Pages

Thursday, 14 September 2017

विखुरलेल्या पाऊलखुणा

दुर्ग-लेणे-घाटवाटांच्या विखुरलेल्या पाऊलखुणा
सुधागड-तेलबैल्याजवळील पुरातन 'ठाणाळेलेणे' आणि सवाष्णी घाट-वाघजाई घाट या घाटवाटांची ट्रेकरदोस्तांसाठी संक्षिप्त माहिती.

... गर्द झाडीतून डोकावत होतं कातळकड्यात खोदलेल्या लेण्याचं विलक्षण दृश्य! भारावून टाकणारं. मोबाईलवरचा गुगल नकाशा झूमआऊट केला. त्या नकाशापल्याड दडलेला भूगोल आणि काळाच्या पडद्यामागे हरवलेल्या इतिहास-संस्कृतीचा सुरेल आकृतीबंध उलगडण्यासाठी आम्ही ट्रेकला निघालेलो. २००० वर्षांपूर्वीच्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर (चौल बंदर ते देशावरची गावे) - दुर्ग (सरसगड, सुधागड, तेलबैल, घनगड), घाटवाटा (सवाष्णी, वाघजाई) आणि पावसाळ्यात वर्षावासासाठी खोदलेली लेणी (खडसांबळे, ठाणाळे) अशी नक्षी विखुरलेली. काळाच्या झंझावातासोबत बरंच काही हरवून गेलं असलं, तरी अजूनही जाणवताहेत या दुर्ग-लेणे-घाटवाटांनी अनुभवलेल्या या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची आणि संस्कृतीची स्पंदनं!!!

आमच्या ट्रेकरूटचे हे रेखाटन.

(सवाष्णी-वाघजाईसाठी ठाणाळे गावाचा वळसा टाळता येईल का असे वाटेल, पण अशी वाट नाही. दाट झाडोऱ्यातून घुसाघुशी केली तर कदाचित शक्य.)

सवाष्णी घाट:
- घाटमाथ्यावरचे गाव: तेलबैल, तालुका मावळ, जिल्हा पुणे
- सह्याद्री घाटावरचा दुर्ग: तेलबैला
- कोकणातले गाव: धोंडसे, तालुका सुधागड, जिल्हा रायगड
- कोकणातला दुर्ग: सुधागड
- स्थानवैशिष्ट्य: तेलबैल्याच्या नैऋत्येस. सुधागडच्या ईशान्येला. दुर्ग - लेणी - घाटवाट अशी जोडी
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: माथ्याजवळ खोदीव पायऱ्या
- वाटेत पाणी: नाही
- निवारा: तेलबैला किंवा धोंडसे गावात. दुकाने/ घरगुती हॉटेल्स
- उतराई: ५५० मी
- वेळ: २.५ तास
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:

तेलबैला गावातून तेलबैल्याला डावीकडे ठेवत सुधागडच्या दिशेने नैऋत्येला शेताडीतून २० मिनिटे चाल.




रानफुलांमध्ये हरवूनच गेलो...

मंद उतार उतरत गेलं की सुधागडचे दांड-उतार दिसू लागतात. उभा खुणेचा दगड म्हणजे सवाष्णी घाटाची सुरुवात.

कातळात खोदलेल्या पायऱ्यांची शृंखला आधी किंचित डावीकडे उतरत जाते.

पावसाचं पाणी झिरपून शेवाळलेल्या, बुळबुळीत झालेल्या. अवघड नाही, पण पाणी असेल तर काळजी आवश्यक.

पाच-पंधरा पायऱ्या उतरल्यावर आता पायऱ्या उजवीकडे उतरू लागतात.

गच्चदाट झाडीतल्या पदरातून वाट उजवीकडे उतरत जाते.

१०० मी उतराई  केल्यावर मोकळवनात धनगराच्या झापापाशी आपण पोहचतो. झापात आता कोणीच राहत नाही.

इथून पुढे २० मी उतरल्यावर खोगीरासारखी खोलगट जागा. समोर किंवा उजवीकडून जाण्याचा प्रयत्न चांगलाच फसला. परत धनगरवाड्यापाशी आलो. हे मामा देवासारखे भेटले. वाट गवसली.

इथून उजवीकडे थेट ठाणाळे लेण्यांकडे जाणारी वाट असेल का, असं वाटतं पण अशी वाट नाही.
खोगीरावरून डावीकडे गेलो. वाट सुरुवातीला मळलेली नाही, पण पुढे व्यवस्थित. सवाष्णी घाटाला माथ्याकडून आणि पायथ्याकडून निघणाऱ्या वाटा मळलेल्या. मध्ये रानात बुजलेल्या.
डावीकडे सुधागडचे डोंगरउतार सुंदर दिसतात.

धोंडसेजवळ मस्त नदीपात्र. सुधागड आणि सह्याद्रीला जोडणारी धार, त्यावरचे सुळके आणि पाठीमागे खुणावणारा घनगड. पूर्वेला सवाष्णी घाटामागे तेलबैलाच्या जोडभिंती डोकावत होत्या.

धोंडसे गावात न जाता थेट रानातून ठाणाळे गावात जायची वाट आहे, पण आम्हांला मिळाली नाही.
अशक्य थकवणारा दमटपणा. धोंडसे गावात घरगुती हॉटेलमध्ये लिंबू सरबत पिऊन तरतरी आली. इथे जेवणाची सोय होईल, पण वेळ जाईल. धोंडसे ते ठाणाळे हा ४ किमी प्रवास टमटमने.

ठाणाळे लेणी
- पायथ्याचे गाव: ठाणाळे, तालुका सुधागड, जिल्हा रायगड
- सह्याद्री घाटावरचा दुर्ग: तेलबैला
- कोकणातला दुर्ग: सुधागड
- स्थानवैशिष्ट्य: तेलबैल्याच्या वायव्येला. दुर्ग - लेणी - घाटवाट अशी जोडी
- पाणी: लेण्यापाशी नाही. १० मिनिटे अंतरावर ओढ्यातून - उपलब्ध असल्यास
- निवारा: ठाणाळे गावात
- वेळ: १.५ तास
- ठळक खुणा:
ठाणाळे गावात लेण्यांना जायच्या वाटेची चौकशी केली, तर गाईड घ्याच असा आग्रह. गाईडने अवाजवी किंमत मागितली. स्वतः जाऊ म्हणल्यावर वाटेची सपशेल चुकीची माहिती दिली. अर्धा तास रीवर्क. परत ठाणाळे गावापाशी येऊन पूर्वेला वाघजाई घाटाची वाट घेतली. एका मिनिटात उजवीकडे काटे-कुंपण घालून बंद केलेली वाट दिसली. मंद चढाची गच्च झाडीतली वाट.

उजवीकडे सवाष्णी घाटाची गर्द झाडीभरली सोंड. पण थेट ठाणाळे लेण्यांकडे उतरणे अवघड. पाऊण तासानंतर सह्यकड्यांच्या कुशीतली ठाणाळे लेणी खुणावू लागली.

मोठ्या ओढ्यापाशी दोन खुणांचे बाण. एक डावीकडे. दुसरा बाण उजवीकडच्या उभ्या चढावर नेणारा. उजवीकडच्या बाणावर मोट्ठी फुली मारून तिकडे जाऊ नये, असं सांगणारा. ओढ्यापासून डावीकडून गेल्यावर ठाणाळे लेणी डोक्यावर आली. चुकीची वाट. परत उलटं ओढ्यापाशी आलो. कदाचित ट्रेकर्सच्या वाटा चुकाव्यात, असा हेतू असेल!??

उजवीकडची वाट उभ्या चढावरून डावीकडे लेण्यांपाशी घेऊन गेली.

सुरेख झाडीचे टप्पे.


ठाणाळे लेणी हीनयान बौद्ध असून इसपू दुसऱ्या शतकात खोदलेली आहेत.

इथे प्रथमच मौर्यकालीन (अशोककालीन) चांदीची नाणी सापडली आहेत.

टूरिष्टांनी जिथेतिथे नावं लिहून अत्यंत वाट लावलेली.

एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूप व एकवीस विहार.  ब्राम्ही लिपीतील शिलालेखात शिवगण पुत्र गोदत्त याने या लेण्यांसाठी दान केल्याचा मजकूर.

या लेण्यांचा नव्याने शोध मिशनरी जे. अ‍ॅबट यांना जानेवारी १८९० मध्ये लागला. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही काही काळ या लेण्यांचा आश्रय घेतला होता.


भिंतींवर विविध प्राणी व मानवी आकृत्या. मोठे नागशिल्प अप्रतिम. गजलक्ष्मीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

लेणी मागे ठेवत उत्तरेला वाघजाई घाटाकडे निघालो. पाठीमागे होता लेण्यांचा पॅनोरमा.

वाघजाई घाट:
- घाटमाथ्यावरचे गाव: तेलबैल, तालुका मावळ, जिल्हा पुणे
- सह्याद्री घाटावरचा दुर्ग: तेलबैला
- कोकणातले गाव: ठाणाळे, तालुका सुधागड, जिल्हा रायगड
- कोकणातला दुर्ग: सुधागड
- स्थानवैशिष्ट्य: तेलबैल्याच्या वायव्येला. दुर्ग - लेणी - घाटवाट अशी जोडी
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: ठाणाळे गावाजवळ पाण्याची कातळखोदीव टाकी. माथ्याजवळ खोदीव पायऱ्या. घाटमाथ्याच्या अलिकडे वाघजाई देवीचं राऊळ
- वाटेत पाणी: ठाणाळे गावाजवळच्या टाक्यात
- निवारा: तेलबैला किंवा ठाणाळे गावात. दुकाने/ घरगुती हॉटेल्स
- चढाई: ६०० मी
- वेळ: ३ तास
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:
वाघजाई घाट गाठण्यासाठी लेण्यांपासून पुढे उत्तरेला अर्धा तास आडवं चाललो आणि पठारावर आलो. (ट्रेक उलट्या दिशेने केल्यास, पठारावरून ठाणाळे लेण्याची वाट शोधण्यासाठी थोडं अवघड आहे. ठळक खुणा नाहीत). पूर्वेला उजवीकडे माथ्यावरून उतरलेली झाडीभरली सोंड आली. त्यावरून वाघजाई घाटाची चढाई सुरू झाली.

पूर्वेला सह्याद्री दर्शन.

उत्तरेला अनघाई घाट आणि दुर्ग.

उभ्या सोंडेवरून दमवणारी वाट. पल्याड दक्षिणेला खुणावणारा सवाष्णी घाट.  

माथ्याजवळ कातळखोदीव रुंद पायऱ्या

माथ्याच्या अलीकडंच धबधब्याच्या पोटात अप्रतिम वाघजाई राऊळ

माथ्यावरून परत एकदा तेलबैल्याचं दर्शन

परतीचा धम्माल प्रवास आणि निसर्गदृश्य!!!






एका दिवसात दहा तासांचा दमवणारा ट्रेक झालेला. बरंच काही हरवून गेलं असलं, तरी जाणवली होती या दुर्ग-लेणे-घाटवाटांनी अनुभवलेल्या या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची आणि संस्कृतीची स्पंदनं!!! We left nothing but footprints. We brought back nothing but memories...


------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेक मंडळी: साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे
२. ब्लॉगवरील फोटो: साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे
३. कृतज्ञता: अमेय जोशी - घाटांच्या मार्गासाठी; पुस्तक-सांगती सह्याद्रीचा ठाणाळे लेण्यांच्या माहितीसाठी 
४. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
५. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१७. सर्व हक्क सुरक्षित.

26 comments:

  1. सुंदर लिखाण सुंदर फोटोस!!!!

    ReplyDelete
  2. खूप सुंदर माहिती साई सर

    ReplyDelete
  3. व्वा,पूर्वी केलेल्या ट्रेकच्या आठवणी तुझ्या लिखाणामुळे पुन्हा उजळल्या गेल्या.बाजारू ट्रेकर्समुळे स्थानिकांची बदललेली मानसिकता, दिशाभूल करणारे बाण ... वाईट चित्र आहे हे 😢 असो. लिखाण सुरेखच, नेहमीप्रमाणे. यापूर्वी दोन्ही वेळा लेणी ते वाघजाई घाट असा मार्ग धरल्यामुळे घाटपायथ्याचे टाके बघायचं राहूनच गेलंय. त्यासाठी पुन्हा जायलाच हवं ☺️

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद काका! :)
      सुपरिचित असूनही वाटा शोधायला लावणारा आणि दमवणारा ट्रेक!
      स्थानिकांची बदलणारी मानसिकता शॉकिंग होतीच.
      ठाणाळे गावातून वाघजाई घाट चढताना लागणारे टाके आमच्या रूटमध्येही राहून गेलं..

      Delete
  4. सुंदर! मी भर ऊन्हाळ्यात वाघजाई सुधागड सवाष्ण केला होता पण ठाणाळे राहिलेय.नाणदांड बरोबर करतो आता कधीतरी!

    ReplyDelete
    Replies
    1. तुषार धन्यवाद! :)
      ठाणाळे विशेष देखणं लेणं आहे आणि आवडेल.
      नाणदांडसोबत खडसांबळे लेणेसुद्धा आवडेल, पण ते ठाणाळेच्या मानाने फार उद्ध्वस्थ आहे..

      Delete
  5. नेहमीप्रमाणेच सविस्तर आणि माहितीपूर्ण लेखन... आणि तुझ्या ओघवत्या शैलीत लिहिल्यामुळे वाचायला भारी मज्जा आली...
    फोटोज कडक आलेत...
    एक नंबर...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दत्तू!
      ट्रेकरदोस्तांना ट्रेकला मदत व्हावी आणि लगेच जावसं वाटावा, हाच हेतू आहे ब्लॉगचा..
      फोटोजचं क्रेडीट साकेतला जास्त!!!

      Delete
  6. सुंदर लिखाण आणि छायाचित्रे !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद लिमयेसर! :)

      Delete
  7. साईदादा , तुझे ब्लॉग वाचून नवीन ट्रेक करायची ऊर्मी मिळत राहते, या ब्लॉग मध्ये मांडलेली काही निरीक्षणे काळजी करायला लावणारी अाहेत. (चुकीचे मुद्दााम खोडलेले दिशादर्शक बाण, वाट्याड्या नाही घेतला तर दिशाभूल करणारी वाट सांगणे). बाकी तुझा ब्लॉग वाचावा अाणि ट्रेकला निघावे असे तपशील असतात. ट्रेक करताना हा तुझा डोळसपणा फार काही शिकवुन जातो. प्रेमात पडावा असा ब्लॉग

    ReplyDelete
    Replies
    1. रोहितभाऊ,
      सह्याद्रीप्रेमामुळे तुला हे साधं त्रोटक लिखाण आवडलंय...
      स्थानिकांचं ट्रेकर्ससोबतचं बदललेलं वागणं नक्कीच अनपेक्षित.
      ट्रेकरमित्रांना ट्रेकला मदत व्हावी, पण स्पूनफीडिंग होवू नये अश्या हेतूने लिखाण करतो... म्हणूनच, थेट gpsनकाशा न देता, डोंगरयात्रा पद्धतीचं रेखाटन दिलंय.
      खूप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून.. धन्यवाद!

      Delete
  8. खुप धन्यवाद, आम्हाला खुप मदत झाली

    ReplyDelete
  9. सर, मी हा ट्रेक वाघजाई घाट-ठाणाळे लेणी-सुधागड असा केला आहे । आम्हाला पण तेलबैल नंतर direct सुधागड वर माणूस भेटला होता , आम्हाला पण लेणी सापडायला त्रास झाला होता ,पण मिळाली । आणि आम्ही पदारातल्या पुसट वाटेनेच सुधागड ला मुक्कामी गेलो होतो । या वाटेवर सवाष्णी घाटाची वाट आडवी लागली होती । अर्थात आम्हीं हे सगळं चढाई उतराई वाचून केलं होतं

    ReplyDelete
  10. आपले लेख फार उत्तम दर्जाचे असतात

    ReplyDelete
  11. सुजय,
    आनंद वाटतो ब्लॉगचा ट्रेकर्सना उपयोग झाला हे कळलं की. खूप धन्यवाद!

    रोहितजी,
    मस्त वाटलं तुमच्या ट्रेकरूटबद्दल वाचून. चढाई-उतराईने खरंच घाटवाटांच्या ट्रेक्सची नवी दिशा दाखवून दिलीये, ध्यासचं लागलाय आता.
    ट्रेकर्सना उपयोगी पडावेत असे थोडके लिखाण. प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद!
    (आणि हो, सर म्हणायची अजिबात गरज नाही :))

    ReplyDelete
  12. Thanks for sharing, nice post! Post really provice useful information!


    Hương Lâm chuyên cung cấp bán máy photocopy và dịch vụ cho thuê máy photocopy giá rẻ, uy tín TP.HCM với dòng máy photocopy toshiba và dòng máy photocopy ricoh uy tín, giá rẻ.

    ReplyDelete
  13. तैलबैल्याहुन ठाणाळे असा ट्रेक वाघजाईघाटातुन मी मित्रासोबत हावर्षी जानेवारी महिन्यात के लाआहे.खाली उतरल्यावर आम्हाला लेण्याची वाट व चिन्ह दिसल नाही वथेट ठाणाळे गावात पोहोचलो.तिथे एका घरामागुन वाट लेण्यापर्यंत जाते तिने गेलो.जागोजागी झाडांवरटँग लावले आहेत.लेण्या सुंदर आहेत.नेनवली रिंवा खडसांबळेच्या लेण्याही सुंदर आहेत.इथे बरीच पडझड झालीआहे व लेण्या जवळ गेल्याशिवाय दिसुन येत नाहीत.पण अनुभव सुंदर होता.

    ReplyDelete
  14. Nice blog. Savasni ghat route varun thanale caves la jayala route ahe.Ahmi feb. 2019 la kela ahe.savasni ghata cha route left la jat khindi til water fall javal yeto pan yat dhangar wada lagat nahi.

    ReplyDelete