सातवाहनांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणारे भोरांड्याचे दार - नाणेघाट

...चांदण्या राती नाणेघाटातल्या घळीत घुमणारा भर्राट वारा, कोकणात लुकलुकणारे दिवे बघत मारलेल्या गप्पा, गुहेतला मुक्काम, सकाळच्या गारव्यात 'भोरांड्याचे दार' घाटवाटेने उतराई, दोन ठिकाणी गवसलेली कातळकोरीव टाकी, उभ्या नाळेतल्या धोंड्यांमधली कसरत, पदरातला गच्च रानवा, सह्याद्रीचा विस्तीर्ण नजारा, भैरवगडाचं रौद्र रूप, उकळत्या उन्हातली पुरातन नाणेघाटाची वळणदार वाट, पळसाच्या झाडामागे धुम्म पळलेल्या हरणाची जोडी, वाटेतली असंख्य पाण्याची टाकी आणि अखेरीस नाणेघाटाच्या गुहेत स्मरलेलं सातवाहनांचं कर्तृत्व! 'भोरांड्याचे दार आणि नाणेघाट' या घाटवाटांच्या चढाई-उतराईच्या ट्रेकचा 'संक्षिप्त' वृत्तांत...
वाटांचा अंदाज यावा, म्हणून कच्चा नकाशा...
भोरांड्याचे दार:
- घाटमाथ्यावरचे गाव: अंजनावळे/ घाटघर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
- जवळचा दुर्ग: जीवधन
- कोकणातले गाव: भोरांडे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे
- स्थानवैशिष्ट्य: नाणेघाटाच्या ईशान्येस. पुरातन घाटवाट
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: माथ्याजवळ पाण्याचे दुतोंडी टाके, नाळेमध्ये पाण्याची दोन टाकी
- वाटेत पाणी: घाटाच्या नाळेमधल्या टाक्यांचे पाणी वर्षभर असते, पण नियमित उपसा नाही. टाळलेले बरे.
- निवारा: नाणेघाटाच्या गुहेत, किंवा परिसरातल्या हॉटेल्सजवळ
- उतराई: ५५० मी
- वेळ: २.५ तास
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:
नाणेघाटाच्या गुहेपासून ईशान्येला निघालो, तेंव्हा नानाचा अंगठा टोक कोवळ्या उन्हात न्हाऊन होतं. वेळ सकाळचे ७:१५.
मंद चढावरून सह्यधारेकडे चालत निघालो. समोर अंजनावळे गावच्या वऱ्हाडी डोंगराची टोके आभाळात घुसलेली.

भोरांड्याच्या दाराची उतराई सुरु व्हायच्या आधी, घाटाच्या माथ्याअलिकडे पाण्याची खोदलेली टाकी आहेत, अशी माहिती दिग्गज ट्रेकर दोस्त दिलीप वाटवे यांच्याकडून मिळालेली. टाकी सापडायची होती, पण माळावर काटेरी झुडुपांवर झोके घेणारे ऑर्किड्सचे झुबके सापडले.
टाकी आहेत तरी कुठे असा शोध चालू होता. थोडी शोधाशोध केल्यावर एका बंधाऱ्याजवळ उतरंड्या कातळावर टाकी गवसली. वेळ सकाळचे ८.
नाणेघाट - जीवधन परिसरात अजून काही कातळशिल्पे सापडणे हे आश्चर्य नसले, तरीही कधी न वाचलेले जुनं काही बघता आले, की आनंद वाटतोच.
कातळात खोदलेली तीन टाकी समोर होती. डावीकडे होतं थोडीशी खोदाई करून सुरुवातीलाच सोडून दिलेलं टाकं, तर उजवीकडे एक दुतोंडी टाकं.

दुतोंडी टाकं कातळाच्या आत खोदत नेलेले. पाणी नसलं, तर ओलसर चिखल साचलेला.
कातळखोदीव टाक्यांपासून हाकेच्या अंतरावर सह्यधारेजवळ भोरांड्याच्या दाराची वाट सुरुवात होणार, हा अंदाज अचूक ठरला. वेळ सकाळचे ८:१०.
झुडुपांमधून-धोंड्यांमधून ५० मी उतरल्यावर झालेलं भोरांडयाच्या दाराचं दर्शन.
पावसाळ्यात शिळंधार बरसणाऱ्या पावसाच्या पाण्याने पश्चिमेला कणखर सह्याद्रीमधून अशी घळीची वाट कोरून काढली होती.
अगणित धोंड्या-खडकांतून कातळभितींच्या साथीने उतराई करत होतो.
भोरांड्याच्या दारात अजून एके ठिकाणी पाण्याची टाकी आहेत, असं कुठेसं वाचलेलं. टाक्यांच्या स्थानाबद्दल मुंबईच्या ट्रेकर साधना चंदनशिवे यांच्याकडून थोडकी माहिती अमेयला मिळाली होती. "पाण्याची टाकी ना. हायेत की इथेच थोरल्या झाडापाशी. खोटं नाही सांगायचो...", एका मामांनी सांगितलं.
नाळेतले धोंडे संपत आले. थोरल्या झाडापाशी आलो. उजवीकडच्या कातळभिंतीत ७० फूट उंचावर टाकी होती. अर्थात, माहिती नसेल आणि मुद्दाम लक्ष नाही ठेवलं, तर घाटाच्या वाहत्या वाटेवरून त्या तिथे कातळभिंतीत पाण्याची टाकी असतील, हे कळणं तसं अवघडंच!
अलिकडच्या दरडीवरून वळसा घालून दरड चढून टाक्यांपाशी पोहोचलो. हेही दुतोंडी टाकं. कदाचित उपसा नसल्याने, उन्हाळ्यातही पाणी गच्च भरलेलं. थंडगार! आम्ही टाक्यांपाशी विसावलो असताना, खाली घाटवाटेने एक ट्रेकर ग्रुप वाटाड्यासह उतरत गेला. शेजारच्या कातळभिंतीवर पाण्याचं टाकं असेल, याचा त्यांना पत्ताही लागला नाही. वेळ सकाळचे ९.
आम्ही टाक्यांपासून उतरून परत मुख्य घाटवाटेवर आल्यावर, पदरातल्या रानाचा सुरेख टप्पा सुरु झाला. उंचच उंच वृक्ष!
समोर विखुरलेलं झाडीभरलं कोकण.

भोरांड्याच्या दारातून उतरत माळशेज घाटाच्या गाडीरस्त्यापर्यंत लांब चालत जाण्यापेक्षा, नैऋत्येला जात झाडीभरली सोंड पार करून थेट नाणेघाटाकडे वळसा घेत जाणारी वाट असेल का, याच्यावर ट्रेकर्सची चर्चा. स्थानिक लोकांना मात्र अश्या वाटेची गरज असेल, असं नाही वाटत. धोपट मार्गा सोडू नको, यावर एकमत झालं.
घाटातून उतरणारा ओढा समोर - वायव्येला निघाला, मात्र घाटवाट ओढ्याची साथ सोडून उत्तरेला भोरांडे गावाच्या दिशेने निघाली. झाडीच्या टप्प्यातून बाहेर आल्यावर मागे बघितलं, तर भोरांड्याच्या दाराची घळ लक्षवेधक होती.
किंचित चढावरून वाटेनं लपेटदार वळण घेतलं, आणि समोर उत्तरेला सामोरं सह्याद्रीचं भव्य दृश्य! कुलंग-मदन-अलंग-आजोबा-कात्राबाई आणि पायथ्याच्या कोकणातल्या वाड्या वस्त्या चढउतार... विलक्षण सुरेख दृश्य!
पदरातला सुरेख पानझडी रानवा.
उजवीकडे सह्यमाथ्याच्या भिंतीवर सूर्य तळपू लागलेला. सह्यधारेपासून सुटावलेला मोरोशी भैरवगडाची कातळभिंत खुणावू लागली. या भिंतींमधून चढाई-उतराई करणाऱ्या कुठल्या घाटवाटा असतील, याच्यावर चर्चासत्र झालं.

भैरवगडाचं भेदक पण देखणं रूप.
वाट अखेरीस पोहोचली कल्याण - अणे माळशेज गाडीरस्त्यावर. भोरांड्याच्या दाराची वाट सुरेख मळलेली, अजिबात न दमवणारी. वेळ सकाळचे १०:३०.
भोरांड्याच्या दाराने सह्याद्रीच्या उतराईनंतर चढाईसाठी दुसरी वाट हवीच की. वाट होती सुपरिचित नाणेघाटाची. घाटाचा पायथा गाठण्यासाठी जिपडं मिळालं...
पुरातन संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा - सातवाहनांचा नाणेघाट
- घाटमाथ्यावरचे गाव: घाटघर/अंजनावळे , जिल्हा पुणे
- जवळचा दुर्ग: जीवधन
- कोकणातले गाव: वैशाखरे, जिल्हा ठाणे
- स्थानवैशिष्ट्य: सोपारा, कल्याण आणि जुन्नर या प्राचीन बाजारपेठांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा घाट
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: वाटेवर खोदलेली अनेक टाकी, सातवाहन लेणे आणि शिलालेख
- वाटेत पाणी: पावसाळ्यानंतर दोन महिने नैसर्गिक झऱ्यांचे पाणी
- निवारा: घाटाच्या माथ्यापाशी गुहा. माथ्यापाशी हॉटेल्स.
- चढाई: ५५० मी
- वेळ: ३ तास (उंची खूप नसली, तरी वाट लांबची)
अचानक सागाचा पाचोळा उधळीत तीन हरणं (बार्किंग डिअर्स) एका क्षणात दिसेनाशी झाली. भडक रंगाच्या पळसाच्या झाडावरच्या काळतोंड्या माकडांना हूSSSSऊप्प असा खर्ज लावायला मिळालेलं.
नानाच्या अंगठ्यापल्याड आग्नेयेला नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग जीवधन आणि त्याचा सुळका वानरलिंगी.
दुपारचं कडक ऊन, नाणेघाटातला दमटपणा आणि कडाडून लागलेली भूक. त्यामुळे आंब्याच्या सावलीत वारं खात भोजनाचा प्रस्ताव एकमुखाने मान्य झाला. जेवून निवांत पडी मारली.
विश्रांतीनंतर सावलीतून चढाई. आजही नाणेघाटातून सामानाची वाहतूक करणारी लोकं भेटत होती.
वेलींमधून वाट काढताना ट्रेकरमंडळ.
चढ संपून वाट मोकळवनात आली. समोर नाणेघाटाचे जवळून दर्शन.
जणू आभाळात घुसलेला नानाचा अंगठा थंब्सअप करून प्रोत्साहन देत असला, तरी उन्हामुळं वाट ट्रेकर्सना दमवत होती.
झाडीतून चढणाऱ्या वळणाच्या वाटेवरून अचानक डावीकडे उभ्या कातळात काहीसं कोरलेलं जाणवलं.
पाण्याचं दुतोंडी टाकं. कोरडं.
नाणेघाटाची शेवटची १०० मी चढाई सुरू झालेली.
पुढच्या वळणावर कातळउतारावर पाण्याने गच्च भरलेलं अजून एक टाकं. नाणेघाटाच्या अंतिम चढाईमध्ये दमून-भागून तहानलेल्या पांथस्थांसाठी गुरांसाठी सुरेख सोय!
एव्हाना भरपूर उंची गाठल्याने वारं भारी आणि दृश्यही!
पुढच्याच वळणावर अजून दोन टाकी - अर्धवट खोदाई करून सोडून दिलेली.
पश्चिमेला झुकलेल्या सूर्यकिरणांत उजळलेल्या फरसबंदीच्या वाटेने चढाई.
नाणेघाटात भेटलेलं गोड कुटुंब (अर्थात यांचा उपद्रवसुद्धा होतोच)
नाणेघाटाची चढाई बरीचशी पसरट लांबची. त्यामुळे, कित्ती लांबून निघालो याचं दृश्य.
पुढच्या वळणावर अर्धवट सोडलेल्या टाक्याची खोदाई.
अजून एक अर्धवट खोदाई.
अखेरीस पोहोचलो नाणेघाटातल्या सातवाहनांच्या लेण्यापाशी. वेळ संध्याकाळचे ४:३०.
नाणेघाटातील हे लेणे श्रीसातकर्णी आणि नागनिकेच्या वेदिसिरी नावाच्या मुलाने यांनी इसपू पहिल्या शतकात खोदवलेले.
नाणेघाट लेण्यातले शिलालेख आणि खाली कोरलेल्या बाकाचे अवशेष. ब्राम्ही लिपीतील प्राकृत भाषेतला शिलालेख श्रीसातकर्णी आणि नागनिकेच्या कामाची ओळख करून देतो.
महाराष्ट्रातल्या सुवर्णकाळाचे कर्तृत्व गाजवणाऱ्या सातवाहनांच्या ८ प्रतिमा आणि त्या प्रतिमांच्या नावांचे शिलालेख याच लेण्यात कोरलेल्या होत्या. मूर्तीभंजकांनी त्या पूर्णपणे फोडल्यात. सद्ध्या लेण्यात या प्रतिमांच्या उरलेल्या फक्त पायांच्या खुणा बघताना, सातवाहनांच्या प्रतिमांच्या कोणत्या दृश्याला आपण मुकलोय, याची हुरहूर वाटली. का कुणास ठावूक, या प्रतिमांच्या पायांना स्पर्श केला आणि आमच्या महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या सातवाहनांच्या कर्तृत्वाला मनोमन वंदन केलं.
गुहेबाहेर ७-८ थंड पाण्याची टाकी.
नाणेघाटाच्या लेण्यातून माथ्याकडे निघालो. रस्ते-रेल्वे-विमाने यांच्या आधुनिक काळात नाणेघाटाचं महत्त्व कदाचित समजणार नाही; पण सव्वादोन हजार वर्षांपेक्षा कित्येक राजवटी, व्यापारी, सत्तांतरे, व्यापारी, देशोविदेशांचे वाटसरू, गुरेढोरे, सुखदुःखे आणि संस्कृती अनुभवलेली ही घळी...
माथ्याजवळ साधे विहार खोदलेले.
एका विहारात उत्तरकाळात गणेशाची स्थापना.
नानाच्या अंगठ्याजवळून दक्षिणेला ढाकोबा आणि त्याही पलीकडे गोरखगडापर्यंतचा मनोहारी परिसर.
महाराष्ट्राच्या संस्कृतीची बीजे रोवणाऱ्या आणि तब्बल ४५० वर्षे राज्य करणाऱ्या सातवाहनांची आठवण जागवणारा नाणेघाट, घाटाच्या मुखापाशी असलेला जकातीचा (की पाण्याचा) दगडी रांजण आणि मागे नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग जीवधन.
------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेक मंडळी: साकेत गुडी, अमेय जोशी, पियुष बोरोले, साईप्रकाश बेलसरे
२. ब्लॉगवरील फोटो: साकेत गुडी, अमेय जोशी, साईप्रकाश बेलसरे
३. कृतज्ञता: साधना चंदनशिवे आणि दिलीप वाटवे - ज्यांच्याकडून भोरांड्याच्या दारातल्या पाण्याच्या टाक्यांची माहिती मिळाली
४. संदर्भ कृतज्ञता: आनंद कानिटकर यांचा साप्ताहिक लोकप्रभामधील लेख (१० फेब्रुवारी, १७)
५. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
६. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१७. सर्व हक्क सुरक्षित.
...चांदण्या राती नाणेघाटातल्या घळीत घुमणारा भर्राट वारा, कोकणात लुकलुकणारे दिवे बघत मारलेल्या गप्पा, गुहेतला मुक्काम, सकाळच्या गारव्यात 'भोरांड्याचे दार' घाटवाटेने उतराई, दोन ठिकाणी गवसलेली कातळकोरीव टाकी, उभ्या नाळेतल्या धोंड्यांमधली कसरत, पदरातला गच्च रानवा, सह्याद्रीचा विस्तीर्ण नजारा, भैरवगडाचं रौद्र रूप, उकळत्या उन्हातली पुरातन नाणेघाटाची वळणदार वाट, पळसाच्या झाडामागे धुम्म पळलेल्या हरणाची जोडी, वाटेतली असंख्य पाण्याची टाकी आणि अखेरीस नाणेघाटाच्या गुहेत स्मरलेलं सातवाहनांचं कर्तृत्व! 'भोरांड्याचे दार आणि नाणेघाट' या घाटवाटांच्या चढाई-उतराईच्या ट्रेकचा 'संक्षिप्त' वृत्तांत...
वाटांचा अंदाज यावा, म्हणून कच्चा नकाशा...
भोरांड्याचे दार:
- घाटमाथ्यावरचे गाव: अंजनावळे/ घाटघर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
- जवळचा दुर्ग: जीवधन
- कोकणातले गाव: भोरांडे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे
- स्थानवैशिष्ट्य: नाणेघाटाच्या ईशान्येस. पुरातन घाटवाट
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: माथ्याजवळ पाण्याचे दुतोंडी टाके, नाळेमध्ये पाण्याची दोन टाकी
- वाटेत पाणी: घाटाच्या नाळेमधल्या टाक्यांचे पाणी वर्षभर असते, पण नियमित उपसा नाही. टाळलेले बरे.
- निवारा: नाणेघाटाच्या गुहेत, किंवा परिसरातल्या हॉटेल्सजवळ
- उतराई: ५५० मी
- वेळ: २.५ तास
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:
नाणेघाटाच्या गुहेपासून ईशान्येला निघालो, तेंव्हा नानाचा अंगठा टोक कोवळ्या उन्हात न्हाऊन होतं. वेळ सकाळचे ७:१५.
मंद चढावरून सह्यधारेकडे चालत निघालो. समोर अंजनावळे गावच्या वऱ्हाडी डोंगराची टोके आभाळात घुसलेली.
टाकी आहेत तरी कुठे असा शोध चालू होता. थोडी शोधाशोध केल्यावर एका बंधाऱ्याजवळ उतरंड्या कातळावर टाकी गवसली. वेळ सकाळचे ८.
कातळात खोदलेली तीन टाकी समोर होती. डावीकडे होतं थोडीशी खोदाई करून सुरुवातीलाच सोडून दिलेलं टाकं, तर उजवीकडे एक दुतोंडी टाकं.
दुतोंडी टाकं कातळाच्या आत खोदत नेलेले. पाणी नसलं, तर ओलसर चिखल साचलेला.
कातळखोदीव टाक्यांपासून हाकेच्या अंतरावर सह्यधारेजवळ भोरांड्याच्या दाराची वाट सुरुवात होणार, हा अंदाज अचूक ठरला. वेळ सकाळचे ८:१०.
झुडुपांमधून-धोंड्यांमधून ५० मी उतरल्यावर झालेलं भोरांडयाच्या दाराचं दर्शन.
पावसाळ्यात शिळंधार बरसणाऱ्या पावसाच्या पाण्याने पश्चिमेला कणखर सह्याद्रीमधून अशी घळीची वाट कोरून काढली होती.
अगणित धोंड्या-खडकांतून कातळभितींच्या साथीने उतराई करत होतो.
भोरांड्याच्या दारात अजून एके ठिकाणी पाण्याची टाकी आहेत, असं कुठेसं वाचलेलं. टाक्यांच्या स्थानाबद्दल मुंबईच्या ट्रेकर साधना चंदनशिवे यांच्याकडून थोडकी माहिती अमेयला मिळाली होती. "पाण्याची टाकी ना. हायेत की इथेच थोरल्या झाडापाशी. खोटं नाही सांगायचो...", एका मामांनी सांगितलं.
नाळेतले धोंडे संपत आले. थोरल्या झाडापाशी आलो. उजवीकडच्या कातळभिंतीत ७० फूट उंचावर टाकी होती. अर्थात, माहिती नसेल आणि मुद्दाम लक्ष नाही ठेवलं, तर घाटाच्या वाहत्या वाटेवरून त्या तिथे कातळभिंतीत पाण्याची टाकी असतील, हे कळणं तसं अवघडंच!
अलिकडच्या दरडीवरून वळसा घालून दरड चढून टाक्यांपाशी पोहोचलो. हेही दुतोंडी टाकं. कदाचित उपसा नसल्याने, उन्हाळ्यातही पाणी गच्च भरलेलं. थंडगार! आम्ही टाक्यांपाशी विसावलो असताना, खाली घाटवाटेने एक ट्रेकर ग्रुप वाटाड्यासह उतरत गेला. शेजारच्या कातळभिंतीवर पाण्याचं टाकं असेल, याचा त्यांना पत्ताही लागला नाही. वेळ सकाळचे ९.
आम्ही टाक्यांपासून उतरून परत मुख्य घाटवाटेवर आल्यावर, पदरातल्या रानाचा सुरेख टप्पा सुरु झाला. उंचच उंच वृक्ष!
समोर विखुरलेलं झाडीभरलं कोकण.
भोरांड्याच्या दारातून उतरत माळशेज घाटाच्या गाडीरस्त्यापर्यंत लांब चालत जाण्यापेक्षा, नैऋत्येला जात झाडीभरली सोंड पार करून थेट नाणेघाटाकडे वळसा घेत जाणारी वाट असेल का, याच्यावर ट्रेकर्सची चर्चा. स्थानिक लोकांना मात्र अश्या वाटेची गरज असेल, असं नाही वाटत. धोपट मार्गा सोडू नको, यावर एकमत झालं.
घाटातून उतरणारा ओढा समोर - वायव्येला निघाला, मात्र घाटवाट ओढ्याची साथ सोडून उत्तरेला भोरांडे गावाच्या दिशेने निघाली. झाडीच्या टप्प्यातून बाहेर आल्यावर मागे बघितलं, तर भोरांड्याच्या दाराची घळ लक्षवेधक होती.
किंचित चढावरून वाटेनं लपेटदार वळण घेतलं, आणि समोर उत्तरेला सामोरं सह्याद्रीचं भव्य दृश्य! कुलंग-मदन-अलंग-आजोबा-कात्राबाई आणि पायथ्याच्या कोकणातल्या वाड्या वस्त्या चढउतार... विलक्षण सुरेख दृश्य!
घाटाची उरलेली उतराई म्हणजे पदरातून लांबच लांब आडवी वाट, अलगत उतरणारी वळणां-वळणांची. एव्हाना समोर वायव्येला न्हाप्ता-हरिश्चन्द्रगडाचा कोकणकडा-तारामती-हरिश्चन्द्र शिखरे खुणावू लागली.
पदरातला सुरेख पानझडी रानवा.
उजवीकडे सह्यमाथ्याच्या भिंतीवर सूर्य तळपू लागलेला. सह्यधारेपासून सुटावलेला मोरोशी भैरवगडाची कातळभिंत खुणावू लागली. या भिंतींमधून चढाई-उतराई करणाऱ्या कुठल्या घाटवाटा असतील, याच्यावर चर्चासत्र झालं.
भैरवगडाचं भेदक पण देखणं रूप.
वाट अखेरीस पोहोचली कल्याण - अणे माळशेज गाडीरस्त्यावर. भोरांड्याच्या दाराची वाट सुरेख मळलेली, अजिबात न दमवणारी. वेळ सकाळचे १०:३०.
भोरांड्याच्या दाराने सह्याद्रीच्या उतराईनंतर चढाईसाठी दुसरी वाट हवीच की. वाट होती सुपरिचित नाणेघाटाची. घाटाचा पायथा गाठण्यासाठी जिपडं मिळालं...
पुरातन संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा - सातवाहनांचा नाणेघाट
- घाटमाथ्यावरचे गाव: घाटघर/अंजनावळे , जिल्हा पुणे
- जवळचा दुर्ग: जीवधन
- कोकणातले गाव: वैशाखरे, जिल्हा ठाणे
- स्थानवैशिष्ट्य: सोपारा, कल्याण आणि जुन्नर या प्राचीन बाजारपेठांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा घाट
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: वाटेवर खोदलेली अनेक टाकी, सातवाहन लेणे आणि शिलालेख
- वाटेत पाणी: पावसाळ्यानंतर दोन महिने नैसर्गिक झऱ्यांचे पाणी
- निवारा: घाटाच्या माथ्यापाशी गुहा. माथ्यापाशी हॉटेल्स.
- चढाई: ५५० मी
- वेळ: ३ तास (उंची खूप नसली, तरी वाट लांबची)
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:
सुपरिचित नाणेघाटाच्या चढाईत काय नाविन्य, हा 'गैरसमज' ठरला याचा आम्हांला आनंदच झाला. इतकी सुरेल आणि प्रसन्न चढाई आणि सातवाहनांच्या पाऊलखुणा!
कल्याण - अणे माळशेज गाडीरस्त्यावर नाणेघाटाच्या पायथ्याशी वैशाखरे (वैश्यगृह) गावाजवळ पोहोचलो. वेळ सकाळचे ११:३०.

रुंद बैलगाडीवाटेने वाट आग्नेयेला नाणेघाटाची मंद चढाची वाट सुरू झाली. नानाचा अंगठ्याच्या डावीकडच्या बेचक्यातली नाणेघाटाची घळ गाठायची होती.
डावीकडे वायव्येला उतरणाऱ्या सोंडेपल्याड सह्याद्री माथ्यावरचे अंजनावळेचे वऱ्हाडी डोंगर खुणावत होते. याच सोंडेला पार करून भोरांड्याच्या दारातून नाणेघाटात थेट येता येईल का, असं वाटलेलं. शक्यता कमीच!
अचानक सागाचा पाचोळा उधळीत तीन हरणं (बार्किंग डिअर्स) एका क्षणात दिसेनाशी झाली. भडक रंगाच्या पळसाच्या झाडावरच्या काळतोंड्या माकडांना हूSSSSऊप्प असा खर्ज लावायला मिळालेलं.
नानाच्या अंगठ्यापल्याड आग्नेयेला नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग जीवधन आणि त्याचा सुळका वानरलिंगी.
दुपारचं कडक ऊन, नाणेघाटातला दमटपणा आणि कडाडून लागलेली भूक. त्यामुळे आंब्याच्या सावलीत वारं खात भोजनाचा प्रस्ताव एकमुखाने मान्य झाला. जेवून निवांत पडी मारली.
विश्रांतीनंतर सावलीतून चढाई. आजही नाणेघाटातून सामानाची वाहतूक करणारी लोकं भेटत होती.
वेलींमधून वाट काढताना ट्रेकरमंडळ.
चढ संपून वाट मोकळवनात आली. समोर नाणेघाटाचे जवळून दर्शन.
जणू आभाळात घुसलेला नानाचा अंगठा थंब्सअप करून प्रोत्साहन देत असला, तरी उन्हामुळं वाट ट्रेकर्सना दमवत होती.
झाडीतून चढणाऱ्या वळणाच्या वाटेवरून अचानक डावीकडे उभ्या कातळात काहीसं कोरलेलं जाणवलं.
पाण्याचं दुतोंडी टाकं. कोरडं.
नाणेघाटाची शेवटची १०० मी चढाई सुरू झालेली.
पुढच्या वळणावर कातळउतारावर पाण्याने गच्च भरलेलं अजून एक टाकं. नाणेघाटाच्या अंतिम चढाईमध्ये दमून-भागून तहानलेल्या पांथस्थांसाठी गुरांसाठी सुरेख सोय!
एव्हाना भरपूर उंची गाठल्याने वारं भारी आणि दृश्यही!
पुढच्याच वळणावर अजून दोन टाकी - अर्धवट खोदाई करून सोडून दिलेली.
पश्चिमेला झुकलेल्या सूर्यकिरणांत उजळलेल्या फरसबंदीच्या वाटेने चढाई.
नाणेघाटात भेटलेलं गोड कुटुंब (अर्थात यांचा उपद्रवसुद्धा होतोच)
नाणेघाटाची चढाई बरीचशी पसरट लांबची. त्यामुळे, कित्ती लांबून निघालो याचं दृश्य.
पुढच्या वळणावर अर्धवट सोडलेल्या टाक्याची खोदाई.
अजून एक अर्धवट खोदाई.
अखेरीस पोहोचलो नाणेघाटातल्या सातवाहनांच्या लेण्यापाशी. वेळ संध्याकाळचे ४:३०.
नाणेघाटातील हे लेणे श्रीसातकर्णी आणि नागनिकेच्या वेदिसिरी नावाच्या मुलाने यांनी इसपू पहिल्या शतकात खोदवलेले.
नाणेघाट लेण्यातले शिलालेख आणि खाली कोरलेल्या बाकाचे अवशेष. ब्राम्ही लिपीतील प्राकृत भाषेतला शिलालेख श्रीसातकर्णी आणि नागनिकेच्या कामाची ओळख करून देतो.
महाराष्ट्रातल्या सुवर्णकाळाचे कर्तृत्व गाजवणाऱ्या सातवाहनांच्या ८ प्रतिमा आणि त्या प्रतिमांच्या नावांचे शिलालेख याच लेण्यात कोरलेल्या होत्या. मूर्तीभंजकांनी त्या पूर्णपणे फोडल्यात. सद्ध्या लेण्यात या प्रतिमांच्या उरलेल्या फक्त पायांच्या खुणा बघताना, सातवाहनांच्या प्रतिमांच्या कोणत्या दृश्याला आपण मुकलोय, याची हुरहूर वाटली. का कुणास ठावूक, या प्रतिमांच्या पायांना स्पर्श केला आणि आमच्या महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या सातवाहनांच्या कर्तृत्वाला मनोमन वंदन केलं.
नाणेघाटाच्या लेण्यातून माथ्याकडे निघालो. रस्ते-रेल्वे-विमाने यांच्या आधुनिक काळात नाणेघाटाचं महत्त्व कदाचित समजणार नाही; पण सव्वादोन हजार वर्षांपेक्षा कित्येक राजवटी, व्यापारी, सत्तांतरे, व्यापारी, देशोविदेशांचे वाटसरू, गुरेढोरे, सुखदुःखे आणि संस्कृती अनुभवलेली ही घळी...
माथ्याजवळ साधे विहार खोदलेले.
एका विहारात उत्तरकाळात गणेशाची स्थापना.
नानाच्या अंगठ्याजवळून दक्षिणेला ढाकोबा आणि त्याही पलीकडे गोरखगडापर्यंतचा मनोहारी परिसर.
महाराष्ट्राच्या संस्कृतीची बीजे रोवणाऱ्या आणि तब्बल ४५० वर्षे राज्य करणाऱ्या सातवाहनांची आठवण जागवणारा नाणेघाट, घाटाच्या मुखापाशी असलेला जकातीचा (की पाण्याचा) दगडी रांजण आणि मागे नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग जीवधन.
नाणेघाटासारख्या सुपरिचित जागेचा ट्रेक असूनही, ट्रेकचा भन्नाट अनुभव आलेला...
चांदण्या राती नाणेघाटातल्या घळीत घुमणारा भर्राट वारा, कोकणात लुकलुकणारे दिवे बघत मारलेल्या गप्पा, लेणेगुहेतला मुक्काम, सकाळच्या गारव्यात 'भोरांड्याचे दार' घाटवाटेने उतराई, दोन ठिकाणी गवसलेली कातळकोरीव टाकी, उभ्या नाळेतल्या धोंड्यांमधली कसरत, पदरातला गच्च रानवा, सह्याद्रीचा विस्तीर्ण नजारा, भैरवगडाचं रौद्र रूप, उकळत्या उन्हातली पुरातन नाणेघाटाची वळणदार वाट, पळसाच्या झाडामागे धुम्म पळलेल्या हरणाची जोडी, वाटेतली असंख्य पाण्याची टाकी आणि अखेरीस नाणेघाटाच्या गुहेत स्मरलेलं सातवाहनांचं कर्तृत्व!
'भोरांड्याचे दार आणि नाणेघाट' या घाटवाटांच्या चढाई-उतराईचं गारुड मनावर स्वार झालेलं, अजूनही तशीच धुंदी अनुभवतोय....
चांदण्या राती नाणेघाटातल्या घळीत घुमणारा भर्राट वारा, कोकणात लुकलुकणारे दिवे बघत मारलेल्या गप्पा, लेणेगुहेतला मुक्काम, सकाळच्या गारव्यात 'भोरांड्याचे दार' घाटवाटेने उतराई, दोन ठिकाणी गवसलेली कातळकोरीव टाकी, उभ्या नाळेतल्या धोंड्यांमधली कसरत, पदरातला गच्च रानवा, सह्याद्रीचा विस्तीर्ण नजारा, भैरवगडाचं रौद्र रूप, उकळत्या उन्हातली पुरातन नाणेघाटाची वळणदार वाट, पळसाच्या झाडामागे धुम्म पळलेल्या हरणाची जोडी, वाटेतली असंख्य पाण्याची टाकी आणि अखेरीस नाणेघाटाच्या गुहेत स्मरलेलं सातवाहनांचं कर्तृत्व!
'भोरांड्याचे दार आणि नाणेघाट' या घाटवाटांच्या चढाई-उतराईचं गारुड मनावर स्वार झालेलं, अजूनही तशीच धुंदी अनुभवतोय....
------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेक मंडळी: साकेत गुडी, अमेय जोशी, पियुष बोरोले, साईप्रकाश बेलसरे
२. ब्लॉगवरील फोटो: साकेत गुडी, अमेय जोशी, साईप्रकाश बेलसरे
३. कृतज्ञता: साधना चंदनशिवे आणि दिलीप वाटवे - ज्यांच्याकडून भोरांड्याच्या दारातल्या पाण्याच्या टाक्यांची माहिती मिळाली
४. संदर्भ कृतज्ञता: आनंद कानिटकर यांचा साप्ताहिक लोकप्रभामधील लेख (१० फेब्रुवारी, १७)
५. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
६. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१७. सर्व हक्क सुरक्षित.

लिखाण उत्तम आहे. मस्त वाटलं वाचून. माहिती छान दिलीत. फोटोस सुध्दा सुंदर आले आहेत. मला सुध्दा आता हा नानेघाट खुणावतोय.
ReplyDeleteमयुर,
Deleteब्लॉगवर स्वागत! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
सुरेख फोटोजचं क्रेडीट खरंतर मित्र अमेय आणि साकेत, यांनाच जास्त!
ट्रेकर्सना मदत व्हावी इतकीच माहिती आणि लग्गेच जावसं वाटावं, हा लिखाणाचा हेतू आहे.. धन्यवाद
नेहमीप्रमाणे सुंदर,सहज आणि ओघवते लिखाण.८६ साली भोरांड्याच्या वाटेवर थोडेसेच उतरून गेलो होतो.आता मात्र पुन्हा जायची तीव्र इच्छा होतीय. बघू केव्हां योग्य येतो ते!
ReplyDeleteगुरुवर्य काका,
Deleteखूप धन्यवाद _/\_
बरीच वर्षं भोरांड्याच्या दाराच्या टाक्यांबद्दल ऐकून होतो. माहिती आत्ता मिळाली आणि योग जुळून आला..
अतिशय अभ्यासु अाणि सुरेख लिखाण, नुसता ब्लॉग वाचून नाणेघाटात जाण्यासाठी पाय शिवशिवु लागले अाहेत.
ReplyDeleteब्लॉग मधली निरीक्षणे डोळस भटकंती कशी करावी याचा वस्तुपाठ घालून देतात.
रोहित,
Deleteखूप धन्यवाद..
तुम्ही कौतुक करताय खरं, पण मी साधंसोपं डोंगरयात्रा टेम्प्लेटमध्ये ट्रेकर्सना मदत होईल, असं लिहायचा प्रयत्न करतोय...
धन्यवाद.. 👍☺️
nice
ReplyDeleteधन्यवाद.. 👍👌☺️
Deleteसाई नेहमीप्रमाणे सुंदर लिखाण आणि फोटो.
ReplyDeleteधन्यवाद विनीत! :)
Deleteआधी केला नसेल, तर अवश्य करा हे घाटवाट लूप..
नेहमीप्रमाणे उत्तम... नुकताच दोन महिन्यांपूर्वी जूनमध्ये नाणेघाटाची चढाई झाली होती...त्यामुळे आठवणी जाग्या झाल्या...भोरांड्याच्या दाराविषयी जास्त माहिती आणि छायाचित्रे भेटत नाहीत ती भेटली...
ReplyDeleteपुंडलिक, धन्यवाद मित्रा..
Deleteअगदी खरंय, दोन्ही घाट परिचित असले, तरी भोरांड्याचे दार आणि विशेषतः पाण्याची दोन ठिकाणी असलेली टाकी याबद्दल माहिती-फोटो उपलब्ध नव्हते.
ही माहिती या ब्लॉगमधून मिळावी आणि या ट्रेकची हाक यावी, हा ब्लॉगचा हेतू.
Khup Mast Mitra...
ReplyDeleteसुंदर ब्लॉग. तुमचा घाटवाटांचा ध्यास खूप आवडला. माझी घाटवाटांची पहिली भटकंती म्हणून मी हाच लूप निवडला. तुमच्या ब्लॉगची खूपच मदत झाली.
ReplyDeleteमनापासून आभार आणि पुढील भटकंतीसाठी खूप खूप शुभेच्छा .
प्राचीन इतिहासाचा साक्षीदार नानेघाट.
ReplyDeleteअखंड साडेचारशे वर्षे राज्य करणाऱ्या सातवाहन साम्राज्याच्या तीस राजांच्या वैभवशाली इतिहासाची व परंपरेचा साक्ष देणारा नानेघाट...!
इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की इतिहासकारांनी आपला इतिहास संकुचित करुन ठेवलेला आहे कारण इतिहासात सातवाहन राजांनी निर्माण केलेले वैभव अजूनही अज्ञात आहे त्यांचा बराचसा इतिहास अजून समोर आणला जात नाही. महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण भारतातील सर्वात पहिली ज्ञात राजवट कोणती असेल तर ती सातवाहन राजवट आहे. जगातील सर्वात जास्त काळ म्हणजेच साडेचारशे वर्षे एकाच राजकीय घराण्याची सत्ता एकाच भूभागावर असण्याचे कदाचित एकमेव उदाहरण म्हणजे सातवाहन साम्राज्य.
सातवाहन राजांनी व्यापार व व्यापारासाठी आवश्यक दळणवळण विशेषतः परदेशी व्यापार वृध्दिंगत होण्यासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला त्यासाठी बंदरांचा विकास व व्यापारी मार्ग निर्माण करण्यासाठी विशेष लक्ष दिले. राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी व्यापारी मार्ग निर्माण करणे व त्यातूनच परदेशी व्यापाराला चालना देणे हा उद्देश. परदेशी व्यवहारातून मिळणारे उत्पन्न व्यापारातून मिळणारा जकात याच उत्पन्नाचे साम्राज्यात लोकोपयोगी सुविधा उपलब्ध करणारे सातवाहन राजे हे सम्राट अशोकाचे खरे वारसदार ठरतात.
परदेशी व्यापाराला वृध्दिंगत करण्यासाठी व्यापारी बंदरांसोबतच बाजारपेठांचा विकास महत्वाच्या असतो त्यामुळे जुन्नर, प्रतिष्ठान, नाशिक, तेर यासारख्या नगरांचा आणि बाजारपेठांचा व सुपारक, कल्याण, ठाणे, चोल सारख्या बंदरांचा विकास करण्यात आला. ह्या व्यापारी बाजारपेठा कोकणातील समुद्र किनार्यावर असलेल्या बंदरातून आयात निर्यात करण्यासाठी प्रतिष्ठान (पैठण) ते जुन्नर आणि जुन्नर ते कल्याण आणि कल्याण ते सुपारक (सोपारा) अशी दळणवळणाची गरज निर्माण झाल्याने नानेघाटची निर्मिती करण्यात आली. नानेघाटामुळे घाटमाथा व कोकण जोडला गेला.
बैलावरून, घोड्यावरून मालाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या निवार्यासाठी लेणी कोरलेली आहेत पाण्याची टाकी खोदलेल्या आहेत. घाटात प्रवेश करण्यासाठी एक कर द्यावा लागत होत तो कर जमा करण्यासाठी एक रांजन आहे तो रांजन जकातीचे नाने जमा करण्यासाठी उपयोगात आणला जात होता ही सर्व कोरीव शिल्प आजही सातवाहन कालीन वैभवाची अस्तित्व दाखवून देत आहेत. मुख्य लेण्यात विस्तृत शिलालेख आहेत सातवाहन राजांनी दिलेल्या अनेक मौल्यवान देणग्या दिल्या त्यांचा उल्लेख आहे त्यांनी केलेल्या विविध यज्ञांचा उल्लेख आहे. सातवाहन कुळातील निकटचे नातेवाईक असलेल्या आठ व्यक्तिंचा शिल्पाच्या आणि शिलालेखांच्या माध्यमातून उल्लेख केलेला आहे ती शिल्प सध्या नष्ट केली आहेत परंतु शिलालेख अजून आपले अस्तित्व दाखवत आहेत त्या ठिकाणी कोरलेल्या शिल्पांच्या पायाचा भाग अजूनही दिसुन येतो.
साडेचारशे वर्षे सातवाहन साम्राज्यातील सर्व राजांनी बौध्द धम्माच्या वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेला दिसतो. कोरीव लेण्यांसाठी, शिल्पकलेचा विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दान दिल्याचे पुरावे शिलालेखांमधून उपलब्ध आहेत. इ. स. पुर्व दुसर्या शतकामध्ये सिरी सातवाहन याने सातवाहन या साम्राज्याची सुरूवात केली पुढे कृष्ण, सातकर्णी, पुलुवामी, हाल, गौतमीपुत्र साणकर्णी, वासिष्टिपुत्र पुलुवामी, यज्ञश्री सातकर्णी या राजांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक समाजामध्ये असलेली सहिष्णुता ही सातवाहन राजांचा वैभवशाली इतिहासाची परिणती होती. नानेघाट येथे असलेल्या विस्तृत शिलालेख हा याचा पुरावा आहे.
नानेघाटाच्या संरक्षणासाठी शिवनेरी, हडसर, चावड आणि जीवधन सारख्या आजूबाजूच्या गिरीदुर्गांचा उपयोग करण्यात येत होता. त्यामुळे नानेघाटाचे साम्राज्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व समजून घ्यायला मदत होते. या ऐतिहासिक वारसा निर्माण करणाऱ्या त्या अनामिक कलाकारांच्या कलेला प्रणाम.
Team ABCPR
चिकीत्सक भटकंती व छान लिखाण.भोरांडयाचे दार हा नाणेघाटाच्या तुलनेने उपेक्षित व दुर्लक्षितच आहे.पाण्याच्या टाक्यावरून प्राचीन व राबता घाटवाट असावा.अश्याप्रकारे प्राचीन घाटवाटांचा चिकीत्सक व संशोधकव्रत
ReplyDeleteतीने भटकंती करुण वाटांवरील प्राचीन खाणाखुणा शोधणे हीच खरीखुरी व अर्थपुर्ण भटकंती आहे.