उन्हाळ्यातली पण गर्ददाट जंगल-सावलीतली, दमवणारी पण भारावून टाकणारी अशी कोळेश्वर-कमळगडची कसदार डोंगरयात्रा आनंदयात्रा..
... घाटमाथ्यावर पोहोचल्यावर आसमंत हरवून गेला होता पूर्व-मॉन्सून ढगांच्या उसळलेल्या लाटांमध्ये. 'ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास' ते दृष्य दिसणार की नाही, अशी हुरहूर लागलेली. अवचित एका क्षणी भर्राट रानवाऱ्याच्या झोताने ढगांना पिटाळले. अन, कृष्णमेघांच्या सावलीत अस्ताव्यस्त उभ्या-आडव्या पसरलेल्या डोंगररांगांचं विराट दृष्य सामोरं आलं. अंगावर सुखद शहारा आला...
... ऐन वैशाखवणव्यात करपलेल्या टेपावरून आडवं जात होतो. नदीच्या पात्रापल्याड नागमोडी घसरड्या वाटेचा भूलभुलैया पार करताना जीव कासावीस झाला होता. थोरल्या कातळाला वळसा घातला आणि थबकलोच... समोरच्या डोंगरउतारांवर अस्स्सल ठेवणीतला गर्द रानवा दाटलेला. झाडीभरल्या डोंगरउतारांचं कवतिक तहान-भूक-वेळ विसरून डोळ्यात साठवत होतो... हे सग्गळं असंच राहो, आपलीच नजर ना लागो...
... या आणि अश्या काही दुर्मिळ क्षणांची अनुभूती आली आमच्या 'कोळेश्वर'च्या ट्रेकमध्ये. कोळेश्वर आहे वाई प्रांतात. उत्तरेकडून सुरुवात केली, तर एकापाठोपाठ एक अशी रायरेश्वर - कोळेश्वर - महाबळेश्वर अशी अजस्त्र पठारे पसरली आहेत. १३०० मी पेक्षा जास्त अशी काय त्यांची उंची, काय ते हजार मीटर खोलीचे कोकणकडे, कसल्या त्या देखण्या घाटवाटा, माथ्यावरचा काय तो गच्च रानवा आणि या साऱ्यांमध्ये वसलेलं एखादं अनघड पण जागृत शिवालय! इतिहासातल्या जावळीच्या मोरेंचा हा प्रांत आणि शिवरायांच्या अतुल्य शौर्य-कर्तृत्वाचा हा प्रांत. या अजस्त्र पठारांवर दुर्ग नाही, पण आसपासच्या छोट्या मोक्याच्या डोंगरावर दुर्ग आहेत. जसे की, रायरेश्वरशेजारी केंजळगड, महाबळेश्वरशेजारी प्रतापगड आणि कोळेश्वरशेजारी कमळगड!
अश्या तालेवार पठारांपैकी कोळेश्वरचं पायथ्यापासून दर्शन घेण्यासाठी आणि मैलोन्मैल झाडीभरल्या माथ्याला भेट देण्यासाठी, एप्रिल-मे महिन्यात केलेल्या आमच्या परिक्रमेचा हा संक्षिप्त वृतांत:
दिवस १.
- जांभळी जंगलातून कोळेश्वरच्या पश्चिम कड्यांचे पायथ्यापासून दर्शन
- जांभळी ते वासोळे कोळेश्वरचे पायथ्यापासून दर्शन
- वासोळे ते कोळेश्वरचे आग्नेय टोक असलेल्या कमळगडाकडे चढाई. जवळच्या माडेगणी गावापर्यंत.
दिवस २.
- माडेगणीवरून कमळगड दर्शन
- कोळेश्वर पठार माथ्यावरून तुडवून कोळेश्वर राऊळ
- कोळेश्वर दाराने उतरून परत जांभळीत उतराई
दिवस ३.
- किरुंडेमधून कोळेश्वर दाराने कोळेश्वर राऊळ
- माथ्यावरून पठार तुडवून पश्चिम टोक दर्शन
... एके दिवशी कोळेश्वरच्या दर्शनाच्या ध्यासाने पहाटेच कूच केलेलं. वाईला संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या पात्रात प्रतिबिंब पडलं होतं, कोवळ्या उन्हांत उजळलेल्या ढोल्या गणपतीच्या कळसाचं.
वाई वेशीच्या सागवानी द्वारातून बाहेर पडून रस्ता नागमोडी वळसे घेत मेणवलीला आला. पांडवगड आणि केंजळगडचं सुरेख दर्शन.
धोम धरणाच्या ओहोरत चाललेल्या जलाशयापल्याड कोळेश्वर रांगेचं आग्नेय टोकावरचे नवरा-नवरी-वऱ्हाड सुळके (म्हातारीचे दात) आणि झाडीतला कमळगडाचा कातळमाथा खुणावत होता. जलाशयातलं पाणी कमी झाल्याने कुठलीशी जुनी वास्तू पाण्यातून मोकळी झालेली.
जांभळीच्या अलिकडे वडवली गावात रस्त्याशेजारीच्या मंदिराबाहेर वीरगळ आणि गजलक्ष्मी शिल्प मांडून ठेवलेले.
जांभळी जंगलातून कोळेश्वर दर्शन
ट्रेकच्या पहिल्या टप्प्यात आम्ही वाळकी नदीच्या खोऱ्यातल्या शेवटच्या 'जांभळी' गावात पोहोचलो आणि कोळेश्वरच्या डोंगरउतारांचं दर्शन घ्यायला भटकत निघालो. रानाचे देखणे टप्पे. आणि माथ्याकडे झेपावणारा एखादा गरूड. वेळ सकाळचे ८:१४.
फॉरेस्टच्या परवानगीने वाळकी नदीच्या उगमाकडच्या रानाची भटकंती केली.
रानातल्या रहिवाश्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.
कोळेश्वर रांगेच्या पश्चिममाथ्याचे दूरदर्शन, कोकणात कोसळलेले कडे, तळाशी डोंगरगर्दीत हरवलेला बेलाग चंद्रगड, देखण्या ढवळेघाटाची वळणवाट, महादेव मुऱ्हा असं बरंच काही...
पूर्वेला अथांग वैभव आणि कोळेश्वरचे झाडीभरले डोंगरउतार ...
रानातल्या रहिवाश्यांच्या पाऊलखुणा. गव्याची चाहूल.
जांभळी गावात परतलो. वेळ दुपारचे १२:४५. गावातल्या मंदिराबाहेर अनेक वीरगळ आणि कोरीव खडक. वाळकी नदीचे हे खोरे नक्कीच वीरांचे.
जांभळी-वासोळे. कमळगड पठार (माडेगणी) चढाई
जांभळी गावात गाडी ठेवली. पेटलेल्या उन्हातून डांबरी रस्त्यावरून चालत ९-१० किमी असह्य लांब अंतर तुडवताना घामटे निघाले. शेवटच्या २-3 किमी मध्ये जिपडं मिळालं आणि कोळेश्वर पठाराचे पायथ्यापासून दर्शन घेत पूर्व/आग्नेय पायथ्याचे वासोळे गाव गाठले. वेळ ४:३०.
वासोळे गावातून थेट कमलगडाकडे चढण्याऐवजी बाजूच्या माडेगणी गावात मुक्कामाचे आग्रहाचे आमंत्रण आणि वाटेवर सोबतही मिळाली. किराणा सामान डोक्यावर वाहून नेणारे वाशिवले मामा आणि दोन भूभू.
उन्हं कलंडायला लागलेली. सकाळीची पश्चिमेची जांभळीची दाट झाडी, तर आता पूर्वेला जेमतेम २० किमीवर रखरखीत वणव्याने काळवंडलेल्या डोंगरसोंडा.
सांजेप्रहरी घरी निघालेल्या गाई-गुरांसोबत आम्ही माडेगणीच्या निवांत वाटेवर...
माडेगणीपासून कमळगडाच्या उतारांचे देखणे दृश्य
आडव्या मळलेल्या वाटेवरून कमळगड रांगेचे दृश्य. मावळतीच्या उन्हाने रापलेले उतार.
माडाच्या झाडांपासून जननीच्या गर्ददाट देवराईपाशी आलो. संध्याकाळचे ६:२०. देवाच्या थंड पाण्याने सुखावलो. पल्याड निवांत वाडी - माडेगणी. प्रेमळ गावकरी. शहरात बसून आपल्याला काही म्हणजे का-ही-च अंदाज नाही, इथल्या जगण्याची-कष्टांची-आव्हानांची! कंपनीतल्या वेंडिंग मशीन चहाबद्दलची कुरकुर कुठे आणि पिण्याच्या पाण्याची घागर अर्ध्या मैलावरून आणतानाचे कष्ट कुठे! मोबाईल्स-टीव्हीमुळे आधुनिक जगाची स्वप्ने दिसताहेत एकीकडे, तर दुसरीकडे मुलभूत गरजांसाठीची लढाई - अश्या विचित्र स्थितीत हे आणि अशी कैक गावे.
जननीला दंडवत घालून देवराईतल्या राउळात झोपू म्हटलं, तर ही भली मोठ्ठी इंगळी. मुकाट्याने वाडीत शाळेत मुक्कामाला आलो.
माडेगणीहून कमळगड-कोळेश्वर खिंडीची तासभर चाल होती. कोवळ्या उन्हातली दृश्ये आणि आडवी सुरेख वाट.
प्रत्येक वळणावरून मोहवणारं कमळगडचं दर्शन
खिंडीतल्या झुडुपांमधून वाट गोरक्षनाथ मंदिरापाशी घेऊन गेली. नाथांच्या प्रतिमा आणि पंचलिंगी शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण होते.
अफलातून दाट रानवा कमळगडाकडे घेऊन गेला.
मोकळवनात आलो. झाडीने मढवलेला गडाचा कातळमाथा.
१० मिनिटाच्या चढाईनंतर कातळातल्या 'चिमणी' भेगेतून दुर्गप्रवेश करावा लागतो. लोखंडी शिडीमुळे सोप्पं प्रवेश सोप्पा झालाय. द्वारापासून पूर्वेला दिसणारा रानवा आणि चमकणारे धोम धरणाचे पाणी.
दुर्गाच्या माथ्यावरची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कावेची विहीर.
विहिरीत पाणी नाही. ६०-७० फूट ओलसर मातीने माखलेल्या पायऱ्या उतरत गेल्यावर विलक्षण थंड आणि गूढ शांतता.
हवेत ओलसर मातकट थंडपणा. सह्याद्री आणि दुर्गरचनेतली अनोखी जागा. नीरव शांतता आणि गूढरम्य सौंदर्य मनोमन अनुभवलं.
माथ्यावरून नैऋत्येला महाबळेश्वर आणि वायव्येला झाडीभरलं कोळेश्वर पठार खुणावताना. पायथ्याला बलकवडी धरण आणि मागे जोर गाव लपलेलं.
कमळगडवरून कोळेश्वर पठार तुडवताना
कमळगडाच्या वाडीवर चहा घेऊन गोरखनाथ खिंडीत आलो. कोळेश्वर पठाराच्या भटकंतीचे वेध लागलेले. खिंडीतून डावीकडे बलकवडी आणि उजवीकडे तुपेवाडीच्या वाटा सोडल्या. समोरची पण उजवीकडे चढाई करणारी कोलेश्वरची वाट पकडली. पाठीमागे बघून कमळगडाचा निरोप घेतला. वेळ ९:३०.
सरावलेले पाय, दमदार डोंगरभिडू आणि भर उन्हाळ्यातली कोळेश्वरची गर्द झाडोऱ्यातून मैलोन्मैल चाल. शुद्ध आनंदयात्रा!!! वेळ सकाळचे ११.
कोळेश्वरचा माथा डावीकडे ५० मी उंचावर ठेवत उजवीकडून (उतरेकडून) वाटचाल असते. एकापाठोपाठ लागलेल्या कोळेश्वरच्या तीन छोट्या टुमदार वाड्या. वाडीत कोण्या एकाकडे लग्न, म्हणून वाशी मंडईत काम करणारे बाप्ये गावी मदतीला आलेले. 'ह्ये असं डोंगरावरचं गाव आमचं. सगळ्यांनी हात लावला तरंच कार्य व्हायचं'. वाडीत अत्यंत आपुलकीने स्वागत झालं. जेवायला थांबायचा आग्रह झाला. म्हटलं, 'दादा, कोळेश्वर देवाला जायचंय'. दादा - 'बाब्बो. हां हां.. लय रनिंग हाय. मंग निघा बिगीबिगी...' वेळ ११:२३.
तिसऱ्या वाडीपाशी झाडीमधून भगवा ध्वज डोकावत होता. असनेश्वर महादेवाचे साधे शांत राऊळ गवसलं. अनघड देव, मुखवटा. बाहेर भंगलेले २ वीरगळ. वासोळे खोरे वीरांचेच खरे.
रानातून धावणारी अफलातून चाल. कोळेश्वर मंदिर कुठे असेल, त्याचा अंदाज येणं शक्यच नाही. कमळगड खिंडीपासून सातत्याने खुणेचे बाण आपली साथ करतात. पाचोळा चुबुकचुबुक करत रानवा अनुभवत चाल.
जेवण आणि विश्रांतीनंतर परत चाल सुरु. दुपारचे १:४५. अधूनमधून मोकळवन. लग्गेच रटरटणारे ऊन जाणवत होते. नेच्याच्या माळामधून वळणवाट. गेले कित्येक मैल डावीकडे कोळेश्वर माथ्याने आपल्याला साथ दिलेली. आता मात्र मोकळ्या माळावरून मागे महाबळेश्वर डोकावू लागलेलं. डावीकडची वाट कृष्णा खोऱ्यात 'जोर' गावात. खुणेच्या बाणांनी जोरची दिशा पकडली, तर आम्ही उजवीकडे कोळेश्वर राउळाची. खिंडीत समाधी स्मारकाचा कोरीव दगड. कोणीतरी कधीतरी नारळ चढवलेला.
नेच्याच्या माळापल्याड वळत गेलेलं कोळेश्वर पठाराचे पूर्व टोक दिसले. दुपारचे १:५०.
वणव्याने करपलेलं रान. उन्हाचा ताव. सर्व काळजी घेऊनही, अतिरिक्त ऊन आणि चालीमुळे पायाला अगणित भीषण ब्लिस्टर्स आलेले.
अवीट रानव्याचे टप्पे. थंडगार वाटा आणि जैववैविध्य. पुसट मळलेली वाट.

दुपारचे २:५३. जांभळी-कढीलिंबाच्या झाडात वसलेल्या 'कोळेश्वर राउळा'पाशी पोहोचलो. थंड शांत निसर्गदेव, अख्खा कोळेश्वर पठार त्याची देवराईच म्हणायची.
१५ किमी रानोमाळ चाल करून, पोहोचल्यावर वाटलं - 'याचसाठी केला होता अट्टाहास'. अनघड कातळातला देव मनोमन वंदिला.
कोळेवाडीत कोऱ्या चहाने तरतरी आली. वाडीच्या पूर्वेला केंजळगड, वाईपर्यंत दूरवरचा आसमंत, अखंड कमळगड-कोळेश्वर पठार आणि धोम धरणाचे विहंगम दृश्य. एप्रिलमध्ये हे असे दृश्य. वेळ दुपारचे ४.
कमळगडावरून कोळेश्वर पठार कित्ती कित्ती कित्ती चाललो याचा लेखाजोखा मांडला.
उत्तरेला रायरेश्वर पठार मोठ्ठ विलक्षण दिसत होतं. खुणावत होते.

कोळेश्वर दारातून जांभळीची उभी उतराई
कोळेश्वर पठाराचा कातळमाथा उतरण्यासाठी कातळातून भन्नाट घळीची वाट आहे, त्याला 'कोळेश्वरचे दार' म्हणतात.
अनघड साध्या बहुदा नैसर्गिक असाव्यात अश्या पायऱ्या उतरत, कोळेश्वरचे दार उतरू लागलो.
उजवीकडे आडव्या वाटेवरून किरुंडे गावाची मळलेली वाट सोडली. डावीकडे कमी मळलेली गवतात लपलेली वाट होती जांभळीची. गच्च गच्च रानवा.
टेपावरून दिसणारे अजस्र रायरेश्वर पठार. खोलवर जांभळी गाव. डोंगरउतारावरचे शेताडीचे टप्पे. जांभळीचे छोटे धरण. भर्राट वारा. वाळलेले सोनेरी गवत. दुपारचे ४:५६.
गच्च गवतातून उतरणारी जांभळीची झक्कास वाट. 
कोळेश्वर पठार ते जांभळी ही ५५० मी उतराई. घसारा नाही. पण अतिशय तीव्र दमवणारा उतार.
डोंगर उताराने थकणे म्हणजे काय, हे जांभळीच्या वाटेवर अनुभवले. वेलींच्या गुंत्यातून पल्याड वाट निघाली.
कोळेश्वर माथ्याकडून जांभळीला उतरणारी देखणी वाट डावीकडच्या धारेने उतरली. वेळ संध्याकाळचे ६:३२.
किरुंजे गावातून कोळेश्वर राउळाकडे चढाई
किरुंजे हे कोळेश्वर पठाराच्या पूर्वेचे गाव. गावातून कोवळ्या उन्हात उजळलेले कोळेश्वर पठाराचे टप्पे. वेळ सकाळचे ८. वळवाचा पाऊस झाल्याने आणि आभाळात पूर्वमॉन्सून ढगांची धम्माल रंगायची शक्यता असल्याने, कोळेश्वर पठाराचे वेगळे रूप दिसेल का, अशी जबरदस्त उत्सुकता मनात दाटलेली.
शेताडीमधून चढत जाणारी आणि पुढे निवांत दांडाने कोळेश्वरच्या पूर्व कातळमाथ्याच्या पोटात आलो. उजवीकडे आडवं जात 'कोळेश्वर दारा'तून माथ्यावर वाट जाणार होती.
जांभळीच्या मानाने किरुंजेची वाट सोप्पी, कमी चढाईची. मिलिंदला एक भेकर रानात धुम्म पळताना दिसलं. रायरेश्वर पठार - केंजळगड - धोम धरण - कमळगड - कोळेश्वर पठार यांची परत एकदा गळाभेट घेतली. वेळ ९:३५.
वळवाच्या पावसाने बीज अंकुरलेले. माळावर मोहक हिरवा तजेला. आम्ही तुडवलेल्या कमळगड - कोळेश्वर पठाराच्या तंगडतोड चालीचे अफाट दृश्य त्या माळाच्या पार्श्वभूमीवर.
कोळेश्वर पश्चिम टोक भेट
कोळेवाडीपासून कोळेश्वर राऊळाकडे जाताना जांभळाच्या रानव्याचे रंग-रूप पावसाने पालटलेले. झाडांवर खोडांवर किंचित शेवाळे.
पाण्याच्या झऱ्यापासून पुढे आलो. माथ्याचा डोंगर ५० मी उजवीकडे ठेवत आडवी जाणारी वाट होती. शिंदीच्या झाडांमागे उजवीकडे रायरेश्वरवरचे ढग क्षणभर हलले. भटक्यांच्या दुनियेत विशेष स्थान असलेल्या 'नाखिंद टोका'चे दर्शन झाले. अश्या क्षणी नेमका कसा-किती-काय आनंद होतो, हे समजायला ट्रेकरचेच हृदय हवे. :)
कोळेश्वर पश्चिम टोकावरून दक्षिणेला महाबळेश्वरचा झाडीभरला माथा, मधु-मकरंदगड आणि प्रतापगड ढगांशी लपाछपी खेळताना. दणदण ढगांमुळे आम्हांला कोकण दृश्य बघायला मिळणार की नाही, अशी शक्यता वाटू लागलेली.
कोळेश्वरचे उत्तर-वायव्येचे करकरीत थरारक कडे. रायरेश्वर नाखिंदटोक ढगांशी खेळताना क्षणभर दर्शन देऊन परत हरवलेला. ऊन-सावलीत दुर्गाडी, महादेव मुऱ्हा आणि लपलेली कामथेघाटाची अस्वलखिंड.
कोळेश्वरचे झाडीच्या टप्पापल्याड आम्ही भेट दिलेली जांभळी खिंड.
मंगळगडच्या अलिकडे महादेव मुऱ्ह्यावर ढगांची झुंबड उडलेली. ढग आणि सह्याद्री या तुल्यबळ शक्तींनी मॉन्सून यायच्या आधी एकमेकांना जोखणे सुरू केलेलं.
कोळेश्वर पश्चिम टोकावर उतरंडीचे गच्चगच्च रान आहे. ढवळेघाटाच्या जवळून व्हूसाठी लय फाईट मारली. अशक्य वस्पटी आणि गव्याचे ताजे ठसे शेण यामुळे नाद सोडला. थोडं अलिकडून ढवळेघाटाचे सुरेख दृश्य मिळाल्याने फार वाईट वाटले नाही. लाडक्या ढवळे घाटातल्या खुणा - घुमटी, सुळका टोकाची टेकडी आणि माथ्याची धार - भेटल्याने जुन्या ट्रेक्सच्या आठवणी जाग्या झाल्या. वेळ दुपारचे १२:४०.

कोळेश्वरचे सोबती - महाबळेश्वरचे पठार. मढीमाळ-आर्थरसीट टोक. कधीतरी फिरकणारे एखादे भटके मंडळ
परतीच्या वाटेवर ढग दाटलेले. कोळेश्वरवरच्या एका अनोख्या जागी पोहोचलो. उत्तरेला दर्शन झाले राजगडचा बालेकिल्ला आणि सिंहगडचे. (मिनिटभर पुढून दुर्ग तोरण्याचेही दर्शन झाले.)
तिथून अजून एक भन्नाट दृश्य. रायरेश्वरचे नाखिंद टोक आणि पल्याड चक्क दुर्गदुर्गेश्वर रायगड!
पावसाच्या सरीने हवेत कुंद गारवा. गच्च जांभळीच्या झाडोऱ्यातून विलक्षण सुंदर वाट. कोळेश्वर देवाचे दर्शन घेतले.
'कोळेश्वर' परिक्रमा सुफळसंपूर्ण करताना निसर्गदेव पावला म्हणायचे. देखण्या ऑर्किडची खूण पटली.
कोळेवाडीपाशी कृष्णमेघांची दाटी झालेली. भाऊराव लक्ष्मण खुटेकर यांच्या गवताने शाकारलेल्या घरातून आलेला वाफाळलेला कोरा चहा - अमृततुल्य होता.
ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात कोळेश्वरच्या पूर्व टोकावर वाळकी नदीच्या खोऱ्याचे अफलातून दृश्य सामोरं आलं. मॉन्सूनपूर्व ढगांची विलक्षण नक्षी खोऱ्यात विखुरलेली.
कोळेश्वरच्या प्रेमाने ध्यासाने आम्हांला या परिक्रमेला खेचून आणलं होतं. आणि कोळेश्वरनेही भरभरून देऊ केलेलं.
रौद्रविराट सह्यदर्शन आणि अनोखं दुर्गदर्शनदेखील...
एकीकडे गर्द-गच्च रानवा, तर दुसरीकडे वणव्याने करपलेलं रान...
हा प्रांत जावळीच्या रसरशीत इतिहासाचा, वीरांच्या कर्तृत्त्वाचा ह्याची जाणीव करून देणारे वीरगळ ठिकठिकाणी...
कधी वैशाखवणवा, तर कधी वळवाच्या पावसाचा शिडकावा...
कधी आभाळातल्या ढगांच्या रांगोळीचा नजरा...
दमावणाऱ्या-मळलेल्या-फसलेल्या-घसरड्या वाटांची जवळीक...
एकीकडे गावकऱ्यांच्या आपुलकीचा अनुभव, दुसरीकडे गावांतली गरिबी आणि जातसंस्था कित्ती जास्त रुतलीये याचा अनुभव...
रानात तग धरून असलेले गिरीजन, आणि रानात आजही टिकून असलेलं जैववैविध्य...
मैलोन्मैल गर्द झाडोऱ्यातून पाचोळा चुबुक-चुबुक करत जाण्याचा आनंद, तर कुठे उन्हाळ्यातही टिकून असलेल्या नितळ झऱ्यांचे पाणी पिऊन तृप्त होणं...
जांभळीच्या गच्च सावलीत जांभ्या खडकात स्थापिलेल्या अनघड देवतेचं भारावून टाकणारे दर्शन...
...या आणि अश्या कितीतरी क्षणांमधून कोळेश्वर आणि आमची गळाभेट झालेली. कोळेश्वरने आम्हांला तृप्त केलेलं. समृद्ध केलेलं. कृतज्ञ आहोत.
-----------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेक मंडळी: मिलिंद लिमये, अमेय जोशी, पियुष बोरोले, साईप्रकाश बेलसरे
२. छायाचित्रे: साईप्रकाश बेलसरे
३. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
४. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१७. सर्व हक्क सुरक्षित.

माडेगणीवरून कमळगड आणि दुर्गदर्शन
दुसऱ्या दिवशी माडेगणीला अलविदा केलं. उगवतीच्या उन्हांत वाडीला जाग येऊ लागली. सकाळचे ६:३०.

Superb...just amazing...I liked the videos as well
ReplyDeleteSome areas are totally untouched
विराग, thanks a lot buddy..
DeleteYes, बराचसा भाग अनवट आहे आणि ट्रेकर्ससाठी मेजवानी 👍👌☺️
धन्यवाद :)
झकास... महाबळेश्वर-कोळेश्वर-रायरेश्वर हे तिन्ही पठार प्रयेक भेटीत कायमचं काही ना काही देत असतात...
ReplyDeleteफोटोज अफलातून आणि व्हिडियो मुळे ब्लॉग वाचताना प्रत्यक्ष तिकडे असल्याचा भास निर्माण झाला...
मलबार व्हिसलिंग थ्रश चा आवाज एका व्हिडियो मध्ये मंत्र-मुग्ध करतो...
एकंदरीत भन्नाट ट्रेक आणि भन्नाट ब्लॉग वृत्तांत...
ब...ढि...या...
Completely agree..
Deleteअरे हो, यंदा प्रथमच videos चा experiment केलाय फोटोब्लॉगसह..
Phenomenal region..
great flora and fauna...
तुफान तंगडतोड चाल..
धन्यवाद :)
भारीच खेची ट्रेक. कोळेश्वराचा पश्चिमकडा आणि कमळगडाची वाट पुन्हा खुणावतेय. खुप आधी एकदा तोरण्यावर गेलो असताना, रायरेश्वर कोळेश्वर आणि महाबळेश्वर या तिन्ही पठाराचे अगदी ठळक दर्शन घडल्याचे अजुनही आठवते.
ReplyDeleteयोगेश, thanks a lot..
Deleteहो रे, आसमंतातील डोंगरभाऊ भेटले की बरं वाटतं.
खरंय, कोळेश्वर जादुई जागा आहे, परत परत भेट देत रहावी अशी.. ☺️👍👌
साई, खुपचं छान लेख
ReplyDeleteअनुपकाका, खूप धन्यवाद :)
Deletevery nicely written...
ReplyDeletewhich camera n lens do you use?
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद!
ReplyDeleteI use Sony interchangeable camera A6000, 35" prime lens. Also, heavily use cell phone camera, which is convenient on treks.. Thanks!
कोळेश्वर पठारावरून रायगड,राजगड,तोरणा,सिंहगड,प्रतापगड,मकरंदगड आणि चंद्रगड खरंच दिसतात का?
ReplyDelete१०१%. जबरदस्त जागा. फोटू जोडले आहेतच. तुम्ही अवश्य भेट द्या.. धन्यवाद!
Deleteसाई,
ReplyDeleteफोटो, व्हिडियो आणि लिखाण सगळंच छान. लिखते रहो. 👍
आनंदकाका, प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद! :)
Deleteवैशाख वणव्यात दाट हिरवळीतुन तंगडतोड म्हणजे सुखच....😍😍
ReplyDeleteमित्रा, खरंय - उन्हाच्या तडाख्यानंतर येणाऱ्या रानव्यामुळे भन्नाट ट्रेक.. प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद! :)
Delete