Pages

Saturday, 5 November 2016

डेऱ्या घाट आणि घोणदांड घाट:: ट्रेकरदोस्तांसाठी संक्षिप्त टिपणे

घनगडच्या नैऋत्य बाजूने डेऱ्या घाट आणि घोणदांड या पुरातन घाटवाटांवरून, सोनेरी गवताळ माळावरून, जुन्या संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधत, सुरेख सह्याद्रीदृश्यं अनुभवत, वाटांवरून हरवत, दमूनभागून पूर्ण केलेल्या दमदार चढाई-उतराईच्या ट्रेकचा 'संक्षिप्त' फोटो-ब्लॉग/ टिपणे...
     

   
वाटांचा अंदाज यावा, म्हणून कच्चा नकाशा...

   
डेऱ्या घाट:
  • घाटमाथ्यावरचे गाव: आसनवाडी (घुटके), जिल्हा पुणे
  • कोकणातले गाव: नागशेत, जिल्हा रायगड
  • स्थानवैशिष्ट्य: घनगडच्या नैऋत्य बाजूने चढणारी, कुंडलिका आणि मुळा खोरी जोडणारी पुरातन घाट
  • ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: खोदीव पायऱ्यांची मालिका
  • वाटेत पाणी: पावसाळ्यानंतर दोन महिने नैसर्गिक झऱ्यांचे पाणी
  • निवारा: नाही
  • उतराई: ५५० मी
  • वेळ: २.५ तास
  • घाटवाटेतल्या ठळक खुणा:
आसनवाडीतून उजवीकडे उत्तरेला मारठाण्याचा डोंगर आणि सुटावलेले सुळके दिसत होते. संध्याकाळी तिथून परत यायचं होतं. वाजले होते सकाळचे ७:२०.

आसनवाडीतून समोर पश्चिमेला गवताळ पठार चालून, मंद उतारावरून सह्यधारेपाशी गेलो.

उत्तरेला केवणी पठार, समोर पश्चिमेला उतरणारा घोणदांड घाट, तर दक्षिणेला गाढवलोट घाट तर आग्नेयेला अंधारबन घाटातला जांभळ्या डोंगर खुणावत होता.


उभ्या उतारावरून डावीकडे दक्षिणेला धारेवरून वाट उतरत गेलो.

वाटेसोबतची कारवी आणि रानफुलांची साथ.

माथ्यापासून १०० मी उभा उतार उतरल्यावर कातळावर पुसट ३-४ कातळकोरीव पायऱ्या आढळल्या.
(छायाचित्र साभार: आशुतोष कुलकर्णी)

आमच्या ट्रेकमध्ये नाही, पण श्री शशी डुंबरे यांना डेऱ्या घाटात कुठेतरी कातळावर ही अक्षरं आढळली आहेत. वाचन करता आलं नाही (छायाचित्र साभार: @ श्री शशी डुंबरे)

वाट गावकऱ्यांच्या वापरात असली, तरी करकरीत मळलेली नव्हती. उभ्या उताराने पाय हुळहुळू लागले.

दोन टप्प्यात उतरणारा आसनवाडीचा धबधबा आणि लगतचे दोन सुळके सुरेख दिसत होते.

माथ्यापासून १५० मी उतरल्यावर छोट्या ओढ्यापाशी पोहोचलो. ओढ्यापासून सरळ न जाता डावीकडे वळायचं होतं, जे शोधाशोध केल्यावरंच कळलं. डावीकडे वळल्यावर आली ६५ अंशात झुकलेल्या आणि २० मी लांबीच्या कातळावरून खोदलेल्या पायऱ्यांची मालिका. निश्चितंच, डेऱ्या घाटाची वाट पुरातन असल्याच्या खुणा!

मनाचा बराच हिय्या केला, पण पावसाळ्यात शेवाळलेल्या कातळपायऱ्यांवरून आडवं जाणं अवघड होतं. गावकरी सहजी जात होते. अनाठायी धोका नको, म्हणून पहिल्या प्रयत्नात ट्रेक इथेच सोडून परत यावे लागलेले...

डेऱ्या घाटाच्या दुसऱ्या प्रयत्नात मात्र कोरडा कातळ मिळाला.

दाट झाडीतून १५० मी उतरत गवताळ पठारावर पोहोचतो. सह्याद्रीभिंतीतून पुढे आलेल्या डेऱ्यासारख्या दिसणाऱ्या कातळमाथ्याच्या डावीकडून/ उत्तरेकडून वाट उतरली होती. वाजले होते सकाळचे ९.

केवणीच्या पठारापासून उतरणारा करकरीत दांड - 'घोणदांड' दिसत होता.  दिशाशोधनाच्या आडाखे बांधत, पठारावरून डेऱ्या घाटाकडे पाठ करून समोर पश्चिमेला निघालो.

पठारावरून डेऱ्याघाटाचा तळ गाठायला अजून १०० मी उतरावं लागलं. आधीची मळलेली वाट हरवल्यावर थेट उतरत ओढ्यापाशी उतरलो. डेऱ्या घाटाची ५५० मी उतराई करायला २.५ तास लागलेला. सकाळचे ९:४०.

घोणदांड घाट:
  • घाटमाथ्यावरचे गाव: एकोले, जिल्हा पुणे
  • जवळचा दुर्ग: घनगड
  • कोकणातले गाव: खडसांबळे, जिल्हा रायगड
  • स्थानवैशिष्ट्य: पुरातन बौद्ध खडसांबळे लेण्याच्या लगतचा घाट
  • ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: नाहीत
  • वाटेत पाणी: पावसाळ्यानंतर दोन महिने नैसर्गिक झऱ्यांचे पाणी
  • निवारा: नाही
  • चढाई: ५५० मी
  • वेळ: ३ तास
  • घाटवाटेतल्या ठळक खुणा:
घोणदांड घाटाची सुरुवात सापडणे अवघड आहे. ओढ्यापासून समोरचं पठार गाठलं. पाठीमागे डेऱ्या घाटाच्या झाडीचं सुरेख दर्शन.

घोणदांड घाटाच्या पायथ्याकडे चढत, गवताळ माळ तुडवत गेलो. वेळ १०:२०.

घोणदांड घाटाची सुरुवात सापडण्यासाठी खटपट सुरू होणार होती. सकाळचे १०:३०.

घोणदांड घाटाकडे जातानाची अतिरिक्त वस्पटी. दुपारचे १२:१५.

घोणदांड घाटाकडे जाताना याहून जास्त वस्पटी केली. फोटो काढण्याइतपत त्राण उरले नाहीत. खूप शक्ती आणि वेळ वाया गेला.
(छायाचित्र साभार: अमेय जोशी)

घोणदांडची वाट गवसली. डेऱ्या घाटाच्या तळाच्या ओढ्यापासून चढून पठार गाठल्यावर घोणदांडकडे न जाता, सपाटीवरून डावीकडे आडवं जात घोणदांड जिथे सपाटीपाशी उतरतो, तिथे जायला पाहिजे होतं.

सुग्रास जेवण - पुरणपोळी, कटाची आमटी.

घोणदांड घाटातून बुटका घनगड आणि उंच मारठाण्याचा डोंगर.

घोणदांड चढताना. या कातळाच्या डावीकडून चढणारी निवांत मळलेली वाट.

स्वर्गीय उडीचिरायत फुलांचे ताटवे. घोणदांड फत्ते. घोणदांड प्रसन्न!

केवणीच्या पठारावरून तेलबैला. केवणीच्या एकट्या घरात पाणी आणि ताक.
(छायाचित्र साभार: अमेय जोशी)

केवणीच्या आणि सह्याद्रीच्या मुख्य धारेदरम्यानच्या खिंडीतून दक्षिणेला डेऱ्या-घोणदांडच्या उतारांचं दर्शन 

केवणीच्या आणि सह्याद्रीच्या मुख्य धारेदरम्यानच्या खिंडीतून उत्तरेला तेलबैल्याच्या सुरेख भिंती

पूर्वेला घनगड आणि मारठाण्याचा डोंगर.


घनगडजवळ सोनेरी गवताळ माळांचे सुरेख landscapes आणि ecosystem. दुपारचे ४.

एकोले गावात न जाता, घनगडाच्या दक्षिणेकडून वाटचाल

आसनवाडीकडे जाणारी, फारशी न मळलेली वाट. सुरेख दृश्ये! लांबच लांब आडवी चाल.

इंगळी!!!!!!

मारठाण्याला वळसा घालताना...

फुललेल्या कारवीचा सडा

जांभळ्या डोंगराच्या पोटात आसनवाडीचं दर्शन. वेळ संध्याकाळचे ५:२५.

खंबीर ट्रेकभिडू - अमेय जोशी!

सुरेख ट्रेक. १०:३० तास. १६ किमी चाल. घनगडच्या नैऋत्य बाजूने डेऱ्या घाट आणि घोणदांड या पुरातन घाटवाटांवरून, सोनेरी गवताळ माळावरून, जुन्या संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधत, सुरेख सह्याद्रीदृश्यं अनुभवत, वाटांवरून हरवत, दमूनभागून पूर्ण केलेली दमदार चढाई-उतराई!!!
       

------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. कृतज्ञता: निनाद बारटक्के. अनवट घाटवाटांच्या माहिती आणि मार्गदर्शनाबद्दल. अन्यथा कधीच नसता हा ट्रेक केला.
२. कृतज्ञता: जितेंद्र बंकापुरे यांच्या ब्लॉगमधली डेऱ्या घाटाची माहिती - लिंक
३. ट्रेक मंडळी: साकेत गुडी, आशुतोष कुलकर्णी, अमेय जोशी
४. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
५. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१६. सर्व हक्क सुरक्षित.

6 comments:

  1. अप्रतिम लेख...नेहमीसारखाच...०५ नोव्हेंबरला शनिवारी घनगड आणि तैलबैला फिरलो...त्यामुळे लेख वाचण्याचा आनंद द्विगुणीत झाला...फोटो पाहून तिथेच पोचल्यासारखं वाटतंय...

    ReplyDelete
    Replies
    1. पुंडलिक,
      नेहेमीसारखा सविस्तर लेख लिहायचं ठरवलं, तर २-३ महिने मुहूर्त लागत नाही. म्हणून ट्रेकर्सना मदत होईल, असा फोटोब्लॉग पटकन लिहिण्याचा प्रयोग प्रयत्न केलाय.
      प्रतिक्रिया वाचून छान वाटलं. खूप धन्यवाद!

      Delete
  2. Replies
    1. जितेंद्र, धन्यवाद मित्रा! :)

      Delete
  3. >>नेहेमीसारखा सविस्तर लेख लिहायचं ठरवलं, तर २-३ महिने मुहूर्त लागत नाही. म्हणून ट्रेकर्सना मदत होईल, असा फोटोब्लॉग पटकन लिहिण्याचा प्रयोग प्रयत्न केलाय.
    प्रतिक्रिया वाचून छान वाटलं. खूप धन्यवाद!

    Mast lihila ahe. Thodkyat pan khup mahiti denara lekh.

    ReplyDelete
    Replies
    1. भूषण: ट्रेकरदोस्तांना नवीन घाटवाटा मोहिमांसाठी लागणारी माहिती एकत्र गोळा करण्याचा प्रयत्न केलाय. प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! :)

      Delete