृष्टीभय असलेल्या घसरड्या पाय-यांमुळे थरार...आणि थ-र-का-प देखील!!!
मध्येच एक अर्धवट पायरी - ’फुटकी पायरी’ नावाची. अर्धा क्षण पाय तरंगत हवेत, अन अल्याड-पल्याडच्या होल्ड्स साठी झटपट!!!
तब्बल शे-दोनशे निसटत्या शेवाळलेल्या पायऱ्या पार केल्यावर माथ्याकडचा कातळ जवळ आला... अंगावरंच आला म्हणायचं!!!
इतक्या पावठ्या खोदलेल्या, म्हणजे माथ्यावर काहीतरी 'घबाड' हाती लागणार, अशी खात्री पटत चाललेली...
माथ्याकडून झेपावणाऱ्या कातळाच्या पदरातल्या सपाटीवर पोहोचलेलो. दुर्गेश्वरलेणी आता अग्गदी जवळ आलेली आहेत, असं निकमभाउंनी जाहीर केलेलं. त्यामुळे, उत्साह आणि उत्कंठेने अक्षरश: पळत निघालेलो....
कातळाच्या पोटातून उजवीकडे (पश्चिमेला) निघालो. लेणी किंवा कुठलंही खोदीव-कोरीव काम अजून दृष्टीक्षेपात पडलं नव्हतं.
डावीकडे जमिनीलगत कोरीव टाके लागले. कोरडंच, साध्या खोदाईचं.
सामान्य खोदाईची ही टाक्याची सुरुवातीची खोदाई, पण सोडून दिलेली.
मुख्य दालन अजून पुढे आहे. हवेतला गारवा आणि समोर माथ्यावरचा रानवा सुखावत होता. अवघड चढाई करून, लेण्यांपर्यंत पोहोचल्याचा आनंददेखील मोठ्ठा होता.
कातळाचं छत सोडून कोरलेलं आयताकृती टाकं बाजूला ठेवत पुढे निसटलो.
आणि, आम्ही पोहोचलो दुर्गेश्वर लेण्यांच्या मुख्य दालनापाशी. कातळछत सोडून कोरलेल्या दालनात उतरण्यासाठी चार पायऱ्या उतरून दालनाच्या सपाटीवर पोहोचलो. लेणी खोदाईसाठी निवडलेल्या कातळाची 'पोत' काळ्या बेसॉल्टपेक्षा वेगळी होती. हे कारण असेल का, लेणी खोदाई साधी आणि अर्धवट असण्याचं!!!!
५० फूट रुंद - ४० फूट खोल आकाराच्या मुख्य दालनाचे दोन भाग करणारा कातळाचा कठडा, चौकोनी कातून काढलेल्या पुढच्या भागातील धान्याचे उखळ, आतील भागातील छोटी खोली हे निरखलं. गडद गावातले स्थानिक दुर्गेश्वर लेणी पांडवकालीन किंवा (?) रामायणकालीन आहेत, असं म्हणतात.
पुरातन व्यापारी मार्ग ट्रेस करता आला, पण कालनिश्चिती नाहीच जमली...
गुगल नकाश्यांवर भामा खोरं परिसर बारकाईने अभ्यासला. पश्चिम-पूर्व असा व्यापारी मार्ग शोधत गेलो. कोकण-तळातली आंबिवली लेणी - परिसराचा संरक्षक कोथळीगड (प्रसिद्ध पेठचा किल्ला) आणि खुद्द पेठच्या किल्ल्यावरचं विशाल लेणे दालन - घाटमाथ्याला जोडणारी घाटवाट 'कौल्याची धार' आणि ऐन घाटमार्गातली पाण्याची टाकी, पुढे पूर्वेकडे आल्यावर 'दुर्गेश्वर' आणि 'भामचंद्र' लेणी असा हा सगळा मार्ग ट्रेस करता आला. यातली आंबिवली लेणी आणि 'भामचंद्र' लेणी मूळ बौद्धधर्मीय लेणी असली, तरी 'दुर्गेश्वर' लेण्यांमध्ये कुठलेच शिलालेख, स्तूप आणि विहार नसल्याने, या लेणी मूळ बौद्धधर्मीय नक्कीच नाहीत.
मुख्य दालनाच्या लागत दुर्गेश्वराचं देऊळ आहे. वाघोबा - दीपमाळ - नागप्रतिमा - शिवलिंग असं साधं मूर्तीकाम आहे. सातव्या ते दहाव्या शतकातली ही खोदाई असावी, असा माझा अंदाज आहे.
मंद वारं सुटलेलं. दूरवर पसरलेली, वाऱ्याच्या तालावर डोलणारी हिरवीगार भातशेती दीठी सुखावत होती...
अजस्त्र कातळाच्या उदरात, निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी, पारंपारिक थोडकी साधने-पद्धती वापरून वर्षानुवर्षे कातळ कोरून लेणी खोदण्याचा उपक्रम कित्येक शतकं "आपल्या सह्याद्रीत" चालू राहिला होता. पूर्वजांच्या या पाऊलखुणा खरंच विस्मयकारक आहेत...
'वर्षावास' किंवा 'वर्षाविहार' म्हणजे पावसाच्या चार महिन्यात आसरा हा मुख्य हेतू आणि जोडीला व्यापार - धर्मप्रचार असे इतर हेतू. म्हणजे आठव्या - दहाव्या शतकापर्यंत लेणी खोदण्याच्या या उपक्रमाला राजाश्रय आणि धनाश्रय नक्की होता. मला कोडं पडतं - की सह्याद्रीच्या कातळात इतकी सगळी लेणी खोदली आहेत, त्यांचा पुढच्या काळात कसा उपयोग झाला असेल... म्हणजे स्वराज्यासाठी शिवरायांनी किंवा पेशव्यांनी किंवा इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारकांनी... आणि, आज... आज, आपल्या मातीत घडलेल्या संस्कृतीचा किती सगळा समृद्ध वारसा निव्वळ अडगळीत पडलाय... कोणी म्हणजे कोणी फिरकत नाही. अंतर्मुख झालो... सोबती पुढे गेलेले... मी हरवलो काही क्षण त्या निशब्द शांततेत........
आता परतीच्या मार्गावर घसरड्या - निसरड्या - शेवाळलेल्या - उभ्या गवताळ उतरंडीवरून डोंबार कसरत करणं बाकी होतं...
आखूड पाय-यांवर कसंबसं उभं राहून (शूज बघा डाव्या कोप-यात) काढलेल्या या फोटोत कदाचित कल्पना येईल, कातळमार्गाची.... चढाईपेक्षा उतराई नक्कीच जास्त आव्हानात्मक होती.
७५ - ९० अंशात झुकलेल्या कड्यामध्ये कोरलेल्या दीड-दोनशे पाय-यांच्या खोदाईने आम्ही थक्क झालेलो...
देवराईमध्ये तुकडी सुखरूप पोहोचलो. 'लाऊडस्पीकरवाले' - निकमदादा यांचे आभार मानून योग्य मानधन देण्यात आले.
ट्रेकच्या अखेरीस सह्याद्रीला अलविदा म्हणून परतीचा प्रवास सुरू करावा लागलाच... डोळ्यांसमोर तरळत होती, दुर्गेश्वर लेणी धुंडाळतानाची थरारक दृश्यं...
...विस्मृतीत दडलेल्या कोण्या भामा नदीच्या खोऱ्यात, पूर्वजांच्या पाऊलखुणा जपणारी आणि थक्क करणारी घाटवाट - दुर्ग - लेण्यांची खोदाई...
...रॉकपॅचवर ऐन ट्रॅव्हर्सवर होल्ड्स मिळवताना खटपट आणि धडधड झाली, ती अजून जाणवत होती...
...कातळावरून निसटत्या पायऱ्यांची न संपणारी शृंखला कशी खोदली असेल, या विचारानं थक्क झालो होतो...
...देवराईमधली निखळ शांतता अनुभवून भारावून गेलो होतो...
...डोंगरकपारीतल्या शिवलिंगास नैसर्गिक जलाभिषेक अलगद घडावा, ही कृती एखाद्या कविमनाच्या भक्ताचीच असणार...
...एकापाठोपाठ एक अश्या कातळकोरीव पायऱ्या काही केल्या संपेनात...
...सरत्या पावसाचं खट्याळ पाणी अजूनही कातळकड्यावर रेंगाळलेलं, शेवाळलेलं, झिरपत राहिलेलं...
....हाताच्या आधारासाठी चाचपणी केल्यावर कुठंतरी दूरवर एक पुसटशी खोबण सापडते खरी, पण आता पाय टेकवण्यासाठी शेवाळलेल्या निसरड्या पावठीवर मात्र विश्वास ठेवणं अवघड आहे...
...गवताचे झुंबाडे - शेवाळलेल्या खोबणी - कोरीव पायऱ्या, आधारासाठी कशावर विश्वास ठेवावा...
...चुकून नजर निसटली, की गरगरत जाते दाट झाडीभरल्या दरीच्या तळाशी...
...ऊर धपापलेलं, घश्याला कोरड पडलेली, माथ्यावर घामटं जमा झालेलं...
अल्पपरिचित लेणी शोधण्याच्या मोहिमेतली अनपेक्षित थरार-धम्माल अशी पुरेपूर अनुभवत होतो.
'गडद’ म्हणजे खडकात खोदलेली गुहा. सह्याद्रीत 'गडद' म्हणलं, की ट्रेकर्स-अभ्यासकांना हमखास आठवतो - ‘गडदचा बहिरी’ (म्हणजे ढाकच्या उभ्या कड्यातल्या बहिरीचं अनघड ठाणं), किंवा काहींना आठवतील पळू-सोनावळ्याची देखणी लेणी - 'गणपती गडद'. पण, आत्ताची आमची 'गडद'ची भटकंती होती - एका अल्पपरिचित गिरीस्थळाची. हे 'गडद' होतं, राजगुरूनगरच्या पश्चिमेला 'भामा' नदीच्या खोऱ्यात.
भीमा नदीची उपनदी असलेल्या या भामा खोऱ्यात दडलेली भन्नाट शिखरं, घाटवाटा आणि डोंगररांगांना परत-परत भेट देणं, हा उपक्रम गेले काही महिने पायदळी घेतला होता. (या सगळ्याबद्दल स्वतंत्रपणे सविस्तर लिहीनंच.)
तळेगावच्या आमच्या ट्रेकरमित्र 'अमेय जोशी'नं गडदच्या गुहांबद्दल कुठेसे थोडं त्रोटक वाचलं होतं. अश्या या - ट्रेकर्सना आणि कदाचित अभ्यासकांनाही माहिती नसलेल्या - अल्पपरिचित अश्या 'दुर्गेश्वर लेणी' धुंडाळण्यासाठी आम्ही निघालो.
गडदचं दुर्गेश्वर म्हणजे एखादं साधं स्थानिक देवस्थान असेल, एखाद्या रविवार सकाळी सहज बघून येवूयात, असं वाटलेलं. अर्थात, हा सपशेल गैरसमज निघणार होता.…
गडद गावापाशी पोहोचलो, तेंव्हा हवेत सुखद गारवा होता. गावामागच्या डोंगररांगेची तुळतुळीत कातळभिंत, माथ्यावरची गच्च झाडी आणि आळसावलेल्या पवनचक्क्या कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघत होत्या. दूरवरून बघताना 'दुर्गेश्वरचं गडद' नक्की कुठे असावं, याचा फारसा पत्ता लागेना.
ठिकठिकाणी ताडाच्या खोडाला छेद देवून, झिरपणारा रस (नीरा/ ताडी) उपसण्याचा खटाटोप जोरात चालू होता.
दीड-दोनशे मीटर उंचीची अर्धवर्तुळाकार दिसणारी कातळभिंत होती 'तासूबाई' डोंगराची. पायथ्याशी 'गडद' गावची टुमदार घरं आणि तजेलदार शेतं-शिवारं असं मोठ्ठ प्रसन्न दृश्य सामोरं होतं...
कातळात 'दुर्गेश्वर लेणी' नक्की कोठे, हे मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यावरंच समजलं...
गडद गावातून दुर्गेश्वर डोंगराकडे निघालो, की भाताच्या घमघमणा-या शिवारांनी स्वागत केलं. सांगा बरं, कोणत्या आधुनिक यंत्रात आमच्या मावळच्या भातखाचरांचा ताजा गंध रेकॉर्ड कराल.. तो ऊरातंच भरून घ्यायला हवा!!!
ग्रामदैवत भैरवनाथाचं राउळ मोठ्ठ प्रसन्न. आसपास विखुरलेले जुने दगड बघता, इथे एखादं पुरातन कोरीव मंदिर नक्की असणार. मंदिराच्या पायऱ्या न चढून जाण्याची प्रथा गावातल्या स्त्रिया आजंही पाळतात.
भैरवनाथाच्या मंदिरामागून दाट गवतामधून डोंगराकडे निघालो. वृक्ष आणि गच्च गच्च माजलेलं गवत यातून वाट काढत गेलो. वर्षानुवर्ष एकत्र ट्रेक्स करणारी भरवशाची तुकडी सोबत असली, की शोध मोहिमांचं आव्हान स्विकारायला मागे -पुढे बघायची गरज नाही.
आता आमची उत्कंठा दाटली होती, दुर्गेश्वराचं स्थान बघायची... झुडुपातून वळसे घेत जाणारी पाऊलवाट १० मिनिटात दुर्गेश्वर ठाण्यापाशी घेवून जाते.
बांधलेलं मंदिर नाही. कातळकड्याच्या छोट्याश्या खळग्यात स्थापन केलेलं शिवलिंग आणि दोन-चार किरकोळ पाय-या कोरलेल्या आहेत.
गडदगावचे 'लाऊडस्पीकरवाले' - श्री विश्वनाथ निकम - आम्ही विनंती न करताच, वाट दाखवायला सांगाती आलेले.
अग्गदी बारकाईने फोटो बघितला, तर जाणवेल की खळग्याची दिशा अचूक निवडल्याने माथ्यावरच्या खडकामधून अलगद एक-एक थेंब पाणी निसटतोय, आणि शंकराच्या पिंडीवर अव्याहत जलाभिषेक होतोय. पावसाळ्यात मात्र शिवलिंग पावसाने भिजत नाही. गावातले पुजारी 'शांताराम कवदरे' भेटले. पावसा-उन्हांत दररोज दुर्गेश्वराच्या पूजेत खंड नाही. रोजच्या पूजेमुळे परिसर प्रसन्न राहिलाय.
दुर्गेश्वर लेण्याच्या कातळमार्गाचा थ-रा-र
दुर्गेश्वर शिवलिंगाचं दर्शन तसं सहजीच झालेलं...
पण दुर्गेश्वर लेण्याची वाट मात्र 'लय अवघड हाये' या धृवपदावर
लाऊडस्पीकरवाले - निकमदादा अडून बसलेले. अर्थातंच, अवघड म्हणलं, की 'बेधडक' भेट द्यायलाच पाहिजे नाही का!!!
आणि मग सुरू झाली उभ्या कड्यातल्या एकदम खड्या उंचीच्या, पण आखूड पायऱ्यांची साखळी…
दुर्गेश्वर लेण्यांचा थरार सुरू झालेला. ऑक्टोबर हिट सुरू झालेली असली, तरी सरत्या पावसाचं पाणी अजूनही कड्यावर रेंगाळलेलं. अध्येमध्ये शूज कातळावरून किंचित सरकले, की 'जपून रे' असं एकमेकांना बजावायचं....
खाली खोSSSलवर देवराईचा झाडोरा.
तर, पायाखाली ओल्या कातळावरच्या, दृष्टीभय असलेल्या घसरड्या पाय-यांमुळे थरार...आणि थ-र-का-प देखील!!!
मध्येच एक अर्धवट पायरी - ’फुटकी पायरी’ नावाची. अर्धा क्षण पाय तरंगत हवेत, अन अल्याड-पल्याडच्या होल्ड्स साठी झटपट!!!
तब्बल शे-दोनशे निसटत्या शेवाळलेल्या पायऱ्या पार केल्यावर माथ्याकडचा कातळ जवळ आला... अंगावरंच आला म्हणायचं!!!
इतक्या पावठ्या खोदलेल्या, म्हणजे माथ्यावर काहीतरी 'घबाड' हाती लागणार, अशी खात्री पटत चाललेली...
माथ्याकडून झेपावणाऱ्या कातळाच्या पदरातल्या सपाटीवर पोहोचलेलो. दुर्गेश्वरलेणी आता अग्गदी जवळ आलेली आहेत, असं निकमभाउंनी जाहीर केलेलं. त्यामुळे, उत्साह आणि उत्कंठेने अक्षरश: पळत निघालेलो....
कातळाच्या पोटातून उजवीकडे (पश्चिमेला) निघालो. लेणी किंवा कुठलंही खोदीव-कोरीव काम अजून दृष्टीक्षेपात पडलं नव्हतं.
डावीकडे जमिनीलगत कोरीव टाके लागले. कोरडंच, साध्या खोदाईचं.
सामान्य खोदाईची ही टाक्याची सुरुवातीची खोदाई, पण सोडून दिलेली.
मुख्य दालन अजून पुढे आहे. हवेतला गारवा आणि समोर माथ्यावरचा रानवा सुखावत होता. अवघड चढाई करून, लेण्यांपर्यंत पोहोचल्याचा आनंददेखील मोठ्ठा होता.
कातळाचं छत सोडून कोरलेलं आयताकृती टाकं बाजूला ठेवत पुढे निसटलो.
आणि, आम्ही पोहोचलो दुर्गेश्वर लेण्यांच्या मुख्य दालनापाशी. कातळछत सोडून कोरलेल्या दालनात उतरण्यासाठी चार पायऱ्या उतरून दालनाच्या सपाटीवर पोहोचलो. लेणी खोदाईसाठी निवडलेल्या कातळाची 'पोत' काळ्या बेसॉल्टपेक्षा वेगळी होती. हे कारण असेल का, लेणी खोदाई साधी आणि अर्धवट असण्याचं!!!!
५० फूट रुंद - ४० फूट खोल आकाराच्या मुख्य दालनाचे दोन भाग करणारा कातळाचा कठडा, चौकोनी कातून काढलेल्या पुढच्या भागातील धान्याचे उखळ, आतील भागातील छोटी खोली हे निरखलं. गडद गावातले स्थानिक दुर्गेश्वर लेणी पांडवकालीन किंवा (?) रामायणकालीन आहेत, असं म्हणतात.
पुरातन व्यापारी मार्ग ट्रेस करता आला, पण कालनिश्चिती नाहीच जमली...
गुगल नकाश्यांवर भामा खोरं परिसर बारकाईने अभ्यासला. पश्चिम-पूर्व असा व्यापारी मार्ग शोधत गेलो. कोकण-तळातली आंबिवली लेणी - परिसराचा संरक्षक कोथळीगड (प्रसिद्ध पेठचा किल्ला) आणि खुद्द पेठच्या किल्ल्यावरचं विशाल लेणे दालन - घाटमाथ्याला जोडणारी घाटवाट 'कौल्याची धार' आणि ऐन घाटमार्गातली पाण्याची टाकी, पुढे पूर्वेकडे आल्यावर 'दुर्गेश्वर' आणि 'भामचंद्र' लेणी असा हा सगळा मार्ग ट्रेस करता आला. यातली आंबिवली लेणी आणि 'भामचंद्र' लेणी मूळ बौद्धधर्मीय लेणी असली, तरी 'दुर्गेश्वर' लेण्यांमध्ये कुठलेच शिलालेख, स्तूप आणि विहार नसल्याने, या लेणी मूळ बौद्धधर्मीय नक्कीच नाहीत.
मुख्य दालनाच्या लागत दुर्गेश्वराचं देऊळ आहे. वाघोबा - दीपमाळ - नागप्रतिमा - शिवलिंग असं साधं मूर्तीकाम आहे. सातव्या ते दहाव्या शतकातली ही खोदाई असावी, असा माझा अंदाज आहे.
काळ्याकभिन्न कातळाच्या उदरात दडलेला पाण्याचा साठा उलगडून दाखवणारे एखाद टाकं
बिकट कातळमार्गाचं आव्हान पेलून, जगाला अल्पपरिचित अनवट लेणी धुंडाळण्याचा निखळ आनंद अनुभवणारी ट्रेकर मंडळी!!!
मंद वारं सुटलेलं. दूरवर पसरलेली, वाऱ्याच्या तालावर डोलणारी हिरवीगार भातशेती दीठी सुखावत होती...
अजस्त्र कातळाच्या उदरात, निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी, पारंपारिक थोडकी साधने-पद्धती वापरून वर्षानुवर्षे कातळ कोरून लेणी खोदण्याचा उपक्रम कित्येक शतकं "आपल्या सह्याद्रीत" चालू राहिला होता. पूर्वजांच्या या पाऊलखुणा खरंच विस्मयकारक आहेत...
'वर्षावास' किंवा 'वर्षाविहार' म्हणजे पावसाच्या चार महिन्यात आसरा हा मुख्य हेतू आणि जोडीला व्यापार - धर्मप्रचार असे इतर हेतू. म्हणजे आठव्या - दहाव्या शतकापर्यंत लेणी खोदण्याच्या या उपक्रमाला राजाश्रय आणि धनाश्रय नक्की होता. मला कोडं पडतं - की सह्याद्रीच्या कातळात इतकी सगळी लेणी खोदली आहेत, त्यांचा पुढच्या काळात कसा उपयोग झाला असेल... म्हणजे स्वराज्यासाठी शिवरायांनी किंवा पेशव्यांनी किंवा इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारकांनी... आणि, आज... आज, आपल्या मातीत घडलेल्या संस्कृतीचा किती सगळा समृद्ध वारसा निव्वळ अडगळीत पडलाय... कोणी म्हणजे कोणी फिरकत नाही. अंतर्मुख झालो... सोबती पुढे गेलेले... मी हरवलो काही क्षण त्या निशब्द शांततेत........
गडदच्या दुर्गम दुर्गेश्वर लेण्यांचा निरोप घ्यायची वेळ आली होती. परतीचा मार्ग अर्थातंच सोप्पा अजिबात नव्हता.
भामा खो-यात लपलेलं - हरवलेलं अल्पपरिचित लेणं मनापासून अनुभवलं होतं.
आखूड पाय-यांवर कसंबसं उभं राहून (शूज बघा डाव्या कोप-यात) काढलेल्या या फोटोत कदाचित कल्पना येईल, कातळमार्गाची.... चढाईपेक्षा उतराई नक्कीच जास्त आव्हानात्मक होती.
७५ - ९० अंशात झुकलेल्या कड्यामध्ये कोरलेल्या दीड-दोनशे पाय-यांच्या खोदाईने आम्ही थक्क झालेलो...
क्षणोक्षणी कातळाला बिलगून आपण नक्की कशी चढाई-उतराई केली, हे न्याहाळत होतो आणि लेणीमार्ग कोरणा-या कारागिरांचं कवतिक करत होतो...
देवराईमध्ये तुकडी सुखरूप पोहोचलो. 'लाऊडस्पीकरवाले' - निकमदादा यांचे आभार मानून योग्य मानधन देण्यात आले.
ट्रेकच्या अखेरीस सह्याद्रीला अलविदा म्हणून परतीचा प्रवास सुरू करावा लागलाच... डोळ्यांसमोर तरळत होती, दुर्गेश्वर लेणी धुंडाळतानाची थरारक दृश्यं...
...विस्मृतीत दडलेल्या कोण्या भामा नदीच्या खोऱ्यात, पूर्वजांच्या पाऊलखुणा जपणारी आणि थक्क करणारी घाटवाट - दुर्ग - लेण्यांची खोदाई...
...रॉकपॅचवर ऐन ट्रॅव्हर्सवर होल्ड्स मिळवताना खटपट आणि धडधड झाली, ती अजून जाणवत होती...
...कातळावरून निसटत्या पायऱ्यांची न संपणारी शृंखला कशी खोदली असेल, या विचारानं थक्क झालो होतो...
...देवराईमधली निखळ शांतता अनुभवून भारावून गेलो होतो...
...डोंगरकपारीतल्या शिवलिंगास नैसर्गिक जलाभिषेक अलगद घडावा, ही कृती एखाद्या कविमनाच्या भक्ताचीच असणार...
… कधी वेड लागलं घमघमणा-या भातखाचरांच्या गंधानं...
...खरंच, लाभले आम्हांस भाग्य, की वेड लागलं सह्याद्रीचं...
… इतिहास - भूगोल आणि संस्कृती असं काय काय दडवलंय सह्याद्रीनं...

माझा सह्याद्री - विराट!
माझा सह्याद्री - अनाद्यनंत!!
माझा सह्याद्री - अनाद्यनंत!!
छायाचित्रे: साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे
(संदर्भ: http://www.janhindola.com/new/News.aspx?nws=spl&id=000000016)

साई तुझ्या लिखाणाबद्दल आमच्या सारख्यांना आता काही बोलण्याची गरजच नाही कारण तो मान तू गिरीमित्रकडून कधीच मिळवलायस ... बाकी फोटोमध्ये पायऱ्यांचा थरार उत्तम टिपलायस ... लवकरच गडदच्या या दुर्गेश्वरला नक्की भेट देणार
ReplyDeleteधन्यवाद… खरंच मज्जा आली रे या केव्ह्जना... फोटू थरारक वाटताहेत खरं...
Deleteडिस्कवर सह्याद्री अश्या थीममध्ये थोडंफार बघण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. ब्लॉग्ज वाचून दोन-चार ट्रेकर्सना या अनवट ठिकाणांना भेट द्यावीशी वाटली, तरी ब्लॉग लिहिणं वसूल आहे.
Deleteधन्यवाद
Whole information deu shakal ka please
ReplyDeleteनचिकेत:
Deleteब्लॉगवर स्वागत!!!
पायथ्याच्या 'गडद' गावापासून लेण्यांची इत्यंभूत माहिती ब्लॉगमध्ये आहेच.
'गडद' गावी कसं पोहोचायचं, ते ब्लॉगमध्ये नाहीये... खालील माहिती उपयुक्त ठरावी:
१. तळेगाव एम.आय.डी.सी. > नवलाख उंबरे > करंजविहीरे > डावीकडे 'वांद्रे'कडे जाणा-या रस्त्याने भामा आसखेड धरणाच्या बाजूने वहागाव - देशमुखवाडी - कोळीयेमार्गे गडदला पोहोचता येईल.
२. wikimapia:: http://wikimapia.org/#lang=en&lat=18.905749&lon=73.594569&z=17&m=b&show=/31757251
वा... वा... वाह...
ReplyDeleteनेहमी प्रमाणेचं सुंदर फोटो आणि अनवट दुर्मिळ लेण्यांचा माहितीचा पूर्ण खजिना उघड़ केल्या बद्दल त्रिवार धनुर्वाद... __/\__
तुझ्या उत्तम लेखन शैली बद्दल प्रश्नचं नाही... आम्ही तर तुझ्या ब्लॉग चे जुने चाहते आहोत...
तुमच्या भामा खोरयातली मुशाफिरी अशीच चालु राहु दे... आणि आम्हाला व्हर्चुअल ट्रेक चा असाच आनंद मिळत राहु दे...
ब...ढ़ि...या...
दत्त्तू::
Deleteमन:पूर्वक त्रिवार धनुर्वाद :)
अरे, शेवटच्या क्षणी कॅन्सल झालेल्या जम्बो ट्रेकची कसर भरून काढायची होती.. भामा खो-यानं अज्जिबात निराश केलं नाही.. 'डिस्कवर-सह्याद्री' थीमला अनुरूप अनवट लेणी गवसलीच, पण लेण्यांच्या थरारक चढाईची 'किक' भारी होती.
ठिकाण आणि अनुभव भन्नाट, म्हणून काही प्रमाणात ते लिखाणात उतरलं असेल. नाहीतर नुस्ताच शब्दबंबाळ लिखाण उरेल... :)
Sai,
ReplyDeletemasta lihile aahe, thodya vel vatale ki mi hi tithech aahe
very nice, keep it up
Aniruddha Joshi
अनिरुद्ध::
Deleteब्लॉगवर स्वागत.. :)
सह्याद्रीप्रेमींना अनवट ठिकाणाची ई-सफर घडावी, हाच या ब्लॉगचा हेतू आहे.. त्यामुळे, प्रतिक्रिया वाचून खूप आनंद वाटला..
अरे, तू इमर्सनमधला माझा दोस्त अनिरुद्ध जोशी आहेस का?
nice,,,,,,,,,,great,,,,,,,,,,,,,,
ReplyDeletekaka, मन:पूर्वक धन्यवाद :)
DeleteHi Sai, Thanks a lot for sharing your discovery on blog. Article is very nicely written and inspiring. I am planning a trek to Gadad next week. Do I need to carry a Rope and some carabinars ?
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत.. :)
Deleteखूप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून.. विशेषतः, ब्लॉग वाचून 'गडद'ला जावसं वाटलं, हे वाचून आनंद झाला.
'गडद'ला जाण्यासाठी तांत्रिक कातळारोहणाची गरज नाही. प्लीज 'काळजीपूर्वक जावे', ते पुरेसं आहे.
kamal, niwwaL kamal! phaar sundar ani paripoorna varNan kele aahe; khoop khoop dhanyawaad! :-)
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत.. :)
Deleteखूप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून..
आगामी ट्रेक्ससाठी शुभेच्छा!!!
साई तु विंग्रंजांना शोधात मागे टाकशील! अशीच अपरिचीत ( आम्हा पामरांना) ठिकाण वस्पट्या ऊलगडत रहा! Great!
ReplyDeleteतुषार:
Deleteहा हा... Actually, आपण ना संशोधक, ना Indologist…
त्यामुळे नवीन शोध लावण्यापेक्षा, ट्रेक्स करताना दिसलेल्या अल्पपरिचित जागा ट्रेकर दोस्तांबरोबर शेअर कराव्यात, असा या ब्लॉगचा साधा हेतू आहे..
Happy trekking!!!
नमस्कार,
ReplyDeleteसर्व प्रथम आपले सहर्ष स्वागत....यासाठी की, आपण या अद्भुत लेणीला भेट दिली.आणि हे सत्य जगापुढे आणले...मी ह्या गावचा रहिवासी आसून ह्या लेणीला प्रसिद्धीस...तसेच पर्यटनास वाव मिळावा यासाठी माझा प्रयत्न असेल....यासाठी आपले सहकार्य अनमोल ठरेल....
धन्यवाद...!!!
my contact number.9403101028
विठ्ठलभाऊ, धन्यवाद!
Deleteगडदगावची लेणी अद्भूत आहेतच. चांगल्या ट्रेकर्सनी या लेण्यांना सुरक्षितपणे भेट द्यावी, ही इच्छा!
पुनश्च धन्यवाद!
दुर्लक्षित राहिलेलं लेणं प्रकाशात आलं, भेट तर नक्कीच देऊ....
ReplyDelete