नाणेमावळातलं
जिग-सॉ कोडं
----------------------------------------------------------------------------

लेण्याबाहेर विसावलो. वारं खात लेणे इथेच का खोदलं असावं, यावर गप्पाष्टक रंगलं. समोर
ईशान्येला कार्ले लेणे आणि त्याच्या आसपासची आधुनिक वस्ती-इमारती-गजबज दिसत होती.

हे लेणे कार्ले लेण्याच्या परिसरातील ध्यानगुंफांपैकी असणार, हे नक्की. पण, इतकी मोठ्ठी खोदाई केल्यानंतर हे लेणे अर्धवट का सोडले याचा अंदाज बांधणं अवघड आहे. काही अभियांत्रिकी कारणे (लेण्याजवळ पाणी नसणे, माथ्याकडून लेण्यात गाळ साचतो), की राजाश्रय/ अर्थपुरवठा संपला म्हणून, कुणास ठावूक!

फर्ग्युसनच्या नोंदीतले, पण आता अल्पपरिचित अश्या देवघरच्या लेण्याच्या दर्शनाने ट्रेकर्स खूष झालेले! आणि, लवकरच हा आनंद द्विगुणीत होता.
----------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------

धबधब्याच्या पात्रातून दगड-शिळांवरून चढत गेलो. निवडुंग-काटेरी झुडुपांमागे गुहेचे नैसर्गिक मुख दिसू लागले. माथ्याकडून कोसळणाऱ्या धबधब्याच्या खुणा-गवताचे झुंबाडे आता उन्हांत रापलेले. गुहेच्या बाहेर उजवीकडे रचलेल्या दगडांची रास दिसत होती. आणि दिसले गुहेत छिन्नीचे घाव घातलेल्या भिंती. गवसलं - हेच ते शिलाटणे लेणे!!!

नाणेघाटातल्या रांजणासारखाच हा रांजण, पण कातळाच्या पोटात खोदलेला. मुखापाशी रांजणाची जाडी होती ३५ सेमी. रांजणाच्या मुखापाशी व्यास ७० सेमी, तर तळाशी व्यास १.२ मी बनलेला.

सद्यस्थितीत रांजणाची खोली आहे ९० सेमी. रांजणाच्या तळाशी कित्येक छोट्या प्राण्यांच्या हाडांचा खच पडलेला. रांजणात उतरून बारकाईने निरीक्षण केलं.

रांजणाच्या मुखापाशी रांजण झाकण्यासाठी कोरलेली खाच (८७ सेमी लांब, ८ सेमी रुंद आणि ८ सेमी खोल) वैशिष्ट्यपूर्ण होती. रांजणाबाहेर कातळाला दोन टप्प्यात सपाटी दिलेली आणि २ छोटे खळगे खणलेले.
----------------------------------------------------------------------------
(पूर्वप्रकाशित: साप्ताहिक लोकप्रभा)
-----------------------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
*** कार्ले
लेण्याभोवतीच्या दुर्लक्षित लेणी-ध्यानगुंफा-भुयारे-टाकी धुंडाळताना डोळस भटकंतीचा
आनंद घेतोय; इंद्रायणीच्या नाणेमावळात कोणी-कधी-का-कशी-इथेच का-अजून कुठे खोदली असतील
ही लेणी अश्या प्रश्नांच्या न सुटलेल्या जिग-सॉ कोड्यामध्ये पुरता गुरफटून गेलोय ***

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सह्याद्रीच्या
घाटमाथ्यावरचं इंद्रायणी नदीचं खोरं म्हणजे नाणेमावळ. नदीच्या सोबतीने फुलत
गेलेल्या धर्म-व्यापार-समाज संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही नाणेमावळात विखुरल्या आहेत.
तालेवार दुर्ग लोहगड-विसापूर, नामांकित अशी कार्ले-भाजे-पाटण कातळलेणी आणि
त्यांच्या कुशीतून वाहणारा कोकण आणि देशप्रांत जोडणारा पुरातन व्यापारी मार्ग आणि...
आणि अजूनही ‘खूप काही’ इथे दडलंय.
कैक महिने आमच्या
टीमला ध्यास लागलाय याच दडलेल्या लेणी-टाकी-राऊळांचा.
... कधी धुंडाळतोय जगप्रसिद्ध
कार्ले लेण्याभोवती उपग्रहांसारखा जणू फेर धरलेली दुर्लक्षित लेणी-ध्यानगुंफा-भुयारे.
... तर कधी भेट
देतोय कोकण आणि देशाला जोडणाऱ्या पुरातन व्यापारी मार्गाच्या जोडीने कातळात खोदलेल्या
पाण्याच्या टाक्यांना.
... भिरीभिरी भटकंती
चालू आहे, कधी कोण्या इंग्रज अभ्यासकाच्या त्रोटक नोंदींच्या आधारे, कधी
गिरीजनांच्या मदतीने तर कधी स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने.
... अनेकदा भीती-दहशत
वाटतीये आजच्या राक्षसी नागरीकरणाच्या हायवे-खाणी-हॉटेल्सच्या त्सुनामीमध्ये या
जुन्या पाऊलखुणा सपशेल लुप्त होतील का याची.
... तर कधी गोंधळून
जातोय दुर्गम आणि अतिशय गूढ अश्या सरपटी लेणेविवरांमुळे.
नाणेमावळात विखुरलेल्या
संस्कृतीच्या दुर्लक्षित पाऊलखुणांनी - जणू एखाद्या जिग-सॉ कोड्याच्या तुकड्यांनी -
भारावून टाकलेले, गोंधळून टाकलेले.
नाणेमावळाच्या
जिग-सॉ कोड्यात गुंतत जायची सुरुवात ही अशी झाली. सह्याद्री ट्रेक्सच्या ध्यासाने
कित्येक वर्षं भारावून टाकलेलं. पुण्याच्या आसपासच्या मावळांमध्ये
डोंगर-दऱ्यांमध्ये भटकंती सुरु होतीच. डोंगर फिरताना भेट होवू लागली निसर्गनवलं,
अल्पपरिचित राउळे, देवराया आणि कातळलेणी. बरंचसं दुर्लक्षित. कितीतरी प्रश्न पडत
होते, या कातळलेण्यांचा अर्थ (का, कुठे, काय, कधी, कोणी, कशी, किती, वगैरे). एके
दिवशी हाती आलं, भारतातल्या लेणेमंदिरांवरचं आद्य आणि विश्वसनीय लिखाण – “the cave
temples of india (London, 1880)” नामक जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्गेस यांनी
लिहिलेलं पुस्तक. एखादं गोष्टींचं पुस्तक वाचावं, तसं या विषयात अक्षरश: हरवून गेलो.
पुस्तकात मावळातल्या लेण्यांबद्दल लिहिताना इंद्रायणी खोऱ्यातल्या कार्ले लेणी आणि
आसपासच्या लेण्यांबद्दल फर्ग्युसन यांनी मनमोकळेपणे कौतुक केलंय. फर्ग्युसन यांनी कार्ले
आणि परिसरातील लेण्यांना “the great central group of western caves” असं नाव देवून,
छोट्या-मोठ्या धरून ६० लेणे-विहार असल्याचा उल्लेख केलाय. कार्ले-भाजे-बेडसे लेणी
आपण ऐकली-पाहिली असतात. फर्ग्युसन यांनी नाणेमावळातल्या इतरही काही लेण्यांची नावे-वर्णने
नोंदवलेली. माहिती अगदीच त्रोटक असली, तरी लोणावळे-मळवली-कामशेत भागातल्या इतर
कुठल्या लेण्यांची नावेसुद्धा मी कधीच ऐकली नव्हती. त्यामुळे, नाणेमावळातल्या
अल्पपरिचित लेण्यांना भेट देण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. काही क्षणात
समव्यसनी दणकट ट्रेकरमंडळी जमली. मावळात ‘त-वरून-ताकभात’ ओळखणारा म्हणजे कुठल्यातरी
छोट्याश्या माहितीचा धागा धरून अल्पपरिचित लेण्यांची माहिती काढणारा अमेय जोशी, सह्याद्रीतल्या
गूढ भूगोलातली कोडी सोडवायला आवडणारा निनाद बारटक्के आणि आडवाटांवरून गच्च
झाडी-गचपणातून लीलया वाटा काढणारा मिलिंद लिमये आणि सह्याद्रीचा सर्वंकष-शास्त्रीयदृष्ट्या
अभ्यास करणारे ‘सह्याद्री जिओग्राफिक’कार विवेक काळे सर. गट बनला, नाणेमावळात
वाऱ्या सुरु झाल्या आणि गेले कित्येक महिने चालूच आहेत. फर्ग्युसन यांच्या सव्वाशे
वर्षांपूर्वीच्या नोंदींच्या आधारे शोध घ्यायचा प्रकल्पच सुरु झाला म्हणा ना. सुरुवात केली कार्ले डोंगररांगेतल्या दक्षिण बाजूच्या
लेणी-टाक्यांपासून.
वळवणची लेणी आणि पाण्याचे टाके (हे फर्ग्युसनने नोंदवलेले नाही)
... गेले ८-१० वर्षं पुणे -
मुंबई एक्स्प्रेस हायवेवरून जाताना, लोणावळे-वळवणजवळच्या एका
डोंगरात खुणावायची एक गुहा! कित्येकदा या गुहेबद्दलचा भुंगा मनात गुणगुणत होता - 'ही नुसतीच नैसर्गिक गुहा, की असेल हे अजून एक
कातळखोदीव लेणी?' मग प्रत्यक्ष जाऊन प्रयत्न केला. लोणावळे-वळवण
गावाजवळ हायवेच्या उत्तरेला स्वामी नारायणीधाम मंदिराजवळ टाटा पॉवरचा कालवा पार करून,
कैवल्यविद्यानिकेतन शाळेपाशी गेलो. शाळेच्या सिक्युरिटीकडे चौकशी केली, तर कळलं - "हां, आहे खरं एक गुहा. ही शाळा सुरु
केली त्या स्वामींची. शाळेच्या ग्राऊंडच्या पलिकडून जाते बघा वाट".
गारेगार दाट
झाडोऱ्यातून चढणारी मस्त नागमोडी वाटच मिळाली आणि पुढे साध्या पायऱ्या. कोवळया
उन्हाची किरणे निसटून पायऱ्या उजळवत होती. रानफुलं बहरलेली, त्यांचा घमघमाट प्रसन्न करत होता. हल्लीच बांधली
असावी अश्या दगडी कमानीतून आडव्या वाटेवरून झपझप गेलो.

आणि समोर आली... समोर आली ती गुहा, जी कित्येक वर्षे खुणावत होती! पहिल्या दर्शनातच ही नैसर्गिक गुहा नसून, कातळकोरीव लेणी आहे, हे दृष्टीक्षेपात पडलं. आम्ही आनंदाने चित्कारलो, "हुर्रे.. हेच ते लेणं!!!"

६ फूट रुंद, ६ फूट उंच असा प्रवेश असलेला विहार. समोर एक बाक. आणि डावीकडे एक बाक. पहा व्हिडीओ:

शिलालेख, स्तूप, धर्मचिन्हे - काहीच नाहीत. ही लेणी फर्ग्युसनने नोंदवलेले नाही.
विहाराचं निरीक्षण
करून बाहेर पडलो. लेण्यांसंबंधी मनात अनेक प्रश्न अजून बाकी. काय हेतू या विहाराचा? कोण्या ध्यान करणाऱ्या साधकासाठी असेल हा विहार? या परिसरातली कार्ले-भाजे ही बौद्ध लेणी. पण, इथे
कुठलीच धर्मचिन्हे-शिलालेख-स्तूप नाही. इंद्रायणी खोऱ्याचं दूरवर दर्शन होईल,
अशी अत्यंत मोक्याची जागा.

इंद्रायणीच्या खोऱ्यातून तळेगावमार्गे जुन्नरकडे किंवा पुण्याकडे जाणारा हा मार्ग नक्की पुरातन मार्गावरची. याचा काही संबंध विहाराच्या स्थानाशी? कधी खोदवलेली असतील ही लेणी? कोणी खोदवलेली असतील ही लेणी? कुणाच्या धर्माश्रयाने/ राजाश्रयाने झाले असेल हे कृत्य? कार्ले लेणे परिसरातील हा एकांडा विहार, की अजून इथे काही ठिकाणी विहार आहेत? इतकी चांगली खोदाई जुन्या काळात.. कोणती साधनं-टूल्स वापरून केली असेल?

आता वेळ होती पुणे-मंबई
हायवेच्या दक्षिणेला वळवण गावात अजून एक जुनं ठिकाण बघायची. लोणावळे-वळवण गावातील ‘बापदेव
मंदिरा’च्या परिसरात जुनं खोदलेलं पाण्याचं टाकं आहे, असं कळलं होतं. देवळाचे बांधकाम
हल्लीचं - सिमेंटमध्ये बांधून काढलेलं आधुनिक रूप.

मंदिराबाहेर दोन-चार दगडांना शेंदूर फासलेला. मंदिरासमोर जुनं कातळात खोदलेलं टाके - कातळाच्या पोटात खोदत नेलेलं आणि अनेक मुखं असलेलं. पहा व्हिडीओ:
शांतनितळ पाण्यातून पोहोणारे मासे-कासवे खुणावत होते. आता सिमेंटच्या बांधकामाने आणि जाळीने टाकं बंद केल्याने, टाक्याचे मूळ रूप कसं असेल, याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

देवळापाशी एका आजाच्या सांगण्यावरून कुण्या जोडप्याने इथे आत्मघातीपणा करायचा प्रयत्न केल्याने टाके बंद करावं लागलेलं.

परतीच्या प्रवासात
वळवण लेण्याचा आणि कातळखोदीव लेण्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला. नाणेमावळातून
कोकण-देश जोडणाऱ्या ज्या पुरातन व्यापारी मार्गावर वळवण गाव वसलेलं, त्यावरचं आजचा
पुणे-मुंबई महामार्ग चालू आहे. त्या पुरातन मार्गाच्या अल्याड उत्तरेला वळवण-इंद्रायणी
लेणे आणि लगेच पल्याड दक्षिणेला वळवण पाण्याचे टाके असल्याने, ‘पुरातन मार्ग –
कातळलेणे - पाण्याचे टाके’ यांची
जोडगोळी गवसणं, हा निव्वळ योगायोग नसणार...
----------------------------------------------------------------------------
देवघर लेणे
कार्ले लेण्याच्या
परिसरात विखुरलेल्या लेण्यांच्या उल्लेखात फर्ग्युसन यांनी देवघरच्या लेण्यांचे वर्णन
केलंय, “कार्ले लेण्यांच्या नैऋत्येला. अर्धवट खोदाई केलेला विहार. समोरील
बाजूला २ ओबडधोबड खांब आणि आधारतुळया (bracket
capital). गुहेच्या मागील बाजूस (कदाचित दागोबाच्या स्थापनेसाठीची)
खोदाई सुरु करून अर्धवट सोडलेली.” एवढ्या वर्णनावर ही लेणी शोधायला आम्ही निघालो.
बारकाईने शोधूनही
देवघर हे गाव गुगल नकाशावर सापडले नव्हते. कार्ले लेण्याच्या परिसरात पुणे – मुंबई
जुन्या महामार्गावर देवघर कुठे असेल, याचा आडाखा बांधला. जुन्या पुणे-मुंबई
महामार्गावर मळवली ते लोणावळेच्या दरम्यान वाकसई गावापासून उजवीकडे (उत्तरेला) वळलो.
चिंचोळ्या रस्त्याने पुढे गेल्यावर देवघर गाव गवसलं खरं, पण कोणालाच देवघर
लेण्याबद्दल कल्पना नाही. विचारलं, ‘इथे कुठे जुनं लेणं-गडद-पांडवांची गुहा आहे
का’, तर सगळ्यांनी खुणावलं पल्याडच्या कार्ले लेण्यांकडेच. लेणे गवसणार की नाही,
अशी हुरहूर लागलेली.
मग ठरलं, गावाबाहेर
पडून गावालगतचा डोंगर तपासावा. गावाच्या उत्तरेला कार्ले लेणे असलेली डोंगररांग
पूर्व-पश्चिम उठवलेली. त्या रांगेकडून देवघरकडे १०० मी उंचीची सोंड उतरत आलेली.
सोंडेच्या पूर्वेला देवघर गाव वसलेलं. सोंडेच्या उतारांमध्ये लेणं इथे कुठे असेल
का, याचा अंदाज घेत होतो. नशीब थोर, की एका भल्या काकांनी सांगितलं – ‘हो आहे
की लेणं. त्ये बघा कातळाच्या पोटात शिंदीच्या झाडांजवळ. शिद्धा जा. ही वाट
सोडायचीच नाही’.

ट्रेकर्सच्या आशा पल्लवित झाल्या. गावाबाहेरच्या वेताळदेवाच्या बाजूने उभी चढणारी वाट झपाट्याने उभी चढत बांबूच्या बनात पोहोचलो.

रस्त्यापासून पंधरा मिनिटात साधारणत: ६५ मी चढाई केल्यावर, आता कातळकडा जवळ आला. कातळात लेणं आहे की नाही, आणि असेल तर कसं याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. कातळकड्याच्या पोटात उलगडली एक गुहा.

गुहेच्या बाजूंच्या कातळावरचे छिन्नीचे घाव दूरूनच दिसले. हेच ते देवघरचे लेणे. लेणे गवसल्याने टीम एकदम खूष!!!

देवघरचं लेणे-विहार
म्हणजे साधारणत: चौकोनी आकाराचं विस्तृत दालन होतं. पहा व्हिडीओ:
लेण्याची बाहेरच्या बाजूस होते कातळात साध्या खोदाईचे २ खांब प्रत्येकी १ मी लांबी-रुंदीचे. लेण्याची उपलब्ध उंची आहे २.९ मी. बाहेरून लेण्याकडे बघताना रुंदी १०.६ मी.

खांबांना दोहोबाजूंना होत्या आधारतुळया.

लेण्याच्या बाहेर मोठे खडक-शिळा अस्ताव्यस्त विखुरलेल्या. इतर काही लेण्यांच्या माथ्यावर आढळते, तशी देवघर लेण्याच्या माथ्याकडे कातळात पन्हळ खोदली नाहीये. कदाचित त्यामुळे, पावसाळ्यात कोसळणाऱ्या पावसासोबत कातळमाथ्याकडून निसटणारा राडारोटा-दगड-चिखल दणदण लेण्याच्या आत साचत गेलाय. आत्ता जरी हा चिखल वाळला असला, तरी त्यामुळे मूळ लेण्याची खोदाई किती याचा अंदाज बांधणं अवघड झालंय.

लेण्याच्या आत जाताना थोडंसं वाकूनच जावे लागले.

लेण्याची खोली आहे ७.३ मी. लेण्याच्या मागील बाजूस रुंदी आहे ११.३४ मी. लेण्याबाहेर व्हरांडा ३.१७ मी लांबीचा.

लेण्यात डावीकडे ओबडधोबड बाकाची खोदाई अर्धवट सोडलेली.

माथ्याला छिन्नीच्या सुबक घावांची नक्षी बघताना, स्पॉटेड लिझार्ड आणि मोठ्ठाल्या कोळ्यांनी लक्ष वेधलं.

लेण्याच्या मागच्या बाजूस अपूर्ण दार (९४ सेमी रुंद, १.८८ मी. उंच, १.१८ मी खोल).

कदाचित इथे दागोबाची स्थापना करायची असेल, पण अर्धवट सोडून दिलेलं.

लेण्याच्या उजवीकडे खोदाई सुरुवात करून मध्येच सोडून दिलेली कदाचित विहाराची खोदाई.

आधीच दुर्लक्षित असलेलं हे लेणे उपद्रवी व्यक्तींनी ठिकठिकाणी ऑईलपेंटने नावे रंगवून ठेवल्याने विद्रूप झालंय. लेणे परिसरात शिलालेख-पाण्याचे टाके दिसले नाही.
लेण्याची बाहेरच्या बाजूस होते कातळात साध्या खोदाईचे २ खांब प्रत्येकी १ मी लांबी-रुंदीचे. लेण्याची उपलब्ध उंची आहे २.९ मी. बाहेरून लेण्याकडे बघताना रुंदी १०.६ मी.
खांबांना दोहोबाजूंना होत्या आधारतुळया.
लेण्याच्या बाहेर मोठे खडक-शिळा अस्ताव्यस्त विखुरलेल्या. इतर काही लेण्यांच्या माथ्यावर आढळते, तशी देवघर लेण्याच्या माथ्याकडे कातळात पन्हळ खोदली नाहीये. कदाचित त्यामुळे, पावसाळ्यात कोसळणाऱ्या पावसासोबत कातळमाथ्याकडून निसटणारा राडारोटा-दगड-चिखल दणदण लेण्याच्या आत साचत गेलाय. आत्ता जरी हा चिखल वाळला असला, तरी त्यामुळे मूळ लेण्याची खोदाई किती याचा अंदाज बांधणं अवघड झालंय.
लेण्याच्या आत जाताना थोडंसं वाकूनच जावे लागले.
लेण्याची खोली आहे ७.३ मी. लेण्याच्या मागील बाजूस रुंदी आहे ११.३४ मी. लेण्याबाहेर व्हरांडा ३.१७ मी लांबीचा.
लेण्यात डावीकडे ओबडधोबड बाकाची खोदाई अर्धवट सोडलेली.
माथ्याला छिन्नीच्या सुबक घावांची नक्षी बघताना, स्पॉटेड लिझार्ड आणि मोठ्ठाल्या कोळ्यांनी लक्ष वेधलं.
लेण्याच्या मागच्या बाजूस अपूर्ण दार (९४ सेमी रुंद, १.८८ मी. उंच, १.१८ मी खोल).
कदाचित इथे दागोबाची स्थापना करायची असेल, पण अर्धवट सोडून दिलेलं.
लेण्याच्या उजवीकडे खोदाई सुरुवात करून मध्येच सोडून दिलेली कदाचित विहाराची खोदाई.
आधीच दुर्लक्षित असलेलं हे लेणे उपद्रवी व्यक्तींनी ठिकठिकाणी ऑईलपेंटने नावे रंगवून ठेवल्याने विद्रूप झालंय. लेणे परिसरात शिलालेख-पाण्याचे टाके दिसले नाही.
हे लेणे कार्ले लेण्याच्या परिसरातील ध्यानगुंफांपैकी असणार, हे नक्की. पण, इतकी मोठ्ठी खोदाई केल्यानंतर हे लेणे अर्धवट का सोडले याचा अंदाज बांधणं अवघड आहे. काही अभियांत्रिकी कारणे (लेण्याजवळ पाणी नसणे, माथ्याकडून लेण्यात गाळ साचतो), की राजाश्रय/ अर्थपुरवठा संपला म्हणून, कुणास ठावूक!
फर्ग्युसनच्या नोंदीतले, पण आता अल्पपरिचित अश्या देवघरच्या लेण्याच्या दर्शनाने ट्रेकर्स खूष झालेले! आणि, लवकरच हा आनंद द्विगुणीत होता.
----------------------------------------------------------------------------
देवघर-वाकसई
लेणे आणि पाण्याची २ खांबटाकी
फर्ग्युसन यांनी
केलेलं लेण्यांचं पुन्हा वर्णन वाचायला घेतलं, ते असं: “देवघर गावाच्या
पूर्वेला टेपाडापाशी पाण्याचे टाके आणि कातळातली खोदाई अर्धवट सोडलेली – जणू काही
छोटा विहार आणि टाके खोदत असावेत”. आधुनिकतेच्या झपाट्यामुळे गावात
लेण्यांबद्दल फार कोणाला कल्पना नव्हतीच. पुणे – मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळे
ते मळवली गावांच्या दरम्यान वाकसई/ देवघर गावाच्या फाट्याजवळ आलो. वाकसई गावच्या
फाट्यावरून पुण्याकडे निघालं, की २०० मी अंतरावर डावीकडे एक टेपाड आणि माथ्याकडचे
राऊळ खुणावू लागलं. या टेपाडाच्या परिसरात लेण्याचा शोध घ्यायचं ठरवलं. हायवेला
एकापाठोपाठ असलेले ढाबे-हॉटेल्स आणि खाजगी जमिनींची कुंपणे संपेनात. शेवटी,
टेपाडाकडे जाण्यासाठी डावीकडे एक कच्चा रस्ता मिळाला. माळावर कचरा-दारूच्या
बाटल्या-तारांची कुंपणे माजलेली. त्यातून मार्ग काढत टेपाडाचे उतार धुंडाळत
निघालो. लेणे सापडणार का, सापडू दे लवकर अशी नेहेमीची हुरहूर आणि उत्सुकता मनात
दाटलेली. टेपाडाच्या माथ्याला किंचित वळसा घालत पश्चिमेकडे निघालो. उतारावर खाणीने
डोंगराला पोखरून काढलेलं. मुंबई-पुणे महामार्गापासून जेमतेम १०० मी अंतरावर,
जेमतेम १० मी उंचीच्या कातळसपाटीवर जमिनीलगत खोदाई केलेली. पाण्याचे टाकेच नक्कीच!
कातळकोरीव एक नाही,
तर दोन पाण्याची टाकी होती. पहिल्या टाक्याचे मुख लांब चिंचोळ्या आकाराचे.

मुळात दोन मुखे असावीत आणि मधली आधारपट्टी कालांतराने पडून गेल्यासारखे वाटत होते. फारसा वापर-उपसा नसल्याने, पाण्यावर हिरवट तेलाचा तवंग जमलेला. पहा व्हिडीओ इथे:
टाक्याच्या कडा आणि एकूणच खोदाई सुबक फिनिश न करता, ओबडधोबड करून अर्धवट सोडलेली. कातळाच्या पोटात खोलवर खोदत नेलेले टाके. टाक्यात पावसासोबत राडारोटा पडू नये, म्हणून कोणीतरी कधीतरी टाक्याच्या कडेने दगड रचलेले.

त्यामानाने, पलिकडचे
दुसरे खांबटाके आकाराने मोट्ठे होते. टाक्याला असलेले चौकोनी एक मुख दिसते. पण
अजून २-३ मुखे असतील, ती आता पडून गेलीत. बाहेरून कातळात खोदलेला चर उतरत
टाक्याच्या आत प्रवेश करत होता. जेमतेम एक फूट रुंदीचा असलेल्या चराचे उद्दिष्ट
नीटसे कळले नाही, तरी तो बहुदा टाक्यात उतरण्यासाठी असावा.

कातळाच्या आत खोदत नेलेले टाके आणि दोन निमुळते होत जाणारे ओबडधोबड खांब दिसले.

चौकोनी टाक्याच्या आत ओलसर चिखल साठलेला, किंचित गढूळ पाणी साठलेले.

टाक्याच्या माथ्याकडून पलिकडे डोकावलो आणि अक्षरशः धस्सच झाले. पलिकडे दगड-मातीच्या उपश्यासाठी खणत आणलेली खाण थेट टाक्याच्या कातळाला भिडलेली. खाणीत कोणी लावलेला सुरुंग-पहार लागून खाणीच्या बाजूने टाक्याच्या मागील भिंतीला भगदाड पडलेले. टाक्याच्या काठापाशी नारळ वाढवलेला, बांगड्या वाहिलेल्या. म्हणजे, टाक्याच्या देवतेच्या भीतीने कदाचित खाणीच्या खोदाईत हे टाके ‘सद्ध्या’ बचावलेले. कोणी व्यवहारी माणसाने खाणीतल्या दगडाची आजच्या काळातली किंमत किंवा हायवेशेजारी हॉटेल उभारण्यातून उभा राहणारा ‘बिन्नेस’ यांच्या तुलनेत, पुरातन पाण्याच्या टाक्याच्या संवर्धनाचे मूल्य मोजलं, तर पुरातन टाकं नक्की नामशेष होणार, हे नक्की! त्यामुळे, या पुरातन जागेला संरक्षित करणं आणि खाणकाम-आधुनिकतेच्या भस्म्यापासून संवर्धन करणं, अत्यंत निकडीचं!

फर्ग्युसन यांनी नोंदवलेला
अर्धवट विहार आपल्याला दिसला नाहीये, अशी आठवण विवेकसरांनी करून दिली. शोधूनही आसपास
एखाद्या विहाराच्या खोदाईची कुठलीच खुण नव्हती. दोन टाक्यांपैकी मोठे असलेले
खांबटाके, म्हणजेच तो विहार असेल अशी आम्ही सोयीस्कर समजूत घालून घेतली होती. टाक्यांना
निरोप द्यायची वेळ आलेली. परतीच्या मार्गावर किंचित चढ चढताना डावीकडे गच्च झुडुपे
दाटलेली. गच्च झुडुपांमधून सहज मी नजर टाकत होतो. आणि बुटक्या कातळावर छिन्नी
मारल्यासारखी दिसली. अक्षरशः उडालोच. फर्ग्युसननी नोंदवलेला अर्धवट खोदाई केलेला
विहार निवडुंग-झुडुपांमागे दडलेला. एव्हाना निनाद्राव लेण्याच्या माथ्याकडून निवडुंग टाळत विहारांकडे उतरला.

काटेरी झुडुपं थोडी बुटांनी दाबून खोदाई कशी असेल, याचा अंदाज बांधू लागलो.

३ विहार अगदी शेजारी-शेजारी खोदायला सुरुवात करून सोडून दिलेले.

इथेही, लेण्याच्या खोदाईच्या लगेच पलिकडे कातळाला आधुनिक काळातल्या खाणीची खोदाई येऊन टेकलेली. ती खोदाई थांबली नसती, तर हा विहार नामशेष झाला असता.

देवघर-वाकसईच्या या
विहार-टाक्यांपासून जेमतेम ५० मी अंतरावर अव्याहत वाहतो सद्ध्याचा मुंबई-पुणे
महामार्ग (जुना). कदाचित त्याच जागेवर पुरातन व्यापारी मार्ग असणार. कधी काळी व्यापारी–पांथस्थ–गुरे
त्या जुन्या व्यापारी मार्गावरून चालले असतील, कधी पाण्यासाठी इथे टाक्यापाशी विसावले
असतील, अशी जागा. नामांकित लेण्याची ही खोदाई वाटत नाही. अर्धवट खोदाई करून
सोडलेली जुजबी जागा. पुरातन व्यापारी मार्गावरची एक पाऊलखूण!
----------------------------------------------------------------------------
शिलाटणे लेणे आणि टाकी
फर्ग्युसन यांनी
नोंदवलेलं पुढचं लेणं होतं शिलाटणे गावचं: “गावाच्या उत्तरेला उंचावर.
धबधब्याच्या पोटातल्या मोठ्ठ्या गुहेत. खडकातील दोषामुळे कदाचित छत कोसळलेले.
उत्तरेला गोल खळगा आणि झाकण – कदाचित धान्य साठवणीसाठी. छोटे गोलाकार दालन –
(माती/लाकडी) बांधणीच्या दागोबासाठी”. माहिती वाचूनच लेण्यांना भेट द्यायला
ट्रेकर्स आतुर झालेले.
एके दिवशी भल्या
पहाटे पुणे – मुंबई जुन्या महामार्गावर कामशेत ते मळवलीच्या दरम्यान शिलाटणे
गावाचा फाटा गाठला. गावात प्रवेश करताच गावात पाण्याचं दुर्भिक्ष असल्याच्या खुणा
– हंड्यांच्या रांगा दिसल्या. गावापल्याड शेताडीजवळ गाडी लावली. समोर उत्तरेला
होती कार्ले लेण्यापासून पूर्वेला धावणारी मोठ्ठी डोंगररांग. त्या डोंगररांगेपासून
दक्षिणेला शिलाटणे गावाकडे एक डोंगरसोंड उतरत आलेली.

सोंडेवर एक-दोन ठिकाणी धबधब्याच्या जागा जाणवत होत्या. तिथेच लेणी असू शकणार होती. कातळावर बसून न्याहारी करताना, समोरची डोंगररांग कोवळ्या किरणांनी उजळू लागली. निवडुंगांपासून आडवं तिरकं चढत पल्याडच्या खोऱ्यात नेसवेकडे जाणारी मळलेली वाट होती.

समोरच्या धबधब्याच्या दिशेने उंची गाठत होतो. पायथ्याच्या शिलाटणे गावापासून पाऊण तास आणि १७५ मी चढाई झालेली. लेणे अजूनही नेमके कुठे असेल, याचा काहीच अंदाज येईना. अखेर एका वळणावरून समोर आला धबधब्याचा खळगा आणि त्याच्या पोटातली गुहा. इथे असेल लेणे?
सोंडेवर एक-दोन ठिकाणी धबधब्याच्या जागा जाणवत होत्या. तिथेच लेणी असू शकणार होती. कातळावर बसून न्याहारी करताना, समोरची डोंगररांग कोवळ्या किरणांनी उजळू लागली. निवडुंगांपासून आडवं तिरकं चढत पल्याडच्या खोऱ्यात नेसवेकडे जाणारी मळलेली वाट होती.
समोरच्या धबधब्याच्या दिशेने उंची गाठत होतो. पायथ्याच्या शिलाटणे गावापासून पाऊण तास आणि १७५ मी चढाई झालेली. लेणे अजूनही नेमके कुठे असेल, याचा काहीच अंदाज येईना. अखेर एका वळणावरून समोर आला धबधब्याचा खळगा आणि त्याच्या पोटातली गुहा. इथे असेल लेणे?
धबधब्याच्या पात्रातून दगड-शिळांवरून चढत गेलो. निवडुंग-काटेरी झुडुपांमागे गुहेचे नैसर्गिक मुख दिसू लागले. माथ्याकडून कोसळणाऱ्या धबधब्याच्या खुणा-गवताचे झुंबाडे आता उन्हांत रापलेले. गुहेच्या बाहेर उजवीकडे रचलेल्या दगडांची रास दिसत होती. आणि दिसले गुहेत छिन्नीचे घाव घातलेल्या भिंती. गवसलं - हेच ते शिलाटणे लेणे!!!
माथ्याकडून धबधब्याचं
पाणी जिथे कोसळतं, तिथूनच जुन्या खोदीव पाऊलखुणा दिसू लागल्या. धबधब्याच्या
पात्रात ६७ सेमी व्यासाचे आणि ६ इंच खोल असलेले गोलाकार छिद्र. आत वाळलेला चिखलगाळ
साठलेला. कदाचित पावसाचे पाणी साठवायला खोदले असेल.

मुख्य लेण्याच्या गुहेत प्रवेश केला. संपूर्ण गुहा चांगलीच मोठ्ठ्या आकाराची (१४.३ मी रुंद, ८.९ मी खोल, २.८७ मी उंच).

शिलाटणे लेणी स्केच (कृतज्ञता: विवेक काळे सर)
मुळातल्या नैसर्गिक गुहेला छताला छिन्नी मारून सुबक सफाई नक्षी दिलेली.

पल्याड दगडांची गोल रास रचलेली, कदाचित कोण्या गुराख्याने पावसाळ्यात शेकोटीची ऊब मिळवली असेल.

लेण्याच्या डाव्या
बाजूस महत्त्वाची खोदाई आहे.

सगळ्यात डावीकडे गोलाकार लेणे (२ मी व्यास, २ मी उंची). गोलाकार लेण्याशेजारी कातळात बाक खोदलेला (१.८ मी लांब, ६५ सेमी रुंद, ६३ सेमी उंची).

एक शक्यता अशी, की ही जागा माती/लाकडी बांधणीच्या दागोबा स्तूपासाठी असू शकेल. दुसरी शक्यता म्हणजे, ही जागा ध्यानासाठी असू शकेल. गोलाकार लेण्याच्या पायथ्यापाशी आणि माथ्यापाशी कातळात खोदलेल्या खाचा बारकाईने बघितल्या. पूर्वी या खाचांमध्ये लाकडी फळ्या-दार अडकवून ध्यानासाठी आडोसा-एकांत निर्माण करत असतील का.

शिलाटणे लेण्याचे अत्यंत अनोखे वैशिष्ट्य म्हणजे, बाकाशेजारी असलेला आणि कातळाच्या पोटात खोदत नेलेला रांजण.
सगळ्यात डावीकडे गोलाकार लेणे (२ मी व्यास, २ मी उंची). गोलाकार लेण्याशेजारी कातळात बाक खोदलेला (१.८ मी लांब, ६५ सेमी रुंद, ६३ सेमी उंची).
एक शक्यता अशी, की ही जागा माती/लाकडी बांधणीच्या दागोबा स्तूपासाठी असू शकेल. दुसरी शक्यता म्हणजे, ही जागा ध्यानासाठी असू शकेल. गोलाकार लेण्याच्या पायथ्यापाशी आणि माथ्यापाशी कातळात खोदलेल्या खाचा बारकाईने बघितल्या. पूर्वी या खाचांमध्ये लाकडी फळ्या-दार अडकवून ध्यानासाठी आडोसा-एकांत निर्माण करत असतील का.
शिलाटणे लेण्याचे अत्यंत अनोखे वैशिष्ट्य म्हणजे, बाकाशेजारी असलेला आणि कातळाच्या पोटात खोदत नेलेला रांजण.
नाणेघाटातल्या रांजणासारखाच हा रांजण, पण कातळाच्या पोटात खोदलेला. मुखापाशी रांजणाची जाडी होती ३५ सेमी. रांजणाच्या मुखापाशी व्यास ७० सेमी, तर तळाशी व्यास १.२ मी बनलेला.
सद्यस्थितीत रांजणाची खोली आहे ९० सेमी. रांजणाच्या तळाशी कित्येक छोट्या प्राण्यांच्या हाडांचा खच पडलेला. रांजणात उतरून बारकाईने निरीक्षण केलं.
रांजणाच्या मुखापाशी रांजण झाकण्यासाठी कोरलेली खाच (८७ सेमी लांब, ८ सेमी रुंद आणि ८ सेमी खोल) वैशिष्ट्यपूर्ण होती. रांजणाबाहेर कातळाला दोन टप्प्यात सपाटी दिलेली आणि २ छोटे खळगे खणलेले.
रांजणात डोकावून
आमची टीम शिलाटणे लेण्यांना आणि कातळरांजणाला समजावून घेत होती.

बौद्ध भिक्षुंना धर्मसाधनेकरता विशिष्ठ नियमांनुसार आचरण करावे लागे. पावसाळ्याच्या चार महिन्यात ‘वर्षावास’ करण्यासाठी (आसरा घेण्यासाठी), ध्यानधारणेसाठी आणि एकांतासाठी दुर्गम डोंगरात लेणे विहार खोदलेला.

बौद्ध भिक्षुंना रोज भिक्षा मागायचा नियम असला, तरी कोसळणाऱ्या पावसाळ्यात बाहेर पडणं अवघड होत असेल, तेंव्हा दान मागून घेतलेला धान्यसाठा साठवण्यासाठी या रांजणाचा उपयोग होत असेल का? असं वाटून गेलं. शिलाटणे लेण्याच्या वैविध्यपूर्ण खोदाईमुळे आम्हां सगळ्यांना अतिशय आवडून गेलं.

बौद्ध भिक्षुंना धर्मसाधनेकरता विशिष्ठ नियमांनुसार आचरण करावे लागे. पावसाळ्याच्या चार महिन्यात ‘वर्षावास’ करण्यासाठी (आसरा घेण्यासाठी), ध्यानधारणेसाठी आणि एकांतासाठी दुर्गम डोंगरात लेणे विहार खोदलेला.
बौद्ध भिक्षुंना रोज भिक्षा मागायचा नियम असला, तरी कोसळणाऱ्या पावसाळ्यात बाहेर पडणं अवघड होत असेल, तेंव्हा दान मागून घेतलेला धान्यसाठा साठवण्यासाठी या रांजणाचा उपयोग होत असेल का? असं वाटून गेलं. शिलाटणे लेण्याच्या वैविध्यपूर्ण खोदाईमुळे आम्हां सगळ्यांना अतिशय आवडून गेलं.
----------------------------------------------------------------------------
शिलाटणे गावातली पाण्याची टाकी
शिलाटणे गावातली पाण्याची टाकी
शिलाटणे लेणी
बघितल्यानंतर फर्ग्युसन यांनी नोंदवलेलं वर्णन “गावाच्या दक्षिणेला. कातळाच्या
पोटात खोदलेले मोट्ठे टाके आणि त्याला असलेली ६ मुखे” पडताळून पाहायचं होतं. सध्याच्या
पुणे-मुंबई महामार्गावरून शिलाटणे गावाकडे वळलो, की गावाची वस्ती सुरु व्हायच्या
आधी उजवीकडे (गावाच्या दक्षिणेला) डोंगररांग उतरत आलीये. तिथेच उतरंडीच्या कातळावर
टाके गवसलं.

लांबट खोदाईच्या मोठ्ठ्या टाक्याला ६ मुखे आहेत. आत गच्च कचरा भरलाय. झुडुपे माजलीयेत. खोदाई ओबडधोबड आहे. अर्धवट खोदाई करून सोडलेली जुजबी जागा.

तळाशी पाणी आहे. म्हणजे, सफाई केली तर पुन्हा टाक्यात पाणी भरेल, हे नक्की. सद्यस्थितीत टाक्यांच्या परिसरात हागणदरी माजलीये. टाक्याच्या पल्याड १०० फूट अंतरावर समाधीचे २-३ कोरीव दगड आहेत.

शिलाटणेच्या या
टाक्यापासून सद्ध्याचा मुंबई-पुणे महामार्ग (जुना) जेमतेम ३०० मी अंतरावर. म्हणजे,
‘पुरातन मार्ग – कातळलेणे - पाण्याचे
टाके’ यांची जोडगोळी पुन्हा एकदा गवसलेली. गुगलवर शिलाटणे शोध घेतला, तर
आजच्या काळात गावात किती पाणीटंचाई आहे याच्या बातम्या दिसतात. शिलाटणे गावातली
पाण्याची टाकी साफ केली, तर पूर्वीच्या बौद्ध भिक्षु आणि व्यापाऱ्यांसारखी इथल्या
गावकऱ्यांची तहान भागेल का... असं वाटून गेलं.
----------------------------------------------------------------------------
टाकवेचे
टाके (आणि कदाचित ब्राम्ही शिलालेख)
फर्ग्युसन यांनी
केलेलं पुढचं वर्णन एव्हाना खुणावू लागलेलं - “कार्ले लेण्यापासून अजून दूर
पूर्वेला टाकवे गावापाशी पाण्याची दोन टाकी”. टाक्याचे स्थान समजून घेण्यासाठी
कामशेतच्या श्री सचिन शेडगे यांची
मदत झाली, हे कृतज्ञतापूर्वक नमूद केलं पाहिजे. पुणे – मुंबई जुन्या महामार्गावर कामशेत ते मळवलीच्या दरम्यान टाकवे
गावाच्या फाट्यापाशी आम्ही पोहोचलो. जवळच काळ्या चिऱ्यामध्ये बांधलेलं देखणं श्रीकाळभैरवनाथ
मंदिर खुणावू लागलं. मंदिराच्या परिसरात कुठे टाके आहे का हे शोधायला टीम विखुरली.
मंदिराच्या नैऋत्येला खाणीमुळे बनलेल्या तळ्याशेजारी पाच मिनिटाच्या अंतरावर टाके गवसलं
– पुणे-मुंबई महामार्गापासून अवघ्या १०० मी अंतरावर.
सुबक खोदाईचे सुरेख मोट्ठे
टाके (८ मी रुंद, ६ मी कातळाखाली खोदत नेलेले, २.१ मी खोल). विवेकसरांनी पटकन गणित
मांडून हे टाकं ९६००० लीटर क्षमतेचे आहे, असा आडाखा बांधला. टाक्यात उतरत जायला
अर्ध-लंबगोलाकार खोदाई करून पायऱ्या खणलेल्या. टाक्याच्या आत किंचित निमुळते होत
जाणारे २ खांब.

कातळावर टाक्यासाठी ४ मुखे. डावीकडून उजवीकडे जाताना टाक्याचे मुख १ (७५ सेमी लांब-रुंद), टाक्याचे मुख २ (१ मी लांब, ८२ सेमी रुंद), टाक्याचे मुख ३ (१.०२ मी लांब, ७५ सेमी रुंद) आणि टाक्याचे मुख ४ (१ मी लांब, ६६ सेमी रुंद). टाक्याच्या माथ्यावर कोणतीतरी स्थानिक देवता तांदळा मांडलेला. किरकोळ विटांचा-फरशीचा आडोसा केलेला. कधीतरी वाहिलेली नारळाची करवंटी आणि स्टीलचा पेला लवंडलेला. टाक्यांचे गाव म्हणून टाकवे, असं नाव इथल्या गावाला प्रचलित झाले असेल का, असा अंदाज विवेकसरांनी बांधला.

ऊन्हं तळपू लागलेली.
भूका लागलेली. निघायची वेळ झालेली. अश्या वेळी हमखास एखादा महत्त्वाचा तपशील
बघायचा राहून जायची शक्यता असते. आणि तसंच झालं. आमच्या नजरेतून निसटलेलं, एक
अनोखं कातळशिल्प विवेकसरांनी बरोब्बर हेरलं.

टाक्याच्या डावीकडून दुसऱ्या मुखाच्या खोदाईच्या दर्शनी भागाच्या कातळभिंतीवर चक्क काही अक्षरे खोदलेली. नि:संशय ब्राम्ही लिपीतला शिलालेख गवसलेला.

मिलिंदला टाक्याच्या डावीकडून तिसऱ्या मुखाच्या खोदाईच्या दर्शनी भागाच्या कातळभिंतीवर अजून काही खोदलेली अक्षरे जाणवली. शिलालेखाची अक्षरे झिजून क्षीण झालेली. टाक्यावरच्या लेखाचं वाचन झालं पाहिजे. टाक्याची खोदाई करण्यासाठी कोण्या व्यापाऱ्याने जे दान दिलं असेल, त्याची नोंद बहुदा शिलालेखात असेल. लेखाच्या वाचनाने कार्ले लेण्याशी आणि पुरातन व्यापारी मार्गाशी संबंध जुळला तर...

बाकी लेण्यांसारखं
इथे लेणे-टाकी अशी जोडगोळी न सापडता, फक्त टाके आढळलेले. त्यामुळे टाकवेच्या
जवळपास कुठे लेणे खोदले असेल का? आणखी एक कोडे म्हणजे, फर्ग्युसननी उल्लेख केलेल्या
टाकवेच्या २ टाक्यांपैकी एक टाके आम्ही बघितलेले. दुसरे टाके आसपास शोधून आणि
स्थानिकांकडे विचारणा करूनही सापडले नाहीये. टाकवेचे दुसरे टाके शोधत राहूच, पण
वाटतंय - बाजूच्या आधुनिक दगडाच्या खाणीच्या बेताल खोदाईमध्ये टाकवेचे दुसरे टाके
नामशेष तर झाले नसेल ना! अंतकरणात कुठेतरी खोलवर हळहळ वाटली...
----------------------------------------------------------------------------
टाक्याला लागून असलेला डोंगरउतार खाणीसाठी पोखरून काढलेला. सद्ध्या टाके बचावले असले, तरी खाणीच्या दगडासाठी किंवा हायवेशेजारी हॉटेल उभारण्याच्या हव्यासासाठी पुरातन टाक्याचा आणि त्याच्या शिलालेखाचा बळी जाऊ शकतो, या विचारानेही हादरून गेलो आहोत. या पुरातन जागेला संरक्षित करणं आणि खाणकाम-आधुनिकतेच्या भस्म्यापासून संवर्धन करणं, अत्यंत निकडीचं!
वाळक लेणे आणि टाके
फर्ग्युसन यांनी
केलेली वर्णने आणि त्यानुसार नाणेमावळात प्रत्यक्ष डोंगर-गुहा-लेणी शोधत भटकण्याची
धम्माल मजा लुटत होतो. फर्ग्युसनचीपुढची नोंद होती, “वाळकला उभ्या कड्यात छोटे
गोलाकार दालन – कदाचित दागोबा उभारण्यासाठी. एक गुहा – समोरील बाजू ढासळलेली,
किंचित कमान असलेला माथा. पाठीमागे विहार. गुहेच्या मुखाजवळ गोलाकार खळगा – कदाचित
धान्य साठवणीसाठी”.
एके दिवशी मोहीम
निघाली वाळकचं लेणे बघायची. वाळकला पोहोचण्यासाठी कामशेतजवळ पुणे-मुंबई महामार्ग
सोडून, शिरोटा धरणाकडे जाणारा रस्ता घेतला. नाणेमावळाच्या या बाजूला मी पहिल्यांदा
प्रवास करत असल्याने, वेगळ्या कोनातून दिसणारा आसमंत निरखत होतो. रेल्वेक्रॉसिंग
पार केल्यावर भेटली आमची इंद्रायणी नदी. पल्याड शेताडीमधून जाणारा वळणां-वळणांचा
अरुंद रस्ता आणि रस्त्यालगत असलेला चक्क नॅरोगेज रेल्वेरूळ. आता वापरात नसलेला हा
रेल्वेमार्ग अंग्रेजों-के-जमाने-मैं शिरोटा धरणाच्या कामासाठी वापरला असेल, असा
अंदाज बांधला. आता समोर दिसू लागला भला थोरला डोंगर. नकाशावरून लक्षात आलं, की हाच
वाळकचा डोंगर – म्हणजेच कार्ले लेणे ज्या डोंगररांगेत खोदली आहेत, त्या रांगेचा
पूर्वेकडचा शेवटचा भाग. डोंगर जवळ आल्यावर डावीकडे कच्च्या रस्त्यावरून निघालो. समोरच्या
कातळटप्प्यात असतील वाळक लेणी, कुठे असतील, अशी उत्सुकता लागलेली.

डोंगरउतारावर गुरं चारायला सोडून, मोबाईलमध्ये गुरफटलेल्या गुराख्याने ‘डोंगरात पांडवगुहा आहे’, असं सांगितल्यावर हुरूप आला. धारेवर ५० मी चढून डावीकडे (दक्षिणेला) कड्याच्या पोटापाशी आडवी-तिरकी चढाई करत गेलो.

बारकाईने तपासत
गेल्यावर कातळाच्या पोटात अर्धगोलाकार खोदाई डोकावली. झपाट्याने जवळ जाऊन
न्याहाळलं, तर लक्षात आलं की मुळातल्या नैसर्गिक खळग्याला २ मी व्यासाच्या छोट्या अर्ध-गोलाकार
दालनामध्ये खोदून काढलंय.

कातळातली चांगली कटाई आणि सुबक एकसंध उभे मारलेले छिन्नी-हातोड्याचे घाव (चिझेल मार्क्स). ही खोदाई कश्यासाठी, याचा अंदाज बांधू पाहिला. ध्यानगुंफेची ही जागा नाही वाटत. इथे कदाचित माती-दगडं रचून बनवलेला दागोबा असेल, असा अंदाज फर्ग्युसनचा.

कातळाच्या पोटातून
पुढे दक्षिणेला निघालो. एक मोठ्ठी गुहा असेल अशी खोलगट जाणवू लागलं. तिथे
पोहोचण्याआधी कातळसपाटीवर दिसला १.५ फुट लांबी-रुंदीचा उथळ चौकोन. टाकंच ते - मातीने
बुजलेलं, माथ्याकडच्या कातळावरून वाहणारं पावसाचं पाणी साठवण्यासाठीचं.
आणि, आता शिंदीच्या
झाडापासून उलगडू लागली उभ्या कड्याच्या पोटातली वाळकची मोठ्ठी गुहा. माथ्याकडून गुहेपर्यंतच्या
कातळावर झिरपणाऱ्या पाण्याच्या खुणा, वाळलेल्या भुऱ्या गवताची झुंबाडे अधेमध्ये आणि
त्याच्याखाली काळ्या-शेंदरी छटांच्या कातळाच्या पोटातली मुळातली नैसर्गिक गुहा.

पहा व्हिडीओ इथे:
कमानीसारखा आकार असलेला माथा. दोन्ही बाजूंची कातळाची कटाई उन्हांत उजळलेली. लख्ख कातळातलं भलंमोठ्ठ लेणं पाहून आम्ही भारावून गेलेलो.

पहा व्हिडीओ इथे:
कमानीसारखा आकार असलेला माथा. दोन्ही बाजूंची कातळाची कटाई उन्हांत उजळलेली. लख्ख कातळातलं भलंमोठ्ठ लेणं पाहून आम्ही भारावून गेलेलो.
लेण्याच्या डावीकडे
कातळात खोदलेला बाक बसण्यासाठी, ध्यानासाठी. उजवीकडे २ मी व्यासाची गोलाकार खोदाई.
वाटलं, इथे कदाचित धान्याचा रांजण असेल का आणि कालांतराने लेण्याची समोरची बाजू उध्वस्थ
झाली असेल का...

लेण्याच्या आतला भाग थोडा अरुंद होत गेलेला. लेण्याच्या आतल्या जागेच्या उजवीकडच्या निम्म्या भागात चौकोनी विहार खोदलेला. विहारात बाक नाही. विहाराची उजवीकडची भिंत नष्ट झाली असावी.
लेण्यात शिलालेख-दागोबा अश्या खुणा आढळल्या नाहीत. लेण्याच्या तळाशी गच्च माती साचलेली.

लेण्याच्या बाहेर
येऊन आता आसपास अजून काही टाकी-लेणी आहेत का, अशी कातळात चाचपणी केली. वाळक
लेण्यांचा निरोप घेतला. पायथ्याशी पोहोचलो, तेंव्हा पल्याडच्या झऱ्याच्या पात्रात कातळात
काहीतरी चौरसाकृती खोदाई आहे का असं वाटलं. नैसर्गिक वाहता झरा हेरून कातळात उथळ
चौकोनी टाकं खोदलेलं. आजही, गाई-गुरांना या पाण्याचा आधार मिळतो.

पलिकडे देवळाच्या परिसरात काही वीरगळी, समाधी शिळा आणि गजांतलक्ष्मी शिल्प वैशिष्ट्यपूर्ण होतं.

पलिकडे देवळाच्या परिसरात काही वीरगळी, समाधी शिळा आणि गजांतलक्ष्मी शिल्प वैशिष्ट्यपूर्ण होतं.
एकीकडे वाळक लेणे-टाक्याच्या
भेटीने ट्रेकर्स आनंदी झालेले. फर्ग्युसनने नोंद केलेल्या कार्ले लेण्याच्या
परिसरातल्या पुरातन मार्गालगत खोदलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या-लेण्यांच्या
साखळीतलं हे अजून एक लेणे गवसलेलं. दुसरीकडे खंत मात्र इतकीच, की कधीकाळी वर्षावास
(पावसाळ्यात आसरा) मिळावा म्हणून खोदवलेल्या लेण्याचा आजचा उपयोग मात्र पावसाळ्यात
गुरांना आडोसा इतकाच उरलाय.

कार्ले
डोंगररांगेत दक्षिण बाजूच्या लेणे-टाक्यांचे न सुटलेले जिग-सॉ कोडे - निरीक्षणे:
कार्ले डोंगररांगेत दक्षिण
बाजूच्या लेणे-टाकी (वळवणचे इंद्रायणी लेणे-टाके, देवघर लेणे, देवघर-वाकसईचे
लेणे-टाकी, शिलाटणे लेणे-टाकी, टाकवेचे टाके, वाळक लेणे-टाके आणि साई लेणे)
बघितल्यावर, नाणेमावळाच्या जिग-सॉमधले आमच्या गटाला पडलेले (आणि न सुटलेले) प्रश्न
आणि निरीक्षणे:
१.
स्थान
इथेच का: धर्म-सत्ताकेंद्र असलेल्या जगप्रसिद्ध कार्ले
लेण्याभोवतीच्या डोंगर-कातळांमध्ये खोदलेली आणि जणू उपग्रहांसारखा फेर धरलेले
लेणीविहार-ध्यानगुंफा. कार्ले लेणे परिसरातून वाहणाऱ्या पुरातन व्यापारी मार्गालगत
खोदलेली पाण्याची टाकी.
२.
काय
उद्देश:: डोंगरावरची लेणी साधकांसाठी ध्यानगुंफा
म्हणून; तर कोकण आणि देशाला जोडणाऱ्या पुरातन व्यापारी मार्गाच्या जोडीने कातळात
खोदलेली पाण्याची टाकी पांथस्थांच्या - व्यापाऱ्यांच्या - गाईगुरांच्या सोयीसाठी.
३.
कोणती
लेणेवैशिष्ट्य: ‘पुरातन मार्ग – वर्षावासासाठी कातळलेणे –
पांथस्थांसाठी पाण्याची टाकी’ अशी जोडगोळी कार्ले लेणे परिसरात तब्बल ७ ठिकाणी
आढळली. शिलाटणे लेण्यातला खोदीव रांजण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण. टाकवे टाक्यावरचे पुसट
ब्राम्ही शिलालेख पाहणं, विलक्षण आनंदाचा भाग. हे लेख अभ्यासकांनी नोंदवलेत-वाचलेत
का? शिलाटणे आणि वाळकची अर्धगोलाकार खोदाईचे लेणे कदाचित (माती-लाकडाच्या) बांधीव
दागोबासाठी. कुठे वळवण-इंद्रायणी लेण्यातले अतिसुबक छिन्नीचे घाव तर कुठे वाकसईचे
साध्या खोदाईचे लेणे – असा खोदाईमध्ये दर्जात्मक फरक जाणवण्याइतका. ठिकठिकाणी
खोदलेली खांबटाकी. कार्ले लेण्याशेजारी असूनही दागोबा कुठेच नाही, हे एक
वैशिष्ट्यच.
४.
कोणत्या
काळातली: कार्ले लेण्याच्या खोदाईनंतर शे-दोनशे
वर्षात खोदलेली लेणी असावीत – एक अंदाज.
५.
कोणत्या
विशिष्ठ धर्माची: शेजारची कार्ले लेणी
बौद्ध धर्मकृत्य असल्याने आणि बांधीव दागोबासाठी खोदलेल्या अर्धवर्तुळाकार
दालनांमुळे ही लेणी बौद्ध साधकांना एकांत साधनेसाठी खोदवली असावीत.
६.
कोणी
खोदवलेली – धर्माश्रय, राजाश्रय, व्यापारी हेतू?: टाकवे टाक्यावरील ब्राम्ही शिलालेखाचे वाचन झाल्यास धर्माश्रय कदाचित
सिद्ध होईल. व्यापारी मार्गालगत असल्याने व्यापारवृद्धीच्या सोयी हा हेतू नक्की.
राजाश्रय सांगता येत नाही, पण इतकी खोदाई बघता असेलच.
कार्ले डोंगररांगेत दक्षिण
बाजूची लेणी-टाकी धुंडाळताना विलक्षण अनुभूती आणि आनंद मिळालेला. मनापासून वाटतं
की - ही लेणी-टाकी-शिलालेख-रांजण-अर्धगोलाकार दालने अभ्यासकांनी पाहून अर्थ उलगडून
सांगावा; ट्रेकरदोस्तांनी ही अल्पपरिचित लेणी-टाकी अवश्य पाहावीत आणि
सह्याद्रीतल्या हरवलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा समजावून घ्याव्यात आणि मुख्य
म्हणजे आजच्या राक्षसी नागरीकरणाच्या हायवे-खाणी-हॉटेल्सच्या त्सुनामीपासून या लेण्यांचे-टाक्यांचे
रक्षण-संवर्धन व्हावे आणि पुढच्या पिढ्यांना हा वारसा अनुभवता यावा.
(पूर्वप्रकाशित: साप्ताहिक लोकप्रभा)
-----------------------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेकर
मंडळी: विवेक काळे सर, अमेय जोशी, निनाद बारटक्के, मिलिंद
लिमये, दिलीप वाटवे, दिलीप गपचूप आणि साईप्रकाश बेलसरे.
२. मन:पूर्वक
कृतज्ञता: डॉ. श्रीकांत प्रधान (पुणे), सचिन शेडगे (कामशेत), साईली पलांडे-दातार (पुणे)
३. ब्लॉगपोस्टचा
हेतू "आम्हीच नवीन लेणे शोधले", असा अजिबात नाही. ट्रेकर-इंडॉलोंजिस्ट दोस्तांबरोबर अनुभव शेअर करणे हा
आहे. लेण्यांबद्दल अधिक माहिती/ आधीचे संशोधन/ डॉक्युमेन्टेशन कोणाकडे असेल,
तर अवश्य अवश्य कळवावे.
४. लेणी
आराखडे: विवेक काळे सर
५. मावळ
नकाशा आणि ब्लॉगवरील फोटो: साईप्रकाश बेलसरे.
६. शक्यतो
उन्हाळ्यात या गुहालेण्यांना भेट देणे योग्य. वावर अजिबात नसल्याने,
सरिसृप-वटवाघळे-श्वापदे यांचा वावर असू शकतो. अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक. शरीर
पूर्ण झाकतील असे कपडे, ताकदीचे टॉर्च, काठी आवश्यक. भरपूर पाणी सोबत असावे.
७.
सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने
ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take
nothing but memories.
८.
ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील
लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश
बेलसरे, २०१८. सर्व हक्क सुरक्षित.
No comments:
Post a Comment