... गेले ८-१० वर्षं पुणे - मुंबई एक्स्प्रेस हायवेवरून जाताना, लोणावळ्याजवळच्या एका डोंगरात खुणावायची एक गुहा!!!
कित्येकदा या गुहेबद्दलचा भुंगा मनात गुणगुणत होता - 'ही नुसतीच नैसर्गिक गुहा, की असेल हे अजून एक कातळखोदीव लेणे?' मग प्रत्यक्ष जाऊन, प्रयत्न करूनही या गुहेपर्यंत कसं पोहोचता हेच कळत नव्हतं...
इंद्रायणीच्या खोऱ्यातला अल्पपरिचित लेणेविहार धुंडाळतानाचा हा अनुभव....
एक्स्प्रेस हायवेवरून खुणावणारी गुहा - असेल का हे लेणे?
२००७ पासून एक्स्प्रेस हायवेने मुंबईच्या खेपा वाढल्या होत्या. शिवनेरीतल्या प्रवासात महाराष्ट्र परिवहन महामंडळातर्फे ड्रायव्हरकडे जबाबदारी असायची वोल्व्हो-सारथ्याची आणि प्रवाशांतर्फे माझ्यावर जबाबदारी असायची आजूबाजूच्या सह्यरांगा निरखण्याची, जुने ट्रेक्स आठवायची आणि नवीन ट्रेकपिलान बनवण्याची!
कामशेतजवळ बोगद्याअलिकडे बेडसेलेणे निरखायचं. बोगदा पार झाला की, पवन मावळातून रस्ता आता इंद्रायणीनदीच्या खोऱ्यात - नाणेमावळात - प्रवेशतो. या खोऱ्यातल्या पुरातन संस्कृतीच्या पाऊलखुणा असलेले दुर्ग-घाटवाटा-लेणी - सारंच विशेष मोलाचं वर्ल्ड-क्लास आहे. लोणावळे येण्याआधी सिंहगड इन्स्टीट्युटपाशी एक्स्प्रेस हायवे ९० अंशात उजवीकडे वळतो. थोडं पुढे लोणावळे एक्झिट सोडून, थोडक्या चढावरून एक्स्प्रेस हायवे ९० अंशात डावीकडे वळतो. आणि, या इथेच उजवीकडे समोरच्या डोंगर-कातळात खुणावते - चौकोनी आकाराची एक गुहा!!!
लेण्यात पोहोचायचा पहिला प्रयत्न फसला!
खूप वर्षं लोणावळ्याच्या गुहेने खुणावलेलं. गेल्या वर्षी ठरवलं - बास्स, बघूचयात ही गुहा! जुन्या हायवेवरून लोणावळ्याला पोहोचलो. एक्स्प्रेस हायवेखालून लोणावळे वॅक्स म्युझिअमपाशी पोहोचलो. समोर दिसली 'ती' गुहा! नक्की खोदलेली असावी अशी! उभ्या कातळटप्प्यात डावीकडे उतरत जाणारी डोंगरसोंड आणि माथ्यापासून ५० फूट खाली ती गुहा!
पण गुहेपाशी पोहोचायचं तरी कसं? डोंगराच्या पायथ्याला होता टाटा पॉवरचा मोठ्ठा कालवा आणि त्याच्या दोन्ही बाजूस उंचच उंच दगडी भिंतींचे कुंपण! टाटापॉवरच्या 'वळवण धरणा'तून खोपोलीला पाणी उतरवून जलनिर्मिती करण्यासाठी लागणारं पाणी या कालव्यातून जातं. वॅक्स म्युझिअमपाशी कोणालाच त्या गुहेबद्दल सांगता येईना. "टाटा पॉवरच्या आतून कुठून रस्ता आहे का गुहेकडे जायला" असं विचारायला गेलो, तर टाटा पॉवरच्या गेटवरचे सिक्युरिटी ढम्म - "आम्हांला पावर नाय" म्हणत! एकंदर काय, तर त्या कालव्याच्या भिंतीच्या पलिकडे जाता येत असेल, तरच गुहेपाशी पोहोचण्याचा प्रयत्न करता येणार होता.
बरेच फंडे मारल्यावर अखेरीस - "जमत नाय यार यावेळेस" म्हणत गुहेचा नाद सोडून दिला. शोधभटकंतीच्या पुढच्या ठिकाणांकडे वळलो. पण, लोणावळ्याची ही गुहा मनात ठसठसत राहिलेली...
लेण्यात पोहोचायचा दुसरा प्रयत्न...
दीडएक वर्ष लोटलं, पण डोक्यातला या गुहेच्या विचारांचा भुंगा अधूनमधून गुणगुणत होताच. मोट्ठे ट्रेक्स नसलेल्या एका वीकेंडला गाडी काढून, पुन्हा एकदा लोणावळ्याच्या वॅक्सम्युझिअमपाशी पोहोचलो. मुंबई-पुणे जुन्या रस्त्यावरून आधी एक्स्प्रेस हायवे आणि मग टाटा पॉवरचा कालवा पार केल्याशिवाय गुहेच्या जवळ जात येणार नव्हतं, या अडथळ्यांची उजळणी झाली. वाटलं, जर का गुहेच्या डावीकडे उतरणाऱ्या दांडावर पोहोचता आलं, तर लेण्यात कदाचित जाता येईल. आणि, जर का हा डोंगरदांड एक्स्प्रेसवेला थेट येऊन भिडला असेल, तर एक्स्प्रेसवेलाच रस्त्याच्या कडेला गाडी लावून, डोंगर चढून गुहा बघता येईल का, रॉकपॅच चढावा लागेल का असल्या वाट्टेल त्या शक्यतांचा विचार करून झाला.
आणि मग शेवटी साक्षात्कार -'युरेका क्षण' आला - गूगल नकाशा आणि समोरचा डोंगर बारकाईने निरखल्यावर लक्षात आलं, की कदाचित मार्ग निघतोय....
जुन्या हायवेने लोणावळ्याकडे निघालो. उजवीकडे स्वामी नारायणी धाम मंदिराचा रस्ता घेतला. टाटा पॉवरचा कालवा पार करायला तर पूलंच मिळाला. चला एक मोठ्ठा अडथळा पार झालेला. एक्स्प्रेस हायवे जवळ आल्यावर, तो पार न करता अलिकडूनच कच्च्या रस्त्याने उजवीकडे गेलो. गाडी पार्क करून हायवेच्या खालून कैवल्यविद्यानिकेतन नावाच्या शाळेपाशी गेलो. हे असं...
शाळेच्या सिक्युरिटीकडे गुहेची चौकशी केली, तर कळलं - "हां, आहे खरं एक गुहा. ही शाळा सुरु केली त्या स्वामींची. शाळेच्या ग्राऊंडच्या पलिकडून जाते बघा वाट".
पाहतो तो काय, गारेगार दाट झाडोऱ्यातून चढणारी मस्त नागमोडी वाटच मिळाली. आणि, चक्क साध्या पायऱ्या बांधलेल्या. कोवळया उन्हाची किरणे निसटून पायऱ्या उजळवत होती.
रानफुलं बहरलेली, त्यांचा घमघमाट प्रसन्न करत होता.
काही वर्षांपूर्वी बांधली असावी अशी दगडी कमान!
कमानीतून पुढे जात, आडव्या वाटेवरून झपझप गेलो आणि समोर आली... समोर आली ती गुहा, जी कित्येक वर्षे खुणावत होती!!!
पहिल्या दर्शनातच ही नैसर्गिक गुहा नसून, कातळकोरीव लेणे आहे, हे दृष्टीक्षेपात पडलं. आम्ही आनंदाने चित्कारलो, "हुर्रे.. सापडलं लेणं!!!"
६ फूट रुंद, ६ फूट उंच असा प्रवेश असलेला विहार.
समोर एक बाक. आणि डावीकडे एक बाक.
शिलालेख, स्तूप, धर्मचिन्हे - काहीच नाहीत.

विहाराचं निरीक्षण करून बाहेर पडलो.
पायथ्याच्या योगप्रशालेतील शिक्षिका आणि १५-२० चायनीज पर्यटक विहार बघायला आलेले. त्यांच्याशी दोन शब्द बोलून परतीच्या वाटेवर निघालो. फालतू कोटी करायला निमित्त मिळालेलं, "२०१७ मध्ये आपण ऑफबीट म्हणत जिथे पोहोचतोय, तिथेही चायनीज पोहोचताहेत. इथेही चायनीज स्पर्धा!"
शाळेपासून एक्स्प्रेस हायवेखालून परत निघालो. कैवल्यविद्यानिकेतन शाळेला "धन्यवाद" खरंतर आम्ही म्हणत होतो, कारण शाळेच्या रस्त्यामुळेच एक्स्प्रेस हायवे आणि टाटापॉवरचा कालवा पार करून, इंद्रायणी लेण्यापर्यंत पोहोचणे शक्य झालेले...

अल्पपरिचित लेणी धुंडाळण्यात खर्ची पडलेल्या कॅलरीजची भरपाई करण्यासाठी, लोणावळ्याच्या सुप्रसिद्ध 'बुवाच्या मिसळी'ला न्याय देण्यात आला. लेणी-दर्शन आणि मिसळ-आस्वाद अश्या दुहेरी उल्हासाची ढेकर देण्यात आली.
परतीचा प्रवास सुरु झाला... पण, लेण्यांसंबंधी मनात अनेक प्रश्न अजून बाकी...
१. का:: काय हेतू या विहाराचा? कोण्या ध्यान करणाऱ्या साधकासाठी असेल हा विहार?
२. कोणत्या विशिष्ठ धर्माची: या परिसरातली कार्ले-भाजे ही बौद्ध लेणी. पण, इथे कुठलीच धर्मचिन्हे-शिलालेख-स्तूप नाही.
३. इथेच का: इंद्रायणी खोऱ्याचं दूरवर दर्शन होईल, अशी अत्यंत मोक्याची जागा. इंद्रायणीच्या खोऱ्यातून तळेगावमार्गे जुन्नरकडे किंवा पुण्याकडे जाणारा हा मार्ग नक्की पुरातन मार्गावरची. याचा काही संबंध विहाराच्या स्थानाशी?
४. काळ: कधी खोदवलेली असतील ही लेणी?
५. कोणी: कोणी खोदवलेली असतील ही लेणी? कुणाच्या धर्माश्रयाने/ राजाश्रयाने झाले असेल हे कृत्य?
६. विलग की कार्ले समूहातील: कार्ले लेणे परिसरातील हा एकांडा विहार, की अजून इथे काही ठिकाणी विहार आहेत?
७. कसं: इतकी चांगली खोदाई जुन्या काळात.. कोणती साधनं-टूल्स वापरून केली असेल?
ट्रेकर्स म्हणून आम्ही तुडुंब समाधानी, पण अभ्यासकांकडून या लेणी समजावून घ्यायला आवडतील...
----------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ब्लॉगपोस्टचा हेतू "आम्हीच नवीन लेणे शोधले", असा अजिबात नाही. ट्रेकर-इंडॉलोंजिस्ट दोस्तांबरोबर अनुभव शेअर करणे हा आहे. लेण्यांबद्दल अधिक माहिती/ आधीचे संशोधन/ डॉक्युमेन्टेशन कोणाकडे असेल, तर अवश्य अवश्य कळवा.
२. या लेण्याना विशिष्ट नाव नसल्याने किंवा मला माहिती नसल्याने, मीच याला "इंद्रायणी लेणे" असं नाव ठेवलंय. प्रचलित नाव काही दुसरं असेल, तर समजावून घ्यायला आवडेल.
३. स्थान: Coordinates: 18°45'52"N 73°25'18"E
४. ट्रेक मंडळी: निनाद बारटक्के, दिलीप वाटवे, दिलीप गपचूप
५. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
६. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१७. सर्व हक्क सुरक्षित.

Superb description. Precise and detailed.
ReplyDeleteलवकरच मोर्चा वळवावा लागणार इकडे
धन्यवाद मित्रा!
Deleteअवश्य भेट द्या.. कोण जाणे, तुम्हांला काहीतरी अजूनही वेगळं सापडेल.. :)
सुंदर !!!!
ReplyDeleteअजय धन्यवाद! :)
DeleteWah!
ReplyDeleteThanks a lot, Sir!
Deleteमस्त रे साईदा, उत्सुकता वाढवलीस
ReplyDeleteहो रे.. गूढ पण इंटरेस्टिंग प्रकार आहे या आणि अश्या मावळलेणी!
Deleteमस्तच! अभिनंदन एक नवीन ठिकाण अभ्यासकांना शोधून दिल्याबद्दल. आता या लेणीबद्दल आणखी माहिती उजेडात यावी आणि ती लवकरचं तुझ्या या ब्लॉगमधे उपडेट होऊन आम्हाला वाचायला मिळावी
ReplyDeleteThanks a lot, Vinit! :)
DeleteYes, even I am eager to understand the hidden meaning/ purpose of these caves...
सुंदर ! तुमच्या मनातले असे भुंगे आमच्या सारख्या भटक्यांसाठी पर्वणी ठरतात. धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद दोस्ता!
Deleteभटकंतीचे हे भुंगे तुमच्याही मागे लागोत आणि नवीन ठिकाणं गवसावीत, अश्या शुभेच्छा!
Well,again nice exploration.
ReplyDeleteThanks a lot, Yogesh! Glad you liked it..
Delete😀👌👌👌👌👣👣👣👣👣
ReplyDeleteखुपच छान दादा
ReplyDeleteधन्यवाद दादा!! :)
Delete